आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :देशात अमृत महोत्सव उल्हासात साजरा होत असून समस्या मात्र तोंड वासून उभी आहेत देशाची आर्थिक परिस्थिती नोटाबंदी पासून खालावली असून देश आर्थिक संकटात सापडला असून कर्जबाजारीच्या वाटेवर आहे, शिक्षण, आरोग्य,शेतकरी समस्या, बेरोजगारी,भ्रष्टाचार ह्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा दिल्लीपासून ते वणी तालुक्या पर्यंत मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करून अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, जर देशाच्या वणी तालुक्याची पुरामुळे झालेली हानी, त्या हानीत आर्थिक,मानसिक,शारीरिक अन्न, वस्त्र, निवारा, जनावरांचा प्रश्न, पिडीत जनतेचा आरोग्य प्रश्न यावर प्रशासन व प्रशासक यांनी लक्ष देऊन समस्या निराकरण करणे काळाची गरज असताना स्थानिक तहसील प्रशासन जनावराच्या चाऱ्याच्या समस्येपासून अनभीत दिसून आले होते, त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तीन पूर होऊन सुद्धा महसूल प्रशासन आपत्कालीन नुकसान देण्यापासून कचराईचे धोरण दिसत असेल तर जनतेनी समस्या मांडायची तर कोणाकडे हा प्रश्न व्यस्त अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या देखावा प्रणाली वरून समोर येत असून वणीच्या या परिसरातील होणारा अमृतमहोत्सव हा मात्र कोणाच्या हीताचा असा प्रश्न निर्माण झाला असून अमृत महोत्सव साठी जी एकता प्रशासनानी दाखवली ती एकता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दाखवली असती तर हा अमृत महोत्सव देशाच्या उन्नतीचा मार्ग ठरला असता पण समस्या सुटता सुटेना अमृत महोत्सव केल्याशिवाय राहता राहे ना, अशी गत आदेशाचे पाईक असणाऱ्या प्रशासनाची झाली असून समस्या सोडवणूक पेक्षा वाढीला कारणीभूत ठरत आहे, देशाचे 75 वर्ष हे जरी 75 गुणगौरवाचे मानकरी ठरत असला तरीसुद्धा भारत देशाची जनता समस्येने ग्रस्त झाल्याने मानव विकास केंद्रित कामाला ब्रेक देऊन पैसा श्रेष्ठीला मुख्य प्राधान्य दिल्याने देशातील जनता उपाशी तर भांडवलदार चाकरदार तुपाशी असल्याचे वास्तव चित्र वणीच्या समस्या व अमृत महोत्सवाची आतिषबाजीच्या धोरणावरून समोर येत आहे, हेच वास्तव चित्र देशाचे सुद्धा झाल्याचे समोर येत आहे.भारतीय प्रतिज्ञा, वंदना, संविधान उद्देशीकाने देशाला काय दिले, असा संदेश ह्या अमृत महोत्सव सकल्पनेतुन समोर येत आहे,50हजार वर्षा पूर्वीच्या आदिम समाज परिवर्तनाला दिशा देऊन ते स्वीकार करणारे भारतीय नाही काय?वणी तालुक्याच्या वाट्याला पैईनगंगा, वर्धा, विदर्भ, निर्गुडा नदी असून क्षेत्रीय विभाग पाहता साधे नदीवर बॅरेज सुद्धा बांधले गेले नाही, हेच बांधले असते तर झालेले नुकसान भरून काढण्यास शेतकऱ्यांना मदत झाली असती, पण उदासिनता कारणीभूत ठरल्याने जैसे थे, 'आले गेले विसरूनी जावे,पुढे पुढे चालावे 'हेच जीवन गाणे उरले.शिताऊन भाताची परीक्षा ही जुनी म्हण ह्या ठिकाणी लागू पडत असल्याचे समोर येत आहे.तर जनता सुद्धा तेवळीच दोषी ठरत आहे, ज्ञान हेच समस्या निराकरण करण्याचा मार्ग असून ते घेतल्या शिवाय राष्ट्र उन्नतीचा मार्ग सुस्कर होणार नाही.या आधी सुद्धा सरकारने मेणबत्ती लावून प्रकाशित करण्याचा सल्ला दिला, त्याच पद्धतीने ताट सुद्धा वाजवून घेतली हे विज्ञानाला पेरक राहली काय? जगाने विज्ञानाची कास धरून मानव सेवा देण्याचा ध्यास धरला असताना समस्या सोडवणुकी पेक्षा ' हम करे सौ कायदा, ह्यातून आपले पटवून दिले 'जैसा राजा वैशी प्रजा ',अशी गत देशाची झाल्याने 75 वर्ष हा अमृत महोत्सव उन्नतीचा ठरतील काय?
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...