वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :सुधाकर कदम प्रतिनिधी (नांदेड ): संत ज्ञानेश्वर प्रशासकीय महाविद्यालय बोधडी (बुद्रुक) येथे दि.8आगस्ट 2022रोजी आदर्श बहुउद्देशीय संस्था वणी द्वारा कविकुलगुरु कालिदास संस्कृती विश्वविद्यालय,रामटेकच्या संलग्नित बि. ए. सिव्हिल सर्विसेस हा अभ्यास क्रम चालू सत्राकरीता घेण्यात आला असून किनवट तालुक्यातील 12वि उत्तीर्ण व समकक्ष विध्यार्थी प्रवेश प्रक्रिये नतंर 120विध्यार्थी याचा प्रथम दिवशीय प्रवेश स्वागत कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे.
प्रथम स्वागतम स्वागतम गीत सुमणांनी अवांगमन प्रमुख यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी महाविद्यालय प्राचार्य बालाजी केंद्रे यानी
घरात अंकुरणाऱ्या विजांना देऊया प्रकाश नवा,
आशीर्वादासह आत्मविश्वास ही हवा ,
स्वागत करतो मुलांनो तुमचे
शाळेचा पहिला दिवस हा नवा ! यातून स्वागत केले, या कार्यक्रम प्रसंगी विचारमंच्यावर अध्यक्ष स्थानी रवींद्र तुळशीराम गौरकार महाविद्यालयाचे संचालक ( आदर्श बहुउद्देशीय संस्था वणी ), संत ज्ञानेश्वर महाविद्यालय प्राचार्य बालाजी केंद्रे ,मुख्य मार्गदर्शक प्रा.महेश पुंड वणी, प्रा.बालाजी केंद्रे, पुरुषोत्तम नवघरे, खाडाळकर मामा, लोकमत प्रतिनिधी सुधाकर कदम, दत्ता बोबडे (निर्भीड ग्रामीण पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष, भारतीय वार्ता सपादक व संस्था संचालक सदस्य )यांची या वेळी उपस्थिती होती.
या वेळी मंच्यावर उपस्थितीत प्रमुखाणी शब्दसुमणांनी स्वागत करताना पुढील विचार मथन केले आहे,
आज भारावली आहे ती वास्तू कारण आज तिचा आत्मा परतला आहे ,किलबिलाटाने तुमचा वर्गही गहिवरला आहे मोडक्या फळीचा बेंच सुद्धा पहा कसा सावरून बसला आहे मुलांनो येण्याने तुमचा इथला कण आणि कण आनंदला आहे कारण आनंदाचा ठेवा व सुट्टीचा मेवा खाऊन तुम्ही आनंदाने शाळेत परतले आहात। या स्वागत तुमचे या प्रथम दिनी गुलाबपुष्प देऊ हाती एक करूया गती माती ह्या किनवट तालुक्याची,
पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते!
चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !
म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते !
असेच प्रेम आपुलकी जिव्हाळा जपणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे रवींद्र गौरकार महाविद्यालय संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून बोलत होते.
ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते...!
म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे अशा गुरुकिल्ली लिहिणारे आपले मार्गदर्शन *प्रा महेश पुंड यानी विचार मथन केले
एक-एक पाऊल उचलतांना करावा विचार ,
शुद्ध अंतकरण आणि साजेसा आचार ,
शाळेला येऊन मुलांनो करा आयुष्याचे साकार ,
म्हणूनच स्वागत तुमच्यातील अस्मितेचे , असे विचार पुरुषोत्तम नवघरे यानी केले
सुंदर भारत माता ब्रीद गर्वितेचे,
स्वागत तेजाचे स्वागत मांगल्याचे,
स्वागत नवनिर्मितीचे ,स्वागत उत्सुकतेचे ,
स्वागत राष्ट्रनिष्ठेची, स्वागत गणवेशाचे गणवेशातील
समानतेचे,अस्या प्रतिक्रिया देऊन आतुरली गुलाबपुष्पे स्वागत करण्या तुमचे..
मुलांनो तुम्हीच आहात भविष्य देशाचे दत्ता बोबडे यानी यातून विचार मथन करून विध्यार्थ्याना मिटाई, अल्पहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मादस्वार मॅडम यानी केले , ह्या कार्यक्रमाचे आभार एस. के.कार्यक्रम यश्वितेसाठी, कऱ्हाळे यानी मानले तर संत ज्ञानेश्वर महाविद्यालय बोधडी (बु) चे शिक्षक व्ही. व्ही मुडें, बि. एस घुले, श्रीमती मादस्वार मॅडम,एस एम.मेंडके,एस. के.कऱ्हाळे,अजयं सर यानी कार्यक्रम एस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...