Home / महाराष्ट्र / खानदेश / सुखमय जीवन जगण्याचा...

महाराष्ट्र    |    खानदेश

सुखमय जीवन जगण्याचा सन्मार्ग* *२२ प्रतिज्ञा*

सुखमय जीवन जगण्याचा सन्मार्ग*                 *२२ प्रतिज्ञा*

*धनराज गोंडणे 

    *बावीस प्रतिज्ञा ही सुखमय जीवन जगण्याची आचारसंहिता आहे. दुःख मुक्तीचा मार्ग आहे.*  

*म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "तुम्ही किती पुढे जाता यापेक्षा कोणत्या मार्गाने जाता हे महत्त्वाचे आहे.   म्हणून मी सर्व माझ्या बांधवांना विनंती करतो की, धम्माचा प्रचार गतिमान करण्यासाठी आपल्या मौलिक सहकार्याची गरज आहे.   तुमच्याकडून ही अपेक्षा करतो."*

------------------------------------------------------

 

    महामानव विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ साली बुद्धधम्म दीक्षेच्या समारंभाप्रसंगी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे मानवी कल्याणाचा मार्ग, सुखमय जीवन जगण्याचा मार्ग होय.   या मार्गाने जो मनुष्य जीवन जगेल, तोच खरा बुद्धधम्माचा अनुयायी होय.    

    बुद्धधम्म विज्ञाननिष्ठ आहे व अनुभवाच्या कसोटीवर उतरलेला आहे.   तसेच त्याची व्यापकता महान आहे.   या धम्मामध्ये कोणत्याही कर्मकांडाला स्थान नाही.   त्यामुळे आपण सर्वांनी जुन्या कर्मठ कर्मकांडाच्या रूढी-परंपरांचा त्याग करून आदर्श नागरिक, आदर्श उपासक/उपासिका बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

    'सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते.   पण डाॅ. बाबासाहेब धर्मांतरानंतर काही दिवसांत आपणांस सोडून गेलेत व बौद्धमय करण्याचे स्वप्न तसेच राहिले.   त्यामुळे त्यांची खरी जबाबदारी सुशिक्षित, सुसंस्कृत व खऱ्या बौद्ध उपासकांची आहे.

    आज समाजामध्ये सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेमध्येच वावरत आहे.   त्यांनी ३३ कोटी देवदेवता घरामधील एखाद्या कोपर्‍यात बसविले आहेत.    फक्त सभास्थानी एखाद्या कार्यक्रमात डाॅ. बाबासाहेबांच्या कार्याविषयी बोलतात व घरी आल्यानंतर अजून आपल्याच अंधश्रद्धेला व कर्मकांडाला कवटाळतात.   म्हणून भाष्य करण्यापेक्षा आचरण करणे हे उत्तम मंगल आहे.

    तथागत बुद्धांनी प्रचार-प्रसारासाठी महामानव विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ साली बुद्धधम्म दीक्षेच्या समारंभाप्रसंगी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे मानवी कल्याणाचा मार्ग, सुखमय जीवन जगण्याचा मार्ग होय.   या मार्गाने जो मनुष्य जीवन जगेल, तोच खरा बुद्धधम्माचा अनुयायी होय.    

    बुद्धधम्म विज्ञाननिष्ठ आहे व अनुभवाच्या कसोटीवर उतरलेला आहे.   तसेच त्याची व्यापकता महान आहे.   या धम्मामध्ये कोणत्याही कर्मकांडाला स्थान नाही.   त्यामुळे आपण सर्वांनी जुन्या कर्मठ कर्मकांडाच्या रूढी-परंपरांचा त्याग करून आदर्श नागरिक, आदर्श उपासक/उपासिका बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

    'सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते.   पण डाॅ. बाबासाहेब धर्मांतरानंतर काही दिवसांत आपणांस सोडून गेलेत व बौद्धमय करण्याचे स्वप्न तसेच राहिले.   त्यामुळे त्यांची खरी जबाबदारी सुशिक्षित, सुसंस्कृत व खऱ्या बौद्ध उपासकांची आहे.

    आज समाजामध्ये सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेमध्येच वावरत आहे.   त्यांनी ३३ कोटी देवदेवता घरामधील एखाद्या कोपर्‍यात बसविले आहेत.    फक्त सभास्थानी एखाद्या कार्यक्रमात डाॅ. बाबासाहेबांच्या कार्याविषयी बोलतात व घरी आल्यानंतर अजून आपल्याच अंधश्रद्धेला व कर्मकांडाला कवटाळतात.   म्हणून भाष्य करण्यापेक्षा आचरण करणे हे उत्तम मंगल आहे.

    तथागत बुद्धांनी प्रचार-प्रसारासाठी भिक्खू संघ व भिक्खूनी संघ, उपासक संघ, उपासिका संघ हे चार स्तंभ सांगितले.   यांच्यावर बुद्धधम्माच्या प्रचार-प्रसाराची धुरा अवलंबून आहे.   परंतु प्रचार-प्रसार तेवढ्या प्रमाणात होताना दिसून येत नाही.   कारण भिक्खू/भिक्खूनी शहरातच विहारात राहताना दिसतात, पण ग्रामीण भागात खेड्यापाड्यात प्रचार करताना दिसत नाहीत.    फार क्वचितच भिक्खू ग्रामीण भागात जाऊन प्रचार करतांना दिसतात.    

    तथागत बुद्धांनी सम्बोधी प्राप्तीनंतर ४५ वर्षे पायी प्रवास करून धम्माचा देशात प्रसार केला.   'चरिथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय' असा अनमोल संदेश भिक्खूंना/भिक्खूनींना दिला.   परंतु आज आपल्याला त्यांच्या संदेशाचे पालन होताना दिसत नाही.   बोटावर मोजण्याइतकेच भंते हे कार्य प्रामाणिकपणे करताना दिसतात.   विनय पिटकामध्ये भिक्खूं/भिक्खूनींसाठी आचारसंहिता सांगितली आहे.   त्या नियमांनी चालून धम्माचा प्रसार होऊ शकतो, अन्यथा धम्म र्‍हासाकडे जाऊ शकतो.   तथागतांनी भिक्खूंना विहारात दोन दिवस राहण्याची परवानगी दिली होती.   दोन दिवस वास्तव्य करून तिसऱ्या दिवशी पुढच्या गावी विहारात जावे.   परंतु तसे आजच्या परिस्थितीत जाणवत नाही.   बरेच भिक्खू एकाच विहारात अनेक दिवसांपासून राहताना दिसतात.   यावरून धम्माचा प्रसार कसा होत आहे, हे दिसून येते.   आपण भारत बौद्धमय करण्याच्या डाॅ. बाबासाहेबांच्या संकल्पाला न्याय देत आहोत काय ?

    बुद्धधम्मामध्ये विपश्यनेचे महत्त्व आहे.   विपश्यनेविषयी भारतामध्ये आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी खूप प्रसार केला.   भारतामध्ये १६५ केंद्रे स्थापन केले.   चित्त एकाग्रतेसाठी, शांतीसाठी व आपल्यातील विकारांवर विजय मिळविण्यासाठी साधना सांगितली.   अनेक जाती धर्माचे लोक या ज्ञानाचा उपयोग घेत असतात आणि आपले जीवनात कल्याण साधत असतात.   त्यांनाच विपश्यना समजली आहे.   परंतु काही साधक असे आहेत की, आम्ही १० शिबीर, ५० शिबीर केले, आम्हाला विपश्यना खूप समजली आहे,   असा खोटा आविर्भाव दाखवतात आणि अहंकार वृत्तीने वागताना दिसतात.    अशा साधकांचा समाजाला काही फायदा होत नाही.   कारण ते एकाच कार्याला महत्त्व देऊन इतर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यात सहभागी होत नसतात.    आचार्य गोयंका म्हणतात, 'शिबीर संख्येने कितीही केले तरी त्याला महत्त्व नाही, परंतु साधकाने एकच शिबीर केले असेल व त्याने खर्‍या अर्थाने जीवनामध्ये (काया, वाचा, मनाने) विपश्यना अंगिकारली असेल, व धार्मिक जीवन जगत असेल तर हे संख्येने जास्त शिबीर करणाऱ्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे आणि त्यालाच खरी विपश्यना समजली, असे म्हणता येईल.    विहारामध्ये जाऊन मेणबत्ती, अगरबत्ती पेटविली म्हणजे आपण धार्मिक होत नाही.   जोपर्यंत बौद्ध उपासक/उपासिका शीलावर प्रतिष्ठित होत नाही, तोपर्यंत धम्मच समजू शकत नाही.  'शील' हे आधार आहे, या आधावरच आपण पुढील मार्गक्रमण करू शकतो.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...