Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / *पुणे मनपातील नौकर भरती...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

*पुणे मनपातील नौकर भरती प्रवेश अर्जाची किंमत कमी करा!. - संभाजी ब्रिगेड पुणे

*पुणे मनपातील नौकर भरती प्रवेश अर्जाची किंमत कमी करा!. - संभाजी ब्रिगेड पुणे

 

 

भारतीय वार्ता :पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत वेगवेगळ्या विभागाच्या रिक्त पदाची नोकर भरती महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली. बेरोजगारांची संख्या पुण्यासह महाराष्ट्रात भयानक आहे. राज्य सरकार ही दोन अडीच लाख पदे रिक्त असताना कुठलीही सदोष भरती प्रक्रिया राबवत नाही. त्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण भयंकर वाढलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडे आई-वडिलांवर अवलंबून राहत असताना पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत नोकर भरती मध्ये प्रवेश अर्जाची किंमत ओपन साठी 1000 आणि आरक्षित वर्गासाठी 800 रुपये ठेवण्यात आली आहे. मुळात ही रक्कम जास्त आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य विभाग, म्हाडा यांच्या प्रवेश अर्जाची किंमत ही 400 ते 450 होती मग असं असताना पुणे महानगरपालिकेकडून दुप्पट रक्कम वसूल करण्याची गरज काय...? महानगरपालिका सर्व खर्च हा या मुलांकडून काढून घेणार आहे का.? सध्या लोकांची परिस्थिती नाही. तसेच ही टेंडर प्रक्रिया नाही जेणेकरून किंमत ठरवली गेली ही दोषपूर्ण नाही का असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे.

 

पुणे महानगरपालिकेच्या 350 जागा असून सुमारे पाच दहा लाख अर्ज येतील असा अंदाज असू शकतो. मग याची एकूण रक्कम ही  कोटी रुपयांच्या घरात जाईल.मग हे MKCL चे भलं करण्यासाठी हा सगळा प्रपंच सुरू आहे.बेरोजगार तरुणांना लुटायच हा गोरख धंदा किंवा यामध्ये कोणाचे टक्केवारी ठरलेली आहे. जर चुकून भरती प्रक्रियेत घोटाळा झाला तरी याला सर्व प्रशासन जबाबदार असेल या विरोधात संभाजी ब्रिगेड तीव्र आक्षेप  घेणार आहे यांची नोद ठेवा.

 

संभाजी ब्रिगेडची  मागणी लक्षात घेता आहे की, पुणे महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेच्या प्रवेश अर्जाची किंमत ओपन साठी 500 रुपयांच्या आत व आरक्षित जागेसाठी 300 रुपयांच्या आत प्रवेश फी ठेवावी. जी आता आकारण्यात आलेली आहे, ती विद्यार्थ्यांना वापस करावे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे... अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे असे आव्हान संतोष शिंदे प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र यानी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...