आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :सेवेच्या ठायी तत्पर है तीन शब्द कानावर पडले की स्वराज्याचे इंजि . हिरोजी इंदुलकर यांचे स्मरण होते . छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यातील सिव्हिल इंजिनिअर व आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्यासाठी अनेक नवीन किल्ले निर्माण केले होते . तर जूने किल्ले उत्तम प्रकारे मजबूत डागडुजी करून स्वराज्याच्या सेवेसाठी परिपूर्ण केले होते . हा इतिहास जगजाहीर आहे . स्वराज्य राजधानी किल्ले रायगड वरील जगदीश्वर मंदीराच्या एका पायरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परवानगीने इंजि . हिरोजी इंदुलकर यांनी सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर ही अक्षरे कोरून ठेवली आहेत . एवढ्याच एका आधारावरून आपल्याला ह्या इतिहास पुरुषाची माहिती मिळाली . एवढी निरपेक्ष भावना शिवकालीन मावळ्यांनी जोपासली होती . आजही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व ज्ञानाचा वापर करून सेवा उद्योगासाठी सेवेच्या ठायी तत्पर ही भूमिका पार पाडणारा एक धडपडणारा अवलिया मावळा इंजि . अभयसिंह चाडवे पाटील आहे . अवघ्या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यात इंजि . अभयसिंह चाहते पाटील यांनी जीवनातील अनेक प्रेरणादायी व गौरवशाली कामे उभी केली आहेत . परंतू कुठेही आपले नाव घेऊ नये हीच दक्षता घेतली . त्यांचे हेच अभिमानास्पद जीवन नवीन पिढीतीत युवकांना माहीत व्हावे तसेच इतर पशस्वी तोकांना आपले आत्मकथन लिही प्रेरणा मिळावी ह्याच मुख्य उद्देशाने अभयसिंह यांनी आमच्या विनंतीवरून एक छोटेखानी आत्मकथन लिहिले आहे . तेच आत्मकथन सेवेच्या ठायी तत्पर ह्या नावाने वाचकांच्या सेवेत दाखल होत आहे . आपण ह्या एका हरहुन्नरी नदीन लेखकाच्या आत्मकथनाचे भरभरून स्वागत करात अशी अपेक्षा आहे . इंजि अभयसिंह धाडवे पाटील यांच्या गावी व पंचावन्त्राच्या जन्मदिनी दिनांक २८ जुलै २०२२ रोजी हे बहुचर्चित आत्मकथन प्रकाशित होत आहे . या निमित्ताने इंजि . अभयसिंह धाडवे पाटील यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन मित्रांनो हा लेख सेवेच्या ठायी तत्पर ह्या आत्मकथनाची समिक्षा नाही . तर इंजि . अभयसिंह धाडवे पाटील यांच्या बाबतीत आपणास अवगत करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा छोटासा एक प्रयत्न आहे . शहाजी राजे , जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याने तसेच पदस्पर्शाने पावन झालेल्या बारा मावळ परिसरातील व शिवगंगा खोऱ्यातील सारोळा ता . भोर ह्या गावी २८ जुलै १ ९ ६० रोजी व गटारी अमावस्या दिवशी इंजि . अभयसिंह चाहवे पाटील यांचा जन्म झाला आहे . पुरंदर सारोळा भोर वेल्हा मुळशी पुणे निरा खंडाळा कराड ह्या पुणे व सातारा जिल्ह्यातील परिसरात स्मृती शेष भाऊसाहेब उर्फ दिनकरराव पाडवे पाटील हे नाव जनसामान्य आवृद्धजनता सर्वच ठिकाणी व क्षेत्रात आजही अतिशय आदरपूर्वक उल्लेख करून घेत असते . सार्वजनिक जीवनात सर्वांगाने तसेच सर्वाधनि सज्जन , सात्विक , परोपकारी , वित भक्त , स्वच्छ व सतत हसतमुख चेहरा म्हणजेच स्मृती शेष दिनकरराव घडते पाटील होत . अशी सर्वदूर त्यांची ओळख निर्माण झाली होती . सामान्य शेतकरी कुटुंबातील व स्वतः शेतकरी असलेले स्मृती शेष दिनकरराव धाडवे पाटील केवळ त्यांच्याच पिढीसाठी नव्हे तर पुढील काही पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ मानले जातात . निरपेक्ष वृत्तीचे तसेच निरागस हास्य वदनी स्मृती शेष दिनकरराव पाटील हे त्यांच्या समकालीन सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , राजकीय क्षेत्रातील आदर्श मानले जात होते . मावळातील अनेक ऐतिहासिक घराण्या प्रमाणेच धाडवे पाटील घराण्याला देखील मध्ययुगीन तसेच अर्वाचीन काळातील गौरवशाली इतिहास आहे . पुणे जिल्ह्यातील पुणे ते सातारा हायवेवर निरा नदीच्या डाव्या किनाऱ्यावरीत सारोळा हे चाहते पाटील यांच्या वतनाचे गाव आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमास व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रती उर्फ पत्री सरकारला धाडवे पाटील कुटुंबातील पूर्वजांनी सहकार्य केलेले आहे .. एवढेच नाही तर धाडवे पाटील ह्या नावाचा देखील एक इतिहास आहे . सारोळा हे गाव पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव तसेच सातारा जिल्हा सरहद्दीवर असल्याने प्रती सरकारचे अनेक क्रांतिकारक सहकारी धाडवे पाटील यांच्या वाड्यात थांबत वा तेथून रसद पुरवठा केला जात असे . त्याकाळी महान क्रांतिकारक यशवंतरावजी चव्हाण येथे आश्रमासाठी यांबते होते . पुढे सन १ ९ ६० मध्ये ते संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले . अचानक एके दिवशी कारने कराहता जाताना जूनी आठवण जागी झाली , सारोळा गाव येताच मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सरळ दिनकरराव चाहते पाटील यांच्या वाड्यात गेले .. भाऊसाहेब यांना भेटून कृतज्ञता व्यक्त केली . पुढे त्यांचे मानसपुत्र शरदचंद्रजी पवार यांनी सुध्दा पर्यंत धाडवे पाटील कुटुंबियांसमवेत प्रेमळ व जिव्हाळ्याचे संबंध जपलेले आहेत . या दोन्ही समाज नेत्यांचा प्रभाव अभयसिंह यांच्या विचारसरणीवर व कृतीवर जाणवतो . असे असले तरी धाडवे पाटील कुटुंबातीत एकाही सदस्याने एवढ्या जुन्या व मोठ्या राजकीय संबंधांचा कोणत्याही प्रकारचा लाभ घेतल्याचे दिसून येत नाही . ही एक अभिमानास्पद व अभिनंदनीय बाब असली तरी वर्तमानात अव्यवहारी आहे . असे मला वाटते . तसेच वर्तमान पिढीतही दोन्हीकडून हे बिगर राजकीय प्रेमळ संबंध अगदी जाणिवपूर्वक जपले जात आहेत . अर्थातच यात अभयसिंह यांचा बराच पुढाकार असतो . मोठ्या साहेबाना अभयसिंह पाडवे पाटील यांचा मनापासून अभिमान वाटतो . द्रौपदीबाई व दिनकरराव धाडवे पाटील कुटुंबाचा पंचकोनी विस्तार झाला . स्मृती शेष दीपक शेठ उर्फ आबासाहेब , स्मृती शेष संदेश शेठ उर्फ तात्यासाहेब स्मृती शेष विठ्ठलराव उर्फ बाळासाहेब अभयसिंह उर्फ लालू मोठ है चार भाऊ व बहिण वंदनाताई यांना एकमेकांशी सरळ रेषेत जोडणारा पंचकोनी भावहांचा आपसातील खेह पंचक्रोशीत अनेकासाठी प्रेरणादायी ठरेल असा चर्चेचा विषय झाला होता . दिनकरराव यांनी काळाची पावले ओळखून सर्वच मुतांना घेऊन पुणे गाठते . यथावकाश मुलांचा कल पाहून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचे शिक्षण दिले . आर्थिक व्यवस्थ केले . योग्य स्थळांचा शोध घेऊन सर्वांचेच विवाह केले . ते बहरलेले संसार मातोश्री द्रोपदीबाई व पिताश्री दिनकरराव धाडवे पाटील यांनी डोळ्यात साठवते . माझे एक मित्र व नातेवाईक माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर हिगोली यांची डॉक्टर सुकन्या डॉ . वैशाली ( विवाहानंतर डॉ वसुंधरा सोबत तसेच शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मध्यस्थीने अभयसिंह धाडवे पाटील यांचा विवाह झाला आहे . डॉ . वसुंधरा व अभयसिंह आमच्या परिवाराच्या परिचयातील होते . त्यात मी २००२ मध्ये पुणे येथे बदली वर आलो . या वेळी अभयसिंह चाहते पाटील सोबत कौटुंबिक ओळखी झाल्या . त्यातूनच पुढे माझी मुलगी सिव्हिल इंजिनिअर नेहा व दीपक शेठ धाडवे पाटील यांचा मुलगा आर्किटेक्ट तुषार यांच्या शिव विवाहाची गाठ ४ डिसेंबर २०११ रोजी बांधली गेली . खेहा खटल्याच्या कुटुंबातीत ज्येष्ठ सून झाली . कौटुंबिक संबंध रक्ताचे झाले . आम्ही पुण्यात रहायला होतो . या कारणाने नियमितपणे गाठीभेटी होत , जेवणावळी सुरू असतात . सारोळा किवा अभयारण्य या ठिकाणी काही निमित्ताने सतत येणे जाणे होऊ लागले . दोन्ही कुटुंबातीत सर्वच सदस्य एकमेकांत गुंतले गेले . चार भावाचे खटल्याचे कुटुंबीय , जावई अॅड सुनित शिरोळे कुटुंबीय व आम्ही खेडेकर कुटुंबीय , पुढे दोन व्याही सुहास निगडे देशमुख कुटुंबीय व इंजि सुनिल मोहिते कुटुंबीय , इतर नातेवाईक व मित्र परिवार एकत्र येऊन आमच्या कुटुंबाचा महा विस्तार झाला . नुकतेच विक्रांतचेही लग्न जुळले आ हे . या कारणाने पुसेगाव जिल्हा सातारा येथील पोलीस अधिकारी शिवश्री राम जाधव कुटुंबाची यात भर पडली आहे . आम्ही सर्व पाहूणे वेगवेगळ्या क्षेत्रातील आहोत अतिशय आनंददायी वातावरणात दिवसा पाठोपाठ दिवस जात होते . ४ जानेवारी २०२० रोजी धाडवे पाटील कुटुंबातील तन्वी व मोहिते कुटुंबातील अमेरिकेत असलेल्या इंजि मयुर यांच्या शिव विवाहाची गाठ खेळीमेळीच्या आनंददायी समारंभात बांधली गेली . चुलती वैशाली व चलते बाळासाहेब या जोडीने सर्वच आवश्यक विधीचे यजमान पद सांभाळले होते . वातावरण भारावलेले होते . स्मृती शेष आबासाहेब पांच्या नसण्याची किनार सपवत जिकडे - तिकडे आनंदोत्सवात न्हाऊन निघालेले धाडवे पाटील कुटुंबातील सदस्य व पाहणे समाधान व्यक्त करताना दिसत होते . आनंदाची उधळण करत होते . चाहते पाटील कुटुंबियांचे व प्रामुख्याने अभयसिंह धाडवे पाटील यांचे भरभरून कौतुक करत असताना अभिमान व्यक्त करत होते . अभयसिंहाच्या चेहेन्यावर मनोमनी कृतार्थ झालो असल्याची भावना होती . (ऍड:पुरषोत्तम खेडेकर चिखली )
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...