Home / महाराष्ट्र / खानदेश / *जिजाऊ ब्रिगेड धुळे...

महाराष्ट्र    |    खानदेश

*जिजाऊ ब्रिगेड धुळे तर्फे लावला पद्धतीने विवाह

  *जिजाऊ ब्रिगेड धुळे तर्फे लावला  पद्धतीने विवाह

 

 

भारतीय वार्ता :धुळे 

सोनगीर येथील सोमेश्वर महादेव मंदिरात वायपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील पंकज पाटील प्रथम वर व खेडी (खेडगाव) तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील सुनिता पाटील यांचा शिवविवाह जिजाऊ ब्रिगेड धुळे यांनी पुढाकार घेऊन लावून दिला.    याचे सविस्तर वृत्त असे की, सुनिता पाटील हिच्या पतीचे निधन झाल्यानंतर निराधार झाली होती. तिला एक मुलगी व एक मुलगा आहे. पंकज व सुनिता यांचे समुपदेशन शिवश्री सुधीर कचवे व शिवमती कविता कचवे,शिवमती सुवर्णा कचवे,  राहणार नरव्हाळ तालुका जिल्हा धुळे व शिवश्री भगवान पाटील शिवमती प्रियंका पाटील खेडी यांनी केले व त्यांना लग्नासाठी प्रवृत्त केले. पंकज हा प्रथम वर असून देखील त्याने दोंघ मुलांसहित सुनिताचा स्वीकार केला. खरोखर हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुलभा कुवर, जिल्हाध्यक्ष शिवमती नूतन पाटील, जिल्हा सचिव शिवमती वसुमती पाटील, जिल्हा संघटक शिवमती सीमा  वाघ, कापडणे तालुका जिल्हा धुळे ग्रामशाखा अध्यक्ष शिवमती आशा पाटील, इंजि. शिवश्री देविदास कुवर या शिवविवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते .

शिवधर्म पद्धतीने लग्न लावत असताना जमलेल्या दोन्हीकडच्या वऱ्हाडी मंडळींना डॉक्टर सुलभा कुवर व शिवमती नूतन पाटील यांनी मार्गदर्शन करताना समाजात प्रबोधनही केले. वधू-वरांकडच्या मंडळींना हा शिव विवाह सोहळा प्रेरणादायी वाटला. हा शिव विवाह सोहळा अल्प खर्चात  झाला. शिवविवाह सोहळा संपन्न झाल्यावर वधू-वरांनी शपथ घेतली. जिजाऊ ब्रिगेडतर्फे वधू-वरांना शिवविवाह दाखला देण्यात आला व पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रांतिकारक बदल सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.  

वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले आणि वधू-वरांना एक एक रोप देऊन त्यांना त्यांच्या शेतात ती रोपटे लावण्याचे सांगून निसर्ग प्रेमी राहण्याची सकल्पना रुजवली गेली, या सोहळ्याला जिजाऊ ब्रिगेडने सहकार्य करून परिवर्तनाची दिशा दिल्या बद्दल कचरे परिवाराणी अभिवादनं केले. समाजात असेच कार्य घडण्यासाठी बळ प्राप्त होवो ही आशा व्येक्त केली.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...