Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / शिवशाहीर : आण्णाभाऊ...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

शिवशाहीर : आण्णाभाऊ साठे*

शिवशाहीर : आण्णाभाऊ साठे*

 

लातूर :

 

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे

    (भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)

     मो. 9762636662

 

 

पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर वसलेली नसून ती शेतकरी, कष्टकरी कामगारांच्याच्या तळहातावर वसलेली आहे’ असे सांगणारे तसेच संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक महारथी लोकशाहीर, साहित्यसम्राट, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे.

 

‘हिन्दी जगत अन्ना हजारे से बखूबी परिचित है !

पर उस महान अन्ना से उतना परिचित नहीं है !

जितना होना चाहिए था , ये महान अन्ना कौन है ?

इस अन्ना को दुनिया अन्नाभाऊ साठे के नाम से जानती है !’

 

‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर वसलेली नसून ती शेतकरी, कष्टकरी कामगारांच्याच्या तळहातावर वसलेली आहे’ असे सांगणारे तसेच संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक महारथी लोकशाहीर, साहित्यसम्राट, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे. यांचा जन्म ०१ ऑगस्ट, १९२० रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला, त्यांचे संपुर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांना सर्व अण्णाभाऊ या नावाने ओळखत. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते. शिवशाहीर आण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले नंतर तेथील सर्वणांद्वारे होणार्‍या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसर्‍या पत्नी जयवंता, त्यांना एकूण तीन अपत्ये होती त्यात मधुकर, शांता आणि शकुंतला.

अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले परंतु त्यांनी मराठीभाषेत ३५ कादंबर्‍या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जी १९ व्या आवृत्तीत आहे आणि इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. तसेच शिवशाहीर आण्णाभाऊंनी ‘अग्निदिव्य’ ही कांदबरी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती तिसरे प्रतापराव गुज्जर यांच्यावर लिहली आहे. केवळ दीड दिवस शाळेत जाणार्‍या आण्णाभाऊंच्या १५ लघुकथांचा संग्रह आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बर्‍याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त त्यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली. आण्णाभाऊंनी ऐवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य लिहले असून त्यांचा जन्मदिवस ‘मराठीभाषा दिन’ म्हणून का साजरा करू नये ? संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जयंती दिवस हा ‘मराठीभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.  हा दिवस सर्वच स्तरावर साजरा करण्यात यावा असे निवेदनही संभाजी ब्रिगेडने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते, पण त्यावर अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही.

अण्णाभाऊ साठेंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. कारण सारा महाराष्ट्र अण्णाभाऊंनी अमर शेख यांच्या साथीने जागवला-पेटवला होता. त्यांनी तेव्हाच गुजराती लोकांच षड्यंत्र ओळखून ते हाणून पाडण्याचंही काम आण्णाभाऊ साठेंनीचं केल होते. पण आज उच्चशिक्षित तरूणांना गुजराती लोकांच षड्यंत्र समजत नाही कारण त्यांनी आण्णाभाऊंना कधी समजून घेऊन वाचलचं नाही.

भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन हे महान विचारवंत तसेच रामायणातील सत्य या पुस्तकाचे लेखक पेरियार यांना मान्य नव्हते म्हणून ते म्हणाले होते की, हे खरे अर्थानं स्वातंत्र्य नाहीये, ख-या अर्थानं आम्ही गुलामीच्या बंधनातून मुक्त झालो नाहीयेत, ही फक्त पांढ-या लोकांकडून काळ्या लोकांच्या हातामध्ये आलेली सत्ता आहे, हे आमचं स्वातंत्र्य नाहीये’ जसे महान विचारवंत पेरियार यांना हे स्वातंत्र्य मान्य नव्हते तसेच शिवशाहीर आण्णाभाऊ साठेंनाही मान्य नव्हते. म्हणून तर त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईमध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले होते, त्यावेळी जेवढा पाऊस झाला होता तेवढ्या पावसाची आजपर्यंत नोंद झाली नाही. तरीही कोसळणार्‍या पावसात मागे न हाटता मुंबईमध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता, त्या मोर्च्यातील घोषणा होती, ‘ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है !’ असा नारा आझाद मैदानावर दिला होता.

माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून गायिले आणि ते पोवाडा गाताना म्हणत की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणा वंदुणी गातो कवणा जी रं जी’ त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला होता. म्हणून त्यांना खरे शिवशाहीर म्हटले पाहीजे. परंतु एकही पोवाडा न लिहणार्‍या तसेच जेम्स लेनच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या काही विकृतींना सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार शिवशाहीर म्हणून महाराष्ट्र भुषण, पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान ही करतेय ही खुप मोठी शोकांतिका आहे.

‘विकृतींनी आमचे खरे शिवशाहीर जिरवले,

त्यांनी भलत्याचं विकृतींना शिवशाहीर म्हणून मिरवले’

उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, अस्पृश्य आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. हे त्यांच्या

‘जग बदल घालुनी घाव | सांगूनि गेले मज भीमराव ॥

यावरून सिध्द होते. या कवनामध्ये ते म्हणतात,

‘गुलामगिरीच्या या चिखलात रूतून बसला का ऐरावत,

अंग झटकून निघं बाहेरी घे बिनीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव’

हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’, ‘मुंबईची लावणी’ आणि ‘मुंबईचा गिरणी कामगार’  दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण’ असे शहराला दर्शवणारे वर्णन केले हे अविस्मरणीय आहे.

शिवशाहीर आण्णाभाऊ साठेंची एक कादंबरी आहे तीचे नाव ‘चिखलातील कमळ’ या कादंबरीवर १९६१ साली ‘मुरळी मल्हारी रायाची’ नावाचा चित्रपट निघाला होता. अशा लेखक, साहित्यिक, नाटककार, लोकसम्राट, वगसम्राट, शिवशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ‘मराठी भाषा दिन’ जर हे राज्यसरकार साजरा करत नसेल तर खुप मोठी शोकांतिका आहे.

अण्णाभाऊ साठेंनी जशी ‘चिखलातील कमळ’ ही कादंबरी लिहली तसे आज आण्णाभाऊ असते तर त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारच्या राजकीय व सामाजिक कार्यपद्धतीचे निरीक्षण करून त्यांनी ‘कमळातील चिखल’ ही कांदबरी लिहुन सरकारचा समाचार घेतला असता हे कोणीही नाकारू शकत नाही. शिवशाहीर आण्णाभाऊंनी दिलेले विचार आणि त्यांचे साहित्य आजच्या तरूणांनी स्वतः वाचून इतरांनाही वाचण्यास प्रवृत्त करणे हे आज काळाची गरज आहे. कारण त्यांचे विचार जेव्हा घराघरापर्यंत पोहोचतील तेव्हाच खर्‍या अर्थाने आण्णाभाऊंना खरे अभिवादन ठरेल.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...