आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
बीए तृतीय वर्ष - राज्यशास्त्र च्या परिक्षेत 'छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे योगदान' आणि 'मनुस्मृतीचे सामाजिक महत्त्व' असे चुकीचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची दिशाभूल... - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बीए तृतीय वर्ष - राज्यशास्त्र ची परीक्षा आज दि. १४ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली होती. या प्रश्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा संबंध दाखवण्यात आला आहे. ज्यांचे आयुष्यात कधी भेट झाली नाही त्यांचं योगदान कसलं.? तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्नामध्येच एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे. याच प्रश्नपत्रिकेमध्ये जाणीवपूर्वक खोडसाळपणे 'मनुस्मृतीचे सामाजिक महत्त्व' या पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला आहे. हा परीक्षा परिषद, मा. कुलगुरू आणि संबंधित प्राध्यापकांचा हा खोडसाळपणा आहे. संभाजी ब्रिगेड असला खोडसाळपणा सहन करणार नाही. महाराष्ट्र सरकार व विद्यापीठाने तात्काळ संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व संबंधित प्रश्न रद्द करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी या गोष्टींमध्ये गांभीर्याने लक्ष देऊन खळसाळपणे प्रश्नपत्रिका बनवणाऱ्या व्यक्तीवर व कुलगुरूंवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. कारण विद्यापीठात घाणेरडे विचारांची लोक प्राध्यापकांच्या रूपामध्ये काम जर करणार असतील तर चुकीचा विचार विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न होतोय. मनुस्मृतीचे समर्थन आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. तसेच या देशात भारतीय संविधान चालते. लोकशाही मजबूत असताना धर्मांध मनुस्मृति वर प्रश्न विचारायचे काहीच कारण नाही. हा स्वच्छ खोडसाळ पण आहे, आम्ही तो खपवून घेणार नाही.
प्रश्नपत्रिका तील खालील प्रश्न -
१) छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख
२) शिवाजी महाराजांच्या राजनीतिला समर्थांनी केलेले योगदान सांगा.
३) मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने संबंधित चुकीचे प्रश्न विचारून महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू संबंधित विभागाचे विभाग प्रमुख व प्रश्नपत्रिका बनवणाऱ्या व्यक्तींवर अधिकृत कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे विद्यापीठाने या संदर्भात तात्काळ खुलासा करावा व महाराष्ट्र शासनाने कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे..
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...