आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
पुणे :वृतपत्र
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई विद्यापीठ शैक्षणिक केंद्र व शाण आहे. याच *मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे अशी तमाम शंभू प्रेमी व संभाजी ब्रिगेड'ची मागणी आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही 2018 पासून महामहिम राज्यपाल व महाराष्ट्र सरकार यांना पत्र व्यवहार करून मागणी करत आहोत. मात्र राज्यपाल महोदय जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत, यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही... असे मत व मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे व्यक्त केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाईत शत्रूला पराजीत केलं. स्वराज्याच्या क्रांतीची ज्योत छत्रपती संभाजी महाराजांनी पेटत ठेवली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्य जगभर पोहचले. *प्रकांडपंडीत व चारित्र्यसंपन्न शंभूराजे उत्तम साहित्यिक होते. त्यांचे आठ भाषांवर प्रभुत्व होते म्हणून त्यांनी... बुधभुषण, नायीकाभेद, सातसतक व नखशीख हे उत्तम ग्रंथ लिहिले. परंतु हा इतिहास काही साहित्यिकांनी दडपून ठेवला.* म्हणून छत्रपती संभाजी राजेंचा संपुर्ण खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे... यासाठी इतिहासाचे पुर्नलेखन झाले पाहिजे. मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे... अशी मागणी संभाजी ब्रिगेड सरकारकडे सतत करत आहे.
मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे याबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव केला आहे. यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते जोरदारपणे पाठपुरावा करणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या वस्तीगृहाला सुद्धा राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचे नाव दिले गेले पाहिजे. मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी मनामध्ये कुठलाही आकस न ठेवता मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे असा निर्णय घ्यावा... अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वरील मागणीसाठी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून संघर्ष करण्यात येईल.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...