Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / ओबीसी आरक्षणाशिवाय...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका घेऊ नये... - संभाजी ब्रिगेड आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊ नये... - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका घेऊ नये... - संभाजी ब्रिगेड    आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊ नये... - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

 

पुणे :वृत 

ओबीसी आरक्षणाशिवाय महाराष्ट्रामध्ये नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत हा खरंतर ओबीसी समाजावर होणारा अन्याय आहे. निवडणूक आयोग सुद्धा ओबीसींला डावलून निवडणुका घेण्याचे पाप करत आहे. महाराष्ट्र मध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्याव्यात अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. अन्यथा इथून पुढच्या सर्व निवडणुका रद्द करण्यात याव्यात अशी ठाम भूमिका संभाजी ब्रिगेडची असेल.

 

१) मागासवर्गीय आयोगाच्या वतीने जातनिहाय करण्याचे काम चालू आहे. मात्र ही जनगणना चुकीच्या पद्धतीने सुरू असून यामध्ये ओबीसी जातींवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कारण मागासवर्ग आयोगाच्या वतीने एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात आडनावावरून जनगणना केली जात आहे. एका आडनावाचे बऱ्याच वेगवेगळ्या जातीमध्ये लोक असतात, त्यामुळे सरकार चुकीच्या पद्धतीने जनगणनेचा अहवाल स्वीकारणार असेल तर हे कदापिही योग्य होणार नाही.

 

२) नगरपालिकेच्या निवडणुका ओबीसींना घेऊन व्हाव्यात अशी संभाजी ब्रिगेड ची भूमिका आहे. मात्र जर इम्पेरिकल डाटा गोळा होणार नसेल तर मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसींवर अन्याय करून घेणार का...? मुख्यमंत्री व राज्य सरकार यांनी याकडे गांभीर्याने घ्यावे व सदर निवडणुका सध्या रद्द कराव्यात.

 

३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थात भाजपची सत्ता स्थापन करण्यात आलेली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यापासून दोन अडीच वर्षात केंद्र सरकारने 2011 चा इम्पेरियल डेटा महाराष्ट्र सरकारला देण्यास मनाई केली होती. मात्र आता त्यांचे सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडून इम्पेरियल डेटा घेऊन तो मा. सर्वोच्च न्यायालयात सादर करावा व ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे ते सुरळीत करावे आणि त्यानंतरच त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गंभीर विचार करावा. भाजप ओबीसी आघाडीच्या वतीने अडीच वर्ष खोटे आंदोलन करण्यात आली होती. आता त्यांनी या गोष्टींमध्ये सदोष पद्धतीचा अवलंब करून ओबीसींच्या राजकीय आरक्षण वाचवावे अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.

 

महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात संभाजी ब्रिगेड अत्यंत गंभीर असून OBC आरक्षणाशिवाय नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ देणार नाही. या विरोधात महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे, होणाऱ्या औचित्य परस्थितीला सरकार जबाबदार राहतील यांची खबरदारी घ्यावी असे आव्हान केले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...