वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
*
पुणे :प्रतिनिधी :आले गेले विसरूनी जावे, पुढे पुढे चालावे हेच जीवन गाणे, करीत नव निर्मित सरकार स्थापन करण्यासाठी आटा पिटा करीत आमदारांवर झालेला खर्च केंद्र आणि राज्य सरकार 50 रूपये घरगुती गॅस दरवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशातून वसूल करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असून महाराष्ट्रात स्थापन झालेलं हे सुध्दा 'वसुली सरकार' आहे. वारंवार होणारी गॅस दरवाढ ही सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत करणारी तसेच लोकांना भिकेला लावणारी आहे. हा सरकारमान्य लोकांच्या खिशावर टाकलेला दरोडा आहे. यावर कोणीही बोलत नाही ही खेद जनक बाब आहे पण 50 रुपये वाढत्या घरगुती गॅस दरवाढीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवीत असल्याचे व्यक्तव्ये राज्य संघटन अध्यक्ष संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड यानी केले. या समोर बोलताना महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी वेष बदलून देवेंद्र फडणवीस आमदार फोडून चर्चा करू शकतात,ही सत्तापीपासून वृत्ती असल्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतात... मात्र महागाई कमी करण्यासाठी मा. नरेंद्र मोदी यांना सांगू शकत नाही हे महाराष्ट्राचं आणि देशाचे दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस यांना वेश बदलून नकला करायच्या असतील तर त्यांनी राजकारण सोडावं आणि चित्रपटात, नाटकात किंवा लोककलेमध्ये काम करावं. तिथे त्यांना भरपूर यश येईल.असा सला पण देऊ केला,राजकारणात *'जनता उपाशी आणि नेते तुपाशी'* अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात सत्तेवर आले. महागाई कमी करण्यासाठी यांना कधी जाग येणार हे महत्त्वाचे असून मानव विकास श्रेणीला प्राधान्य देऊन महाराष्ट्र राज्यातील जनतेची सेवा करा चालू गॅस दरवाढीचा जाहीर निषेध मात्र संभाजी ब्रिगेड करणारच कारण जनतेचे दुखणे फक्त संभाजी ब्रिगेडला समजले ते राजकीय उपभोग घेणाऱ्या पांढर पेशी लोकनेत्याना न उमजने हे कोळे असून जनतेनी अस्या कूट नितीचा ज्ञानार्थ समजून घेणे व सावध होणे हेच हक्क प्राप्तीचे साधन ठरतील यांचे विचार मथन करणे ही काळाची गरज झाली असून पुढील काव्यमय पणतीतून
'वारे सरकार तेरा खेल,
सस्ती दारू महंगा गॅस और तेल...! ह्या तुन सर्वसामान्य 80%जनतेच्या जखमेवर चोळणारे मीठ हेच सरकारचे धोरण यातून संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यानी सरकारचे लक्ष केंद्रित करून सर्व सामान्याची बाजू धरून ठेवली व निषेध नोंदवला.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...