वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
ज्योतिषशास्ञ एक भल मोठ थोतांड !
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)
मो. ९७६२६३६६६२
वर्तमानपत्रात थोंताड वर्तवणारी राशीभविष्य असतात त्याबद्दल ग. वा. बेहेरे म्हणतात की, 'वर्तमानपत्राची राशीभविष्य लिहण्यास काहीच अक्कल लागत नाही.' मग ह्या विना अक्कलीच्या लोकांनी वर्तवलेले भविष्य वाचून काही विना अक्कलेचे राजकीय नेते भविष्य सांगू लागतात तेव्हा त्यात भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले ह्यांनी भविष्यवाणी करताना म्हटले की, ३ जुलैपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. मी काही हात पाहून भविष्य सांगत नाही. मी तोंड पाहून भविष्य सांगतो. (अ.नगर लाईव्ह २८ जून २२) ज्योतिषशास्त्र एक थोतांड आहे याची प्रचिती वेळोवेळी येते. म्हणून तर अध्यात्मवाद : श्रध्दा की अंधश्रध्दा ? या पुस्तकात प्रा. य. ना. वालावलकर म्हणतात की, 'वेदांग ज्योतिष' असा एक शब्दप्रयोग प्रचलित आहे; पण मूळ ऋग्वेदात नऊ ग्रह आणि त्यांचा मानवी जीवणावर होणारा परिणाम याचा उल्लेख सापडत नाही. वेदांत नक्षत्रनामे आहेत; पण राशिनामे नाहीत. तसेच संस्कृत भाषेचे अभ्यासक डाँ. कन्हन राजा निःसंंदिग्ध शब्दात सांगतात की, "अलेक्झांडरच्या स्वारीनंतर (इ.स.पू. ४००) फलज्योतिषाची कल्पना ग्रीस देशातून भारतात आली. ती मुळ भारतीय नव्हे." म्हणजे परदेशातून आयात केलेल्या या अंधश्रध्देत आपण दोन सहस्त्रकांहुन अधिक काळ खितपत आहे. भारतात फलज्योतिष वेदांइतकेच प्राचीन आहे असे सांगतात पण हे धादांत खोटे आहे. कारण मुळ ऋग्वेदात फलज्योतिषाचा कुठेही उल्लेख नाही. मेष, वृषभ आदी बारा राशींचा उल्लेख रामायणात तसेच महाभारतातही कुठे नाही.' तर डाँ. अब्राहम कोवूर यांनी लिहले आहे की, 'राहू आणि केतू हे काल्पनिक कक्षांचे छेदनबिंदू. राहु केतूंना वस्तुरूप अस्तित्व नाही. अशा काल्पनिक बिंदुचा मानवी जीवनावर काही परिणाम होतो असे मानणे म्हणजे मूर्खपणाच आहे.'
शिवसेनेच्या काही बंडखोर आमदारांची टीम ज्यावेळी गुवाहाटी मध्ये काय झाडी, काय ते डोंगार, काय ते हाट्टेल म्हणत ऐश करत असतानाच राजस्थान मधील काही ज्योतिषकारांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस बसतील याची सिसारी लागली होती. कारण राजस्थान मधील भीलवाड़ा पासून २० किमी वर असलेल्या कारोई गावातील पंडित योगेश शरण शर्माच्या म्हण्यानूसार २८ एप्रिल २२ रोजी मकर राशि ने शनि मधील कुंभ राशि मध्ये प्रवेश केला आहे. दीड महिन्यानंतर शनी वक्री होण्यामुळे उध्दव ठाकरे सरकार पडण्याचे योग आहेत. महाराष्ट्रात भाजपासोबत गठबंधन होऊन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे योग आहेत. (अमर उजाला २८ जून २२) ह्या भुरट्या ज्योतिष्याच्या मते भविष्य वर्तवल्याच्या दीड महिन्यानंतर ठाकरे सरकार पडणार होते तर मग आधीच कसे पडले ?ज्योतिषाच्या म्हणण्यानूसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार होते तर मग शिंदेंनी हे पद कसे स्विकारले ?लोकांना खोट सांगून लुटणा-या या लुटारूंना फाटक्या खेटराने फटके का देऊ नयेत ?म्हणून तर मा. रिचबुड हे त्यांच्या 'फलज्योतिषाची मूलग्राही चिकित्सा' मध्ये लिहतात की, 'फलज्योतिष हे अप्रबुध्द लोकांनी आभासाच्या आधारावर रचलेले निरर्थक प्रकरण आहे.'
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर प्रबोधकारांचे नातू ?उध्दव ठाकरे विराजमान झाल्यापासून अनेकांच्या तोंडच पाणी पळाल, तेव्हापासून ते देवेंद्र फडणवीसांसाठी आपला देव पाण्यात बुडवून बसल्याचे दिसत होते. त्यामुळे नांदेड येथिल कार्यक्रमात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर ह्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत म्हटले होते की, आता मी आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत आहे, देवेंद्र फडवणीस भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा… पहिला चान्स देवेंद्र यांना. असे म्हणत भविष्यवाणी केली. (महा. टुडे ३ एप्रिल २२) तसेच कधीकाळी शिवसेनेत असलेले आणि सध्याचे भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना हाजी अली दर्गा येथे केली. (सरकारनामा २२ जून २२) तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांचा भार कोणाकडे तरी सोपवण्यात यावा, अशावेळी मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं ?या संदर्भाने प्रश्न विचारले असता रामदास आठवले म्हणाले की, मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं. (लोकसत्ता २७ डिसें. २२) तसेच औरंगाबाद येथिल पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीसमोरील भक्तांची गर्दी चक्क रावसाहेब दानवे यांनी हातात झेंड्याचा दांडा घेऊन बाजूला केली होती. त्यांचा हा दबंग अवतार पाहून कार्यकर्तेही अवाक झाले. (न्यूज १८ लोक. २३ मे २२) कारण रावसाहेब दानवेंना फडणवीस हेच मुख्यमंत्रीच वाटत असावेत ?दानवेंना ब्राम्हण मुख्यमंत्री पहायचा होता पण हे शक्य झाल नाही. दानवेंनी इतरांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यापेक्षा स्वतः किंवा रामदास आठवले, हाजी अराफत शेख व भास्कराव पाटील खतगांवकर यांना शंकराचार्यांमार्फत दिक्षा देऊन किंवा घेऊन बामण व्हायला काय परशुरामाचा नो ड्यूज घ्यावा लागेल का ?मुख्यमंत्री पदासाठी रावसाहेब दानवे, हाजी अराफत शेख, भास्कराव पाटील खतगांवकर व आठवलेंची कुवत, पात्रता नाही का ? दानवे - आठवले, शेख - पाटील या जोडगोळीचे काम म्हणजे 'घरच बाळ अंगावर मुत्र विसर्जन करते म्हणून नाकारायच अन् दुस-याचं कार्ट अंगावर घेऊन खेळवायच' असच म्हणाव का ?.
'मराठ्यांनो षंढ झालात का ?' या पुस्तकात डाँ. बालाजी जाधव म्हणतात की, ब्राम्हणांच पुताड तिर्थ म्हणून प्राशन करणा-यांना आम्ही काय म्हणून सांगावे.' हे डाँ. बालाजी जाधव सरांचे शब्द आज तरी तंतोतत लागू पडतात. कारण, बहुजनांतील अनेक लोकप्रतिनिधी हे मुख्यमंत्री पदासाठी पात्र असतांना ह्या संघात सयमाविष्ठ झालेल्या बहुजनांतील पाळीव प्राण्यांना काय म्हणून येवढे भट पुरोहीत आवडत असतील, हे तर महामहीम परशुरामच जाणो ?कारण एकीकडे जनता टरबुज्या नको, त्याऐवजी मुख्यमंत्री पदावर बसलेल कोणीही चालेल असे म्हणत होती. मात्र दुसरीकडे संघी कोंबडे फडणवीसांच्या नावाचा देव्हारा उचलताना स्पष्ट दिसले. काही तर म्हणत होते की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतील. (माय महानगर २१ जून २२) तसेच भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे म्हणाले होते की, आषाढी एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. (सरकारनामा २९ जून २२) तर येणाऱ्या आषाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपचे आ. राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. (एबीपी माझा २९ जून २२) पण ह्या पाळीव प्राण्यांनी वर्तवलेली भाकित आणि भविष्य फोल ठरली. त्यामुळे म्हणाव वाटत की, 'ज्यांना पहायचा होता फौजदार, त्यांना दिसला हावलदार.'
भाकीत भविष्य हा मुर्खाचा बाजार असतो म्हणून तर डाँ. जयंत नारळीकर म्हणतात की, 'वैज्ञानिक विषयाला आवश्यक असणारा सैद्धांतिक पाया ज्योतिषशास्त्राला लाभलेला नाही. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या ज्योतिष हे शास्त्र नाही; असेच चिकित्सेअंती ठरते.' पण आजही ह्याचा बाजार होताना दिसतो. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ घट मांडणीचे भाकीतात सांगितले होते की, देशात सत्ता पालट होणार नाही, देशाच्या राज्याची गादी कायम राहणार आहे. (इंडीया.काँम ४ मे २२) सत्ता पालट होणार नाही अस भाकित वर्तवल होत तर मग राज्यात सत्तापालट कसा झाला ?त्यामुळे अशा भाकितावर लोकांनी विश्वास काय म्हणून ठेवावा. संघाचे आदर्श माफीवीर सावरकर हे देखिल म्हणतात की, 'प्रत्येक मोहीमेला मुहूर्त पाहणारी पेशवाई घटिकापात्राप्रमाणे अल्पावधीतच बुडाली तर कधीही मुहूर्त न पाहणारी इंग्रजी राजवट अख्या भारत देश जिंकून दीडशे वर्ष अबाधित राहीली हे विसरू नये.'
आसूडकार महात्मा फुले म्हणतात की, 'शनि हा आपल्या सुर्यमालेतील एक ग्रह आहे. तो या पृथ्वीवरील एखाद्या माणसाला पीडा देण्यास येतो. त्याची साडेसाती असते. असे मानणे मुर्खपणाचे आहे. आर्यभट जोश्यास दक्षिणा दिल्याने शनीची पीडा दूर होते असे सांगणे ही तर पोटभरू आर्य जोशांची उघड उघड लबाडी आहे.' त्यामुळे ह्या लबाडांना एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे भारतात पंचांग पाहुन मुहूर्त भविष्य सांगणा-या एकाही ज्योतिषाला (भटाला) का कळलं नसावं ?कारण पांचाग भविष्य हे वेळोवेळी खोट आणि थोंताड ठरत आहे. यापुर्वी २००४ च्या लोकसभेपुर्वी भाजपाला बहुमत मिळेल असे भविष्य सांगितले पण ते सपशेल खोटे ठरले होते. तसेच मुरली मनोहर जोशी यांचे ग्रहमान चांगले आहे असे सांगितले होते पण प्रत्यक्ष निकाल हाती येताच बहुधा त्यांचे डिपाँझिटही गेले. तसेच २००५ साली एका टिव्ही चँनलवरील मुलाखतीत एक ज्योतिषी म्हणाला होता की, जून २००६ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल पण नंतर ते भविष्य सपशेल खोटे ठरले होते. म्हणून तर रँग्लर र.पु. परांजपे म्हणतात की, "आकाशातील ग्रह आणि राशी यांचा माणसाच्या भविष्यावर काही परिणाम होतो याला यत्किंचितही पुरावा उपलब्ध नाही."
भविष्य सांगण्या-या ज्योतिषावर विश्वास ठेवून स्वतःच्या कष्टाची व पैशाची नासाडी करणा-या बहुजन समाजाला शेवटी प्रा. य.ना. वालावलकरांच्या शब्दाच सांगावं वाटत की, 'जोतिषी जाहीराती देतात. फलज्योतिषी हे शास्त्र आहे असे सांगतात. अपाँइंटमेंट देतात. फी घेतात. म्हणजे हा व्यवसाय आहे. म्हणजे तो उपभोक्ता कायद्याखाली येत असला पाहीजे. पैसे घेऊन सांगितलेली अनेक भविष्ये खोटी ठरतातच. त्या ज्योतिषांवर ग्राहकांनी खटले भरले पाहिजेत. असे झाले तर ज्योतिषांची दुकाने बंद पडतील आणि लोकांची फसवणूक होणार नाही.' म्हणून तर विद्रोही कवी विश्वभंर वराट म्हणतात की,
'मुर्तीमध्ये प्राण भट भरविती ! मेल्या पिढ्या किती का बा यांच्या !
मंत्र तंत्र चमत्कार देवा नाही ! केली चतुराई पोटासाठी !
जोश्याची कुंडली जोशीयाला कळे ! बाईल का पळे घरातून !
म्हणे विश्वंभर ऐसे हे पाखंडी ! हाना यांच्या गांडी लाथा दोन !'
नवनाथ रेपे लिखित "भट बोकड मोठा" हे पुस्तक घरपोहोच मिळेल.
संपर्क - रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६४४०८७९४
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...