वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
'टांगा पल्टी घोडे फरार'
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक)
मो. 9762636662
माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणाले की, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच मनापासून अभिनंदन ! परंतू ही गादी म्हणजे राजालाच जेल, इतिहासाची पुनरावृत्ती
"वस्त्रे सातारची आणि सत्ता विषारी पेशव्यांची" ही काळ्या दगडावरील रेघच समजा.' पाटील साहेब बोलले ते योग्यच आहे कारण 'टांगा पल्टी घोडे फरार' ही म्हण राजकारणातील नेत्यासाठी जशीच्या तशी लागू पडते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजप शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस या चार पक्षाची आप - आपसातील जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे ते वेगवेगळे लढले. पण निकाल हाती येताच भाजप सेना हे एकत्र होऊन सत्ता स्थापन करतील अस वाटत असतानाच त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली, हे पाहून रातोरात मा. अजित पवार यांनी भाजपला आपला पाठींबा देऊन मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणून आरोळी ठोकत कोकलणा-या देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केल. पण ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना संपुर्ण महाराष्ट्र साखर झोपेत होता मात्र वयाची साठी पार केलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जागेच होते. पण, जसा ब्राम्हण समाज दीड दिवसाचा गणपती बसवतो तसाच अजित पवारांनी फडणवीसरुपी ७९ तासाचा मुख्यमंत्री बसवून त्याच विसर्जन केल. तेव्हापासून मी येईन मी येईन म्हणणारे फडणवीस सत्तापिंपासू ?म्हणून वावरताना उभा महाराष्ट्र पाहत होता.
एकीकडे शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सेनेच्या लोकांचा सत्तेसाठी जीव तळमळत होता तर दुसरीकडे ह्या बंडखोरांना सोबत घेऊन भाजपाला सत्ता स्थापन करावीशी वाटत असल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या तोंडून लाळेचे थेंब टिपकत होते. मात्र या बंडखोराविरोधात सेनेच्या वतीने मेळावे आयोजित केले जात होते, त्यात वैजापूर तालुक्याचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने मेळावा आयोजित केला होता त्यात चंद्रकांत खैरे हे शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले की, 'त्या गुवाहाटीत आमदारावर जादूटोणा करण्यात आलाय. कारण, एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात. त्यांच्या तोंडामध्ये सतत एक कोणतीतरी पांढरी गोळी असते. म्हणून त्यांनी जादूटोणा करून या लोकांना आपलं करुन घेतलंय'. (लोकमत २७ जून २०२२) कधी अजब तर कधी गजब विधान करण्यात चंद्रकात खैरे पटाईत आहेत. कारण त्यांनी यापुर्वीही म्हटले होते की, माझ्याकडील भस्माने मी प्रमोद महाजनांना जिवंत केले असते. तेव्हा प्रश्न पडतो की, साला चंपा नाम में कुछ तो गडबड है ?एक चंपा ते हिमालयात जातो म्हणणारे तर दुसरे चंपा हे जादुटोणा ओळखणारे अन् भस्म वाटणारे. जर शिंदेंना जादूटोणा येत असेल आणि त्यामुळे त्यांनी आमदार फोडले असतील तर त्या बंडखोर आमदारांना चंद्रकांत खैरेंनी भस्माचा अंगूरा लावून मातोश्रीच्या चरणावर लोंटागण घालायला का लावले नाही ?एवढी पावर ह्या खैरेंच्या भस्मात नाही का ?.
सांगलीतील एका बंडखोर लोकप्रतिनीधीला तेथिल एका मतदाराने काँल करून विचारपूस केली असता सदरील दलालखोर ?लोकप्रतिनी म्हणतो की, मी सध्या गुवाहाटी मध्ये असून 'इकडे काय झाडी, काय डोंगार अन् काय ते हाट्टेल एकदम सगळ्ळ ओक्के !' यावर अनेक गायकांनी गाणे सुध्दा काढले. पण या आणि अशा तमाम लोकप्रतिनीधींना सांगावं वाटत की, महाराष्ट्रातील मतदारांच्या जिवावर लोकप्रतिनिधी झालेल्या बांडगुळांनो इकडे महाराष्ट्रात शेतक-यांच्या पुढे दुबार पेरणीच संकट ओढावल आहे ते दिसत नाही का ?गुवाहाटीची झाडी डोंगर बघून आलाच आहात तर आता इकडच्या सुशिक्षित बेरोजगारांचे सुकलेले चेहरे बघा. तिकडचे पंचतारांकीत हाँटेल बघण झाल असेल तर आता महागाईच्या झळा सहन करत बोगस बी बियाणे खरेदी करणारा शेतक-याकडे एकदातरी डोळे उघडे ठेवून बघा. पण हे बिकाऊ लोकप्रतिनीधी महागाई बेरोजगारी बोगस बि बियाणे याकडे कधीच बघणार नाहीत कारण ते विकले गेलेले आहेत, अस म्हटल तरी चालेल. जसा बैल खरेदी विक्री करण्यासाठी आठवडी बाजार भरतो व त्यातून जशी बैलाची किंमत ठरवली जाते तशा निवडून दिलेल्या ह्या बैलांचा बाजार मुंबई विधीमंडळाच्या आवारात भरला जातो ?त्या बाजारात संघाने सोडलेले काही मोकाट वळू ह्या बहुजनातील बैलाची किंमत ठरवून ह्यांना खरेदी करुन संघाच्या गायरानात गुबू गुबू करायला लावतात. मतदानाच्या पुर्वी हीच बैल शेतकरी व तरुणांविषयी मोठमोठ्या बाता मारून मी हे करतो, मी ते करतो म्हणत सामान्यांना पटाव अस भाषण करतात. पण निवडणूकीचे निकाल हाती येताच ह्या बैलाच्या किंमती वधारतात. मग हेच बैल काही वळू मार्फत संघाच्या गव्हणीला बांधले जातात. हे संघधार्जिणे वळू वेळीच दाबले पाहीजेत अन्यथा हे या देशाचा मालक म्हणजे जो कष्टकरी श्रमकरी शेतकरी समाज आहे, त्यालाच शिंगावर घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे वेळीच असे वळू ओळखून यांचा पायबंद घाला अन्यथा या देशाचा मुळ मालक म्हणजे शेतकरी संपेल.
अंदमान येथिल जेलची हवा खात असताना जसा सावरकरांचा जिव तळमळत होता तसाच प्रबोधकारांचे नातू मुख्यंमत्री झाल्यास अनेकांचा मुळव्याध ठणका देत होता. त्यामुळे हे संघी काहीतरी खेळी करून ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला भाग पाडतील अस वाटत होत. कारण २०१८ मध्ये राहूल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला म्हणत संघ धार्जिणे लोक जोरजोरात मी ही सावरकर, मीही सावरकर म्हणत ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर करावी अशी आरोळी ठोकत होते. तेव्हाच मी माझ्या 'भट बोकड मोठा' या पुस्तकात पान न. ६२ वर म्हटले होते की, 'मला उद्धव साहेबांच्यात यदियुरडप्पा दिसतात कारण, सध्या सावरकर त्यांचा चार दिवसाचा गणपती करणार अस आजतरी वाटतय...!' सावरकर यांनी ठाकरेंचा अडीच वर्षाचा गणपती केला नाही, मात्र त्यांच्या सावरकवादी समर्थंकांनी ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा गणपती अडीच वर्षात विसर्जित केला.
प्रा. हरी नरके म्हणतात की, आपण इतिहासातून काही शिकत नाही. पेशव्यांचे एकनिष्ठ सरदार दत्ताजी शिंदे जेव्हा पेशव्यांच्या आदेशावरून टाकोटाक निघाले तेव्हा मल्हारराव होळकर म्हणाले, शिंदे, जोवर शत्रू जिवंत आहे, तोवर पेशव्यांना तुमची गरज आहे. रोहिले संपले की पेशवे तुम्हाला भांडी घासायला नी धोत्रे धुवायला ठेवतील. आज ठाकरेंना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करण्यात आला. २०१४ ते १९ भाजप सेना युती होती, शिवसेनेचे ६३ आमदार होते नि तरीही अवघी ५ मंत्रीपदे दिली. आता मात्र ३९ लोक बरोबर असतानाही शिंदे गटाला १३ मंत्रीपदे का ?ते शिंदे लढवय्ये होते, युद्धात शहीद होतानाही ते म्हणाले होते, 'बचेंगे तो और लढेंगे.' ते ना गद्दार झाले होते ना शरण गेले होते.
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्ष कार्यकाळ पुर्ण करणारे पहिले व फक्त ७९ तासाचा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनाच मिळालेला आहे. मुख्यमंत्री - काळजीवाहू मुख्यमंत्री - औटघटकेचे मुख्यमंत्री - विरोधी पक्षनेते असा प्रवास करणारे देवेंद्र फडणवीस व त्यांचे समर्थक सत्तेच्या लालसेने व्याकूळ होते. म्हणून त्यांच्या केंद्रातील सरकारने इडीची सापसुरूळी करून ती शिवसेनेच्या गटात सोडली. त्याचात फायदा घेऊन एकनाथ शिंदे मार्फत शिवसेना खिळखिळी करण्याच काम फडणवीसांनी केल. म्हणून तर विद्रोही संकेत हे म्हणतात की, प्रबोधनकारांसोबत ब्राह्मणांनी कसा व्यवहार केला हे त्यांचा मुलगा बाळासाहेब ठाकरे विसरले, त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या मुलासोबत ब्राह्मणांनी तोच व्यवहार केला. आता आदित्य ठाकरेंनी हे कायमचं लक्षात ठेवावं की त्यांच्या वडिलांसोबत ब्राह्मणांनी कसा व्यवहार केलेला आहे व त्यानुसारच पुढील राजकारण करावे. जर का आदित्य ठाकरे देखील हे विसरले तर त्यांच्या पुढच्या पिढीचे संपुर्ण राजकारण ब्राह्मण संपविल्याशिवाय राहणार नाही. तसेच अँड. उज्वल निकम म्हणाले की, 'राज्यातील सध्याचे गलिच्छ राजकारण लक्षात घेता पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. एकाच्या घरी नांदायचं, दुस-याचं मंगळसुत्र घालायचं, उखाणा तिस-याचा घ्यायचा अन् गर्भ मात्र चौथ्याचा वाढवायचा, अशी विचित्र परिस्थिती दुर्देवाने महाराष्ट्राच्या राजकारणात आहे.'
सुरेश खोपडे हे म्हणतात की, खरा हिंदू धर्म आता पंढरीला निघालेल्या भागवत धर्माच्या दिंड्डीत आहे. अस असताना फडणीसांच्या पोटात काय आहे, हे आम्हा ब्राह्मणेतरांच्या खोपडीत शिरले नसावे. फडणवीसांना राज सत्तेवर धर्म सत्तेचे म्हणजेच ब्राह्मण वर्णीयांचे वर्चस्व/श्रेष्ठत्व निर्माण करावयाचे आहे. ते मुख्यामंत्री असताना आरएसएस च्या दसरा मेळाव्यात ते १२ कोटी जनतेचे मुख्यमंत्री असताना ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बरोबर स्टेजवर न बसता स्टेजच्या खाली बसले होते. ब्राम्हणपेक्षा राज्यकर्ता हा दुय्यम, नीच असतो हे दाखून दिले. 'आमचे हिंदुत्व हे जाणव्याचे व शेंडीचे हिंदुत्व नाही तसेच ते घंटा धारीही नाही' ही उद्धव ठाकरेंनी केलेली घोषणा ही खूप क्रांतिकारी व देशाला योग्य दिशा देणारी आहे असे माझे ठाम मत आहे. 'देशाचे दुश्मन' हे क्रांतिकारी पुस्तक लिहिणारे,सत्य शोधक दिनकरराव जवळकर यांच्या नंतर शंभर वर्षानी तशीच गर्जना करणारा उद्धवजी ठाकरे हा खरा मर्द गडी!
शेवटी बहुजन समाजाला सांगाव वाटत की, तुम्ही तुमच्या मतदार संघात जो लोकप्रतिनीधी निवडून दिला आहे तो मतदार संघात आहे का ? कारण तुमचे मुळ प्रश्न व समस्यांना वा-यावर सोडून जो सुरत मार्गे हवाई सफर करत गुवाहाटीला फिरत असेल तर तो तुमच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या कमाईसाठी व भ्रष्टाचाराच्या फाईल्स बंद करून घेण्यासाठी फिरत आहे. या लोकप्रतिनीधीला तरुण व शेतक-यांच्या प्रश्नांशी काही देणघेण नाही. त्यांनी घोटाळे करून कमावलेल्या अफाट संपत्तीमुळे इडीच्या सापसुरूळीला भितीने ते इंदोर मार्गे लाहोरला जाऊन नवाज शरीफांच्या हस्ते बिर्याणी खाऊन देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटतील. त्यामुळे या लोकप्रतिधींना महाराष्ट्रातील तरुणांनी जर का चोप दिला तर याला कोण जबाबदार कोण आहे ? कधी इकडे तर कधी तिकडे माकड उड्या मारणा-या लोकप्रतिनीधींना जनतेने ओळखले आहे त्यामुळे यांनी वेळीच सावध व्हाव. कारण एकडीकडे अग्निपथ योजनेसाठी तरुण रस्त्यावर संघर्ष करतोय तर दुसरीकडे हे गेंड्याची कातडी पांघरलेले राजकीय रेडे मात्र खुशाला काय हाट्टेल, काय डोंगार अन् काय झाडी म्हणत खुलोआम दात काढताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांनो आजच्या राजकीय घडामोडीला हेच कारणीभूत आहेत जे रेशिमबागेचे पाळीव प्राणी आहेत. यांना वेळीच ठेचाव लागेल अन्यथा हे शेतक-यांना व तरुणांच्या भविष्याला ठेचतील. त्यामुळे हे विषारी सर्प दिसताच त्याचा वेळीच बंदोबस्त करा अन्यथा तुमचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अंत होणार आहे आणि हे कोणताही शहाणा माणूस नाकारू शकत नाही.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...