Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / राजर्षी छत्रपती शाहू...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेले 'आरक्षण' देशात संपवण्याचे फार मोठे षढयंत्र सुरू आहे... - संभाजी ब्रिगेड* संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती 'लोकराज्य दिन' म्हणून महाराष्ट्रात साजरी...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेले 'आरक्षण' देशात संपवण्याचे फार मोठे षढयंत्र सुरू आहे... - संभाजी ब्रिगेड*    संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती 'लोकराज्य दिन' म्हणून महाराष्ट्रात साजरी...

*

 

पुणे - केंद्र व राज्य सरकार आरक्षण विरोधी असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे बुद्धीच्या राजकारणात आरक्षणाचा प्रश्न पाठी मागे पडत आहे. राज्यात सध्या विविध पक्षांचे आरक्षणाचे फसवे आंदोलन सुरू आहेत. ज्या लोकांनी केंद्रात राहून राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द केलं, तेच लोक आरक्षण टिकले पाहिजे म्हणून आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण रद्द झाले असतानासुद्धा सरकार गंभीर नाही आडनावावरून जातनिहाय जनगणना केली जाते हा आरक्षणाचा डबल खुन आहे. दुसऱ्या बाजूला मराठा समाज आरक्षण मागत असताना सुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढवली जात नाही आणि केंद्र सरकार व त्यांचे नेते आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, शिवसेना असो की भाजप हे सगळे छुपे आरक्षण विरोधी आहेत, यांना गोरगरीब उपेक्षित समाजाचं काहीही देणे घेणे नाही. विद्वान राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होते म्हणून सर्व समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला अन्यथा, उपेक्षित समाजाचा प्रचंड फार मोठं नुकसान झालं असतं. राजर्षी शाहू महाराज लोक कल्याणकारी राजे होते म्हणून त्यांना दलित, पीडित, शेतकरी, कष्टकरी समाजाची जाण होती. सर्व समाज एकसंघ राहिला पाहिजे ही त्यांची तळमळ समृद्ध भारताची ओळख आहे. डॉ. आंबेडकर सुद्धा म्हणाले, 'एक वेळ मला विसरा पण आपल्या शाहू महाराजांना विसरू नका...' हीच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि कर्तृत्वाची पावती आहे. म्हणूनच आज समाज तरला, सुधारला. लोककल्याणकारी माझ्या राजाची सर कुणालाही भरून काढता येणार नाही. म्हणून चालू 2021-22 च्या राष्ट्रीय जनगणनेत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे... असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी मत व्यक्त केले.

 

आमचा आरक्षण टिकवण्यासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष सुरू राहील. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे हे संपवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल हा महाराष्ट्र कदापिही खपून घेणार नाही... त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची आमची तयारी आहे... असे मत शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले.

 

'लोकराज्य दिन' म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, शहरात साजरी करण्यात येत आहे. शाहू महाराज यांनी केलेले लोककल्याणकारी कार्य समाजापर्यंत पोहोचण्याचा हा संकल्प आहे. यावेळी विविध संस्था, संघटना यांचे समविचारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शाहू महाराज यांची प्रतिमा पुस्तक देऊन सन्मान करण्यात येत आहे. 'शाहू महाराज यांची जयंती सणा सारखी साजरी झाली पाहिजे... हा संकल्प संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्रात केला आहे ...' असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

 

'संभाजी ब्रिगेड पुणे शहर' यांच्या वतिने... राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंती निमित्त शाहू कॉलेज सहकारनगर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 'आरक्षणाची शपथ' घेण्यात आली.

 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, शिवश्री ज्योतिबा नरवडे उपाध्यक्ष पुणे शहर, शिवश्री अभिजित मोरे उपाध्यक्ष पुणे शहर, शिवश्री संदीप कारेकर सचिव पुणे शहर, संघटक कीर्तिकुमार घोरपडे, संघटक शंकर कुठे, माया पवार अध्यक्ष कोथरूड विधानसभा, कुमार पवार अध्यक्ष पर्वती विधानसभा, शिवश्री स्वप्नील रायकर अध्यक्ष खडकवासला विधानसभा, शिवश्री सनी देशमुख उपाध्यक्ष खडकवासला विधानसभा, शिवश्री अविनाश घोडके विभाग अध्यक्ष पर्वती विधानसभा, शिवश्री वेंकटेश माँ पिढी अध्यक्ष जनता वसाहत, शिवश्री सचिन गायकवाड अध्यक्ष सोशल मीडिया पुणे शहर, शिवश्री आदित्य खेडेकर संघटक पुणे शहर, शिवश्री नितीन झेंडे अध्यक्ष विद्यार्थी आघाडी पुणे शहर, अफासर शेख विभाग अध्यक्ष येरवडा वडगाव शेरी मतदारसंघ, येरवडा संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या अध्यक्ष अपसरी कासिम शेख, कासीम शेख आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...