Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / सेनेतील फूट आणि पवारांची...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

सेनेतील फूट आणि पवारांची बदलेली भूमिका

सेनेतील फूट आणि पवारांची बदलेली भूमिका

 

-

ज्ञानेश वाकुडकर

•••

एक मजेदार आठवण सांगतो. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली ती सेनेतील पहिली फूट होती. जेव्हा त्यांनी सेना सोडली त्यावेळी पहिला संपर्क माझ्याशी केला. एक पोलीस ऑफिसर माझ्याकडे त्यांचा निरोप घेऊन आले होते. (मी मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून आधीच सेना आणि जिल्हा प्रमुख पद सोडले होते)

त्यावेळी पक्ष फुटीसाठी १/३ चा नियम होता. आणि सेनेचे आमदार ५३/५४ एवढेच होते. भुजबळांच्या सोबत नेमके १८ आमदार होते.

 

पण फुट जाहीर करण्याआधीच ६ आमदार सेनेने वापस पळवले. नंतर त्या सहा लोकांनी आपण भुजबळ यांच्या सोबत नसल्याचे पत्र दिले. त्यानंतर शिवसैनिकांनी आणखी काही लोकांना पळवले. शेवटी गम्मत अशी झाली.. की फक्त डॉ राजेंद्र गोडे आणि छगन भुजबळ असे दोघेच बाकी राहिले होते.

 

त्यावेळी मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष होते. आणि संख्या कमी झाल्यामुळे सेनेत फूट पडली हे मान्य करणे कठीण झाले होते. भुजबळ गटाला मान्यता द्यायला ते तयार नव्हते. त्यामुळे गोडे आणि भुजबळ यांची आमदारकी जाणार, अशी परिस्थीती निर्माण झाली होती.

 

पण शेवटी शरद पवार यांनी मधुकरराव चौधरी यांना राजी केले. त्यात पाठोपाठ दोनदा फूट पडली असा निर्णय देण्यात आला. म्हणजे अठरा आमदार घेऊन भुजबळ यांच्या नेतृत्वात सेनेमध्ये पहिली फूट पडली, याला मान्यता देण्यात आली. आणि नंतर लगेच पुन्हा भुजबळ गटात फूट पडून त्यातून १/३ आमदार फुटुन निघाले.. म्हणजे १८ पैकी ६ फुटले आणि १२ भुजबळांसोबत राहिले, असा निर्णय देण्यात आला. आणि अशा तऱ्हेने भुजबळ यांचे बंड यशस्वी झाले.

 

मुद्दा असा की विधान सभा अध्यक्षांची भूमिका यात मोलाची आहे. आणि गम्मत म्हणजे इथेही शरद पवार यांचा रोल महत्त्वाचा आहे. त्यांची भूमिका मात्र बदलली आहे. त्यावेळी त्यांनी सेना फोडण्यासाठी वजन वापरले, आता सेना फुटु नये यासाठी डोके वापरतील. आहे की नाही गंमत ?

 

याचेच नाव राजकरण !

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...