Home / महाराष्ट्र / 'परशु'राम'रहीम आसानथु'राम'दास...

महाराष्ट्र

'परशु'राम'रहीम आसानथु'राम'दास म्हणे चालत नाही का ?'

'परशु'राम'रहीम आसानथु'राम'दास म्हणे चालत नाही का ?'

संत नामदेव व संत तुकोबांच नाव घेऊन समाजात जोगावा मागून जगणारे भाडेकरी किर्तनकार तुकोबांच्या बदनामीवेळी कुठल्या मठात गांजा फुकत बसलेले असतात ?तुकोबांचा अवमान होत असताना ह्याच मन मस्तक का पेट घेत नाही ?ह्यांनी कोणाच्या इशा-यावर षंढाची भूमिका घेतली आहे ?

'परशु'राम'रहीम आसानथु'राम'दास म्हणे चालत नाही का ?'

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे

    'भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक'

       मो. ९७६२६३६६६२

मागील आठवड्यात मा. शरद पवार यांनी सातारा येथिल भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कवीता वाचून दाखवली होती. त्यातून कष्टक-यांची व्यथा कवीने जशी मांडली तीच कवीता शरद पवारांनी आपल्या भाषणात सादर केली होती, त्यातील एका कडव्यात शरद पवारांनी देवी देवतांचे बाप काढल्याची आरोळी ठोकत ब्राम्हण व परशुराम भक्तांनी आग करून घेतली. त्यामुळेच की काय अभिनेत्री केतकी चितळे हीने अँड. नितीन भावे नामक व्यक्तीची पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर केली. या पोस्टमधुन भावे व चितळे या विषारी जोडगोळीने शरद पवार यांच्याविषयी एकदम खालच्या पातळीवर टिका तर केलीच. पण, ती टिका करताना अभक्त ब्राम्हण जळो त्याचे तोंड काय त्यास रांड प्रसवली म्हणून ब्राम्हणांना इशारा देणा-या जगद्गुरू तुकोबाराय यांच्या नावाचा नामोल्लेख केला हे खुप संतापजनक आहे. संताप तेव्हाच येतो जेव्हा लोक तुकोबांच नाव घेऊन दररोज काही तथाकथित किर्तनकार समाजाचा खिस्सा कापताना दिसतात. पण, तुकोबांची बदनामी होते तेव्हा ते गप्प असतात कारण यापुर्वीही संपा. गौरव शंकर कुलकर्णी या भटुकड्यांने फिरकी या दिवाळी अंकातून 'तुका म्हणे' हा शब्दोच्चार करत एक टुकार चारोळी छापून त्यातून तुकोबांचा अवमान केला होता. तेव्हा फक्त संभाजी ब्रिगेडने आवाज उठवल्यामुळे त्या मनुवादी संपादकाने हात जोडत माफी मागितली होती. मग प्रश्न पडतो की, संत नामदेव व संत तुकोबांच नाव घेऊन समाजात जोगावा मागून जगणारे भाडेकरी किर्तनकार तुकोबांच्या बदनामीवेळी कुठल्या मठात गांजा फुकत बसलेले असतात ?तुकोबांचा अवमान होत असताना ह्याच मन मस्तक का पेट घेत नाही ?ह्यांनी कोणाच्या इशा-यावर षंढाची भूमिका घेतली आहे ?

नग्न फोटो काढूण अंगप्रदर्शन करणारी अभिनेत्री केतकी चितळे हीने अँड. नितीन भावे याची जी पोस्ट शेअर केली त्यात म्हटल की, 

तुका म्हणे पवारा ! नको उडवू तोंडाचा फवारा !

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक !

सगळे पडले उरले सुळे ! सतरा वेळा लाळ गळे !

समर्थांचे काढतो माप ! ते तर तुझ्या बापाचेही बाप !

ब्राह्मणांचा तुला मत्सर ! कोणरे तू ?तू तर  मच्छर !

भरला तुझा पापघडा ! गप! नाही तर होईल राडा !

खाऊन  फुकटचं घबाड ! वाकडं झालं तुझं थोबाड !

याला ओरबाड त्याला ओरबाड !  तू तर लबाडांचा लबाड !.

वरील चारोळीतून शरद पवारांच्या तोंडाला जो आजार आहे त्याविषयी बोलून तुमची वाट नरक पाहतोय तुमच्या तोंडातून लळ गळते, तुम्ही समर्थाचे माप करता पण समर्थ तुमच्या बापाचे बाप आहे अस म्हणाली त्या चेटकीण चितळेला सागावं वाटतं की, इतरांच्या तोंडातून निघालेली लाळ बघण्यापेक्षा तुम्ही किती अभिनेत्यांच्या लाळेची चव चाखली आहे ?चेटकीणबाई तुम्ही जे स्वर्ग नरकचे गुणगाण गाता ते सर्व थोंताड असून ते ब्राम्हणी मेंदूतून निघालेली घाण आहे. उघडा नागडा समर्थ बाप बनण्याच्या लायकीचा नसून तो नामर्द होता म्हणून तर तो बोहल्यावरून फरार झाला होता. समर्थ इतरांचा बाप होता अस सांगण्यापेक्षा तो आक्का वेणूचा शिष्यीणीयार होता हे सांगायला काय केतकीच्या तोंडात ब्रम्हदेवाने काय बोळा कोंबळा आहे का ?ब्राम्हण व ब्राम्हणवादाचा विरोध केला म्हणजे मच्छर संबोधणा-या केतकीने चांगला ब्राम्हण म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा असून तो खुशाल चघळून घश्याखाली उतरावा कारण त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. शरद पवारांचे आजारपणामुळे तोंड सुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याला नाव ठेवणारी केतकी ही स्वतः मेंदूच्या आजाराने त्रस्त आहे. म्हणून म्हणाव वाटक केतकीन बाई तुम्ही गोळ्या घेऊन तरी सोशल मिडीया वापरत जा.

केतकी चितळेला एपिलेप्सी म्हणजे अपस्मार आजार आहे. वारंवार आकडी येणं हे या आजाराच लक्षण आहे. हा आजार म्हणजे चेतासंस्थेतील बिघाड असून हा आजार पूर्णतः कधीच बरा होत नाही. त्यात येणारी आकडी कोणत्याही बाह्य कारणामुळे येत नाही. केतकी अपस्मारावरील उपचार मेंदुरोगतज्ञ किंवा या आजाराविषयी ज्यांचा अभ्यास आहे अशा डॉक्टरकडून घेत आहे. (मटा १४ मे २२) स्वतःचा मेंदु काम करत नाही म्हणून केतकी उपचार घेतेय अन् दुस-यांच्या रोगावर लाळ गाळतेय. महापुरुषांच्या नावाचा वापर करून इतरांवर शिंतोडे उडवण्यापेक्षा केतकी म्हणे, नितीन भावे म्हणे नाहीतर फडणवीस, आसाराम, रामहीम, रामदेव बाबा किंवा मोहन भागवत म्हणे हा शब्दोउच्चार करून केतकीने काय आभाळ हेपलायच होत ते हेपलायच होत. पण या नागड्या मनुवादी औलादी बहुजनाच्या अस्मितेला हात घालतात म्हणुन तर समाजातून तिव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यात संभाजी ब्रिगेड संघटक संतोष शिंदे म्हणाले की, चितळे नावाची कुणी एक बया आहे. तिने तिच्या वॉलवर अँड. नितीन भावेची एक टुकार, बौद्धिक दिवाळखोरी आणि मानसिक विकृती दाखवणारी चंदू गोखले छाप कविता शेअर केलेली आहे. या ओळी जणू काही पृथ्वी निक्षत्रिय झाल्याच्या आनंदात ती आपल्या वॉलवर शेअर करणाऱ्या चितळे नावाच्या बयेकडे पाहून या औलादी ब्रम्हदेवाच्या ओकारीतून म्हणा किंवा जुलाबतून पैदा झालेल्या असाव्यात खास असे कुणाही विवेकबुद्धी शाबूत असणाऱ्या व्यक्तीला वाटल्या शिवाय राहणार नाही. त्याशिवाय अशी पहिल्या धारेची हरामखोरी प्रकट करणे शक्य नाही. शेवटी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी | धरिताही परी आवरेना || विकृतीचा कंडू आवरतच नसेल तर त्याला भावे आणि चितळे तरी काय करणार ?या ओळींमध्ये पवार द्वेष कसा आणि किती ठासून भरलेला आहे हे कुणाही सज्जन माणसाच्या चटकन लक्षात येईल. असो.... विकृतींची सनातनी परंपरा जोपासणाऱ्या क्षुद्र किड्याबद्दल काय बोलावे ? पण उपरोक्त लेखनात केवळ पवारांची बदनामी झालेली आहे असे मात्र नाही. कारण भावे नावाच्या चंदू गोखले छाप कवीने आपल्या टुकार काव्याची सुरुवातच 'तुका म्हणे' अशा शब्दाने केलेली आहे. खरेतर तुका म्हणे हे केवळ दोन शब्द नाहीत तर ते इथल्या लाखो करोडो बहुजन समाजासाठी वेदांच्या रूचांपेक्षाही पवित्र असे शब्द आहेत. पवारांची बदनामी करताना या वैदिक भावेने खरेतर 'नितीन भावे म्हणे' किंवा 'रामदास म्हणे' अशा नाममुद्रेने सुरुवात करायला हवी होती. पण त्याने ती तशी न करता 'तुका म्हणे' या नाममुद्रेने केली आहे. म्हणजे पवारांची बदनामी करणारे शब्द जणू तुकाराम महाराजच लिहित आहेत असे वाचणाऱ्यास वाटावे. ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची घोर विटंबना आहे. तुकोबांना आपल्या जीवाचे जीवन मानणाऱ्या करोडो वारकऱ्यांचा हा घोर अपमान आहे. रामदासाबद्दल लिहिताना आदरार्थी संबोधने वापरायची आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल किंवा समस्त बहुजन महापुरुष आणि संतांबद्दल लिहिताना मात्र त्यांचा अवमान होईल असे शब्द वापरायचे ही वैदिक सनातन विकृती आहे. अशा विकृतीचा केवळ शाब्दिक निषेध करून ती मिटणार आहे काय ?याचा विचार करण्याची गरज आहे अस म्हणाले. (सरकारनामा १३ मे २२) तसेच संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले की, केतकी तुला लाज पाहीजे, हीला नाठाळाची काठी मारली पाहीजे. सरकारने हीच्यावर कार्यवाही करावी अन्यथा जिजाऊ ब्रिगेडच्या महीला हीच तोंड काळ करतील. केतकीच मानसिक संतुलन बिघडल असून सगळे ब्राम्हण नालायक का असतात याच उदाहरण केतकी चितळे आहे. दीडदमडीचा भावे सापडल्यास त्याला आम्ही बुटाने मारल्याशिवाय राहणार नाही. समर्थाच तुणतुण वाजवल जात पण हा समर्थ होता का ?याच संशोधन झाल पाहीजे असही ते म्हणाले.

एकीकडे केतकी व भावे या जोडगोळीने केलेल्या कारनाम्याचा प्रचंड विरोध होत असताना दुसरीकडे मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी ट्रोलर्संवर टिका करताना म्हटले की, केतकीच्या पोस्टवर अनेक प्रश्न उपस्थित करून त्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही, केवळ पवार असा उल्लेख आल्याचे तिच्याविरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपण संस्कारहीन असल्याचं दाखवू नका, आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. (१४ मे २२) लोकशाहीत 'तुको म्हणे' हा शब्दोउच्चार करून महापुरुषाची बदनामी करण्याचं टेंडर चितळे या बाईने घेतल आहे का ?समर्थ बाबाचेही बाप दाखवून अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणा-या केतकीवर कोणते संस्कार आहेत ?तीच समर्थन करणारी तृप्ती देसाईं या किती संस्कारी आहेत हे महाराष्ट्राने पाहीले आहे. त्यामुळे देसाई यांनी जास्तीची आक्कल पाजळू नये. कारण केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत केलेल्या पोस्टसंदर्भात तिच्यावर कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबर म्हटल्या की, आजोबांच्या वयाच्या माणसाबाबत अशी भाषा वापरत असून ही मनोरुग्ण अभिनेत्री आहे. तिच्या आईवडिलांचे दुर्दैव म्हणावे लागेल की त्यांनी तिला संस्कार दिलेले नाहीत. केतकीने जो खोडसाळपणा केला आहे, आता तिला तिच्याच भाषेत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून तिला चार पाच चापटीचा चोप मिळाला ना तर ती आजारातून लवकर बरी होईल. (लोकसत्ता १४ मे २०२२) चोप देण्याची भाषा करणा-या ठोंबरेंनी आधी राष्ट्रवादीच्या भक्तांना वैचारिक योध्दे बनवण्याचा प्रयत्न करावा कारण अमोल मिटकरींनी ब्राम्हण समाजाचा भरसभेत पंचा उतरला तेव्हा सर्वात प्रथम धनुपंत परळीकर व मनोहर कुलकर्णी समर्थक जयवंत पंत यांनी ब्राम्हणांपुढे लोटांगण घेऊन आपण बहुजनातील भटांचे चाट्ये आहोत हे सिध्द केले होते. म्हणून म्हणावं वाटत की, चोप देण्याची भाषा करण्यापेक्षा ब्राम्हणांना तुमच्या पक्षातील नेत्यांनी जे भटांना बोंकाडी घेतल आहे त्यांना समस द्या नाहीतर खुशाल केतकीच्या झाडाला आलेली फळे खुशाल चाखत बसा. कारण राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रव्याधी आहे अस न्या. कोळसे पाटील म्हणाले होते कारण राष्ट्रवादी म्हणजे केवळ आणि केवळ अंधभक्त निर्मितीचा कारखाना आहे त्यातून वैचारीक योध्दे घडतच नाहीत. कारण आजही राष्ट्रवादीमधील मोजके लोक वगळता बाकी सर्व जंत पंत भटांच्या ओंजळीने पाणी पितात त्यांना आधी चोप देवून चितळे सारख्या मनोरूग्णांना ठेचण्यासाठी भक्तांपेक्षा वैचारिक योध्दे घडवा.

केतकीने १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात लिहिलं होत की, 'नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात. या वक्तव्यावर तिच्याविरोधात ॲट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यापुर्वीही केतकी फेसबुकवर म्हटले होते की, 'शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे....बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय ...अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा.... अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या!  (मटा १४ मे २२) इतरांना शालेय शिक्षण पुर्ण करण्याचा सल्ला देणारी केतकी अभ्यास न करताच आभाळ हेपलते हे मात्र नक्की. कारण चैत्यभूमीवर कोट्यावधी रुपयांची पुस्तक खरेदी करणारे बौध्द बांधव रेल्वेने मोफत प्रवास करतील का ?चैत्यभूमिला जाणारे बौध्द बांधव तिकिटाने जातात म्हणून तर त्यादिवशी रेल्वे फायद्यात असते हे रेल्वे प्रशासनाने प्रसारित केलेल्या बातमीवरून समजते. पण ती बातमी वाचण्याची अक्कल मनोरुग्ण केतकीला असेलच असे नाही.

त्यामुळे शेवटी सागावं वाटत की, यापुढे केतकी, भावे, भिडे, एकबोटे, सदावर्ते व तमाम मनुवादी मानसिकेच्या पिलावळींनी जर का महापुरुषांच नाव वापरून किंवा महापुरुषांविषयी अवमानकारक शब्द काढले तर बहुजन समाज त्यांना जसाच तस उत्तर देईल कारण मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व बामसेफच्या विचारधारेत वाढलेला कार्यकर्ता हे कदापीही सहन करणार नाही कारण तुकोबांच्या विचारांचा अंगिकार करणारे हे वैचारिक योध्दे आहेत. त्यांना पिंडीवर बसलेल्या विंचवाला कशा पद्धतीने ठेचून मारायचे हे तुकोबांनी सांगितले आहे. त्यामुळे किमान यानंतर तरी मनुवाद्यांनी बहुजन महापुरुषांचा अवमान करणे टाळावे अन्यथा तुमचा शेवट होण्यास वेळ लागणार नाही !.

'भट बोकड मोठा' 

हे पुस्तक घरपोहोच मिळेल

संपर्क - रुक्माई प्रकाशन, बीड

            मो. ९७६२६३६६६२

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...