Home / महाराष्ट्र / "नाचून ऐतिहासिक वास्तू...

महाराष्ट्र

"नाचून ऐतिहासिक वास्तू नासवू नका !"

नाचगाणी करून प्रसिध्दी करण्यासाठी वैष्णवी पाटील हीने तिकडे एखादा तमाशाचा फड जाँईन करून काय अंगप्रदर्शन करायच ते करून स्वतःला खुशाल नागवून नासवून घेत तमाशाचे फड गाजवून खुशाल गाणे वाजवावेत त्याच्याशी आमचा अजिबात संबंध नाही.

"नाचून ऐतिहासिक वास्तू नासवू नका !"

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे

     भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक

      मो. ९७६२६३६६६२

छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त भारतीयांच्या मन मेंदू आणि मस्तकावर अधिराज्य गाजवणारे राजे आहेत. त्यांचा किंवा त्यांच्या कार्याचा कोणी अपमान केला तर आमच्या बहुजन समाजाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती जाणेही योग्य आहे कारण, महीलांचा सन्मान करणारे हेच ते छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी कधीही आपल्या स्वराज्यात महीलांना नाचगाणी करायला लावल नाही ते महीलांचा खुप सन्मान करायचे, कारण राझांच्या पाटलाच उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. आज आमच्या मुली खुप खुप शिकल्या पण त्यांना सोशल मिडीयावर मिळणा-या प्रसिध्दीच्या वेडामुळे आपण कुठे नाचगाणी करतोय याच भाण राहीलेल दिसत नाही. म्हणून तर पुण्यातील लाल महाल येथे वैष्णवी पाटील नावाच्या मुलीने चंद्रमुखी चित्रपटातील गाण्यावर नृत्य केले. तिने बेफाम होऊन खुशाल नाचावे पण आपण नेमक कुठे नाचतोय याच भान तरी ठेवाव. पण ती भान विसरली ही खुप मोठी शोकांतिका आहे. 

वैष्णवी पाटीलने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. यामध्ये ती पुण्याच्या लाल महालात मध्यवर्ती ठिकाणी लावणीवर नृत्य करताना दिसते. वैष्णवी पाटील ही इन्स्टाग्राँम स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख ६२ हजार फॉलोअर्स आहेत. विविध गाणी व डायलॉग यांच्यावर लिपसिंक तसंच नृत्य करणं, यासाठी ती प्रसिद्ध आहे. लाल साडी आणि दागदागिने परिधान करून प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर वैष्णवीने हे नृत्य केलं. हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर प्रसिद्ध करताच लाल महालात केलेल्या या नृत्यावर लोकांच्या बहुतांश नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहून वैष्णवीने हा व्हीडिओ तत्काळ डिलीट केला. (बीबीसी २१ मे २२) लाल महालातील तो नृत्य पाहून मन हेलावून जात कारण शिवशाहीमध्ये महीलांना नागवल, नाचवल आणि नासवल जात नव्हत हे वैष्णवी पाटील ह्या महीलेला माहीत नाही का ?महीलांना नागवणे नाचवणे आणि नासवण्याचे धंदे पेशवाईत चालत होते. ही पेशवाईची घाण वैष्णवी पाटील हीच्या डोक्यात बसली असल्यामुळे तर ती स्वतःला नाचवत ऐतिहासिक वास्तू नासवत आहे. पण  स्वतःला प्रसिध्दी मिळवी यासाठी ऐतिहासिक वास्तू नासवू नको हेच सांगण आहे. प्रसिध्दीला हापापून आपण नेमक काय करतोय याच भाण वैष्णवी पाटील हीला पाहिजे पण अकलेने कमी असलेल्यांना भाण असतेच कुठे ?वैष्णवी पाटील किंवा इतरांनी पुन्हा लाल महालाचा वापर नाचगाणी करण्यासाठी करू नये. नाचगाणी करून प्रसिध्दी करण्यासाठी वैष्णवी पाटील हीने तिकडे एखादा तमाशाचा फड जाँईन करून काय अंगप्रदर्शन करायच ते करून स्वतःला खुशाल नागवून नासवून घेत तमाशाचे फड गाजवून खुशाल गाणे वाजवावेत त्याच्याशी आमचा अजिबात संबंध नाही.

वैष्णवी पाटील हीने इन्टाग्रामवर तो व्हिडीओ शेअर करताच समाजातून तिव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या कारण केवळ शिवजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदुच्या (महीलांना नाचवणा-या, नागवणा-या व नासवणा-या ?) तेहतीस कोटी देवाची फलटन बाद होते अस प्रबोधनकार ठाकरे म्हणाले. त्या शिवाजी महाराज व जिजाऊंचे जिथे वास्तव्य होते तिथेच जर वैष्णवी पाटील सारख्या महीला नाचगाणी करत असतील तर हे कोणालाही सहन होणार नाही म्हणून तर संभाजी ब्रिगेडचे संघटक संतोष शिंदे हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "पुणे महानगरपालिकेने लाल महाल लोकांसाठी बंद ठेवला. मात्र तिथे सिनेमातील गाण्यांवर तसेच तमाशातील गाण्यांवर डान्स करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. इतकी वाईट अवस्था लाल महालाची झाली आहे. महाराष्ट्राच्या स्मृतीस्थळावर असं बिभत्स पद्धतीने गाणं वाजवलं जातं, डान्स केला जातो. मला पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विनंती करायची आहे, तुम्ही यात जातीने लक्ष घाला असे सांगून त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या असे सांगितले." (बीबीसी २१ मे २२) तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका अस म्हणाले (बीबीसी २१ मे २२) वैष्णवी पाटील या महीलेवर कार्यवाही झालीच पाहीजे पण मा. जितेंद्र आव्हाड त्यांच्या महाविकास आघाडी सरकारला विचारावं वाटत की, ज्या बाबा पुरंदरे या विषारी सर्पाने संपुर्ण आयुष्यभर जिजाऊंच्या चारिञ्यावर शिंतोडे उडवले. त्याला देवेंद्र फडणवीस या मनुवादी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले, तेव्हा तुम्ही महाराष्ट्रभर पुरंदरेंच्या नावाने दिंडोरा पिटताना दिसले होते मग तो पुरस्कार आज महाविकास आघाडी सरकार परत का घेत नाही ?म्हणजे जिंतेंद्र आव्हाड साहेब आपणही ढोंगी पणाच करून वेळ मारून नेत तर नाहीत ना ?देवेंद्र फडणवीस जर पुरंदरें सारख्या विषारी सर्पाला पुरोगामी म्हणवून घेणा-या पक्ष प्रमुखांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करत असतील तर पुरोगामी पक्ष प्रमुखांच्या मनाप्रमाणे सत्ताधीस झालेले महाविकास  आघाडी सरकार डाँ. आ.ह. साळूंखे व इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख यांना पुरस्कार देऊन पुरंदरेंच्या पुरस्काराचा बदला घेत का नाहीत ?. बघा जमतय का आव्हाड साहेब केवळ शिवाजी महाराजांची बदनामी होतेय म्हणून बोंबाबोंब करण्यापेक्षा त्यांचे सत्य विचार व इतिहास पोहोचणारांना सन्मान करा हेच त्यावर एकमात्र औषध असेल. 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करताना म्हटले की, "एका फालतू रिलसाठी वंदनीय छत्रपतींच्या स्मृतींनी पावन झालेल्या वास्तूत लावणी करून त्याचे पावित्र्य भंग केले असून असे करणाऱ्या दोषींना फक्त अटक नाही तर तात्काळ कारवाई करून अद्दल घडेल असा धडा पुणे पोलिसांनी शिकवावा." (बीबीसी २१ मे २२) वैष्णवी पाटीले हीने जो करणामा केला तो निंदनीय आहेच. पण आपल्या भाजप पक्ष किंवा त्यांच्या समर्थकांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत त्यांची बरोबरी करण्याच काम हे संघी विचारधारेचे रामदासी गोडावडे करतात तेव्हा तुम्ही कुठे लपून बसता ? केवळ नावात वाघ असला म्हणजे इतरांनी केलेल्या घटनेवर गुरगुर करण्यापेक्षा तिथे भाजप व संघ कार्यालयात थोडीसी गुरुगुर करा. तिथे भाज संघ कार्यालयात नावातला वाघ जागा करा नाहीतर 'चित्रा'तला वाघ काहीच कामाचा नाही अस लोक शंभर टक्के म्हणतील त्यामुळे थोडासा विचार करा.

माजी खा. उदयनराजे भोसले म्हणाले की, "ऐतिहासिक लालमहालात नाच-गाण्यांचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा, ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची व महाराष्ट्राची अस्मिता आहे." तसेच पुणे राष्ट्रवादी काँग्रेसनेच्या वतीने मागणी करताना म्हटले की, "लाल महाल ही पुण्यातील ऐतिहासिक भूमी आहे. जिथे जिजाऊंनी शिवरांयांना स्वराज्याचे धडे दिले. त्याच लाल महालात अशा प्रकारचं कृत्य करणं लज्जास्पद आहे. महिला दिनाला याच महालात आम्ही आदर्श पुरस्कार दिले. याच ठिकाणी पारंपरिक आणि ऐतिहासिक कार्यक्रम होतात. याआधी अशा प्रकारचं कृत्य कधीही घडलं नाही. त्यामुळे यांना अटक झाली पाहिजे. (बीबीसी २१ मे २२) हो लाल महालात जिजाऊ बाल शिवबांना धडे द्यायच्या ही गोष्ट खरी असून ती वास्तू आज नाचगाण्याने कलंकीत केली जातेय. पण दुसरीकडे संघी मनुवादी बांडगुळ दररोज कुठे ना कुठे शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगून त्यांच्याच नावाने मते मागून सत्तेचा उपभोग घेऊन नंतर तेच सत्तेच्या गर्मीने शिवाजी महाराजांच्या कार्याची बरोबर करत आहेत. नरेंद्र मोदी आज के शिवाजी म्हणून संघोटे मिरवतात हे माजी खा. उदयनराजेंना दिसत नाही का ?सत्तेच्या नशेत सर्व काही चालत का ?म्हणून तर सागावं वाटत की, इतर गोष्टींची नशा करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याची नशा केली तर मा. खा. उदयनराजेच काय कोणताही व्यक्ती काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना,  मनसे किंवा भाजप संघाचा हस्तक दलाल होणार नाही हे मात्र निश्चित.

लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले. त्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडकडून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर, अखिल भारतीय मराठा महासंघाने ज्या ठिकाणी हे चित्रीकरण झालं, त्या भागात गोमूत्र शिंपडून त्याचं शुद्धीकरण केलं आहे. (लोकमत २१ मे २२) गोबर गोमुत्र हे केवळ शेतीच्या उपयोगी आहे ते कोणतीही वस्तू किंवा वास्तू पवित्र करू शकत नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कडक करवाई कलण्याची मागणी केली ती योग्य आहे. कारण संभाजी ब्रिगेड गोबर गोमुत्राला कधीही थारा देत नाही. पण मराठा महासंघाच्या लोकांनी तिथे गोमुत्र शिंपडून जो लाल महालाचा अवमान केला तो कधीही विसरता न येणारा आहे. जेवढी ती नृत्य करणारी महीला दोषी आहे तेवढेच लाल महालात गोमुत्राचा वर्षाव करणारे दोषी आहेत. मानवी विष्ठा भक्षण करणा-या गायीच्या गोमुत्राने ऐतिहासीक वास्तूचा झालेला अवमान परत येतो का ?आपण नेमक काय करतोय हेच या मंदबुध्दी लोकांना अजून कळत नसेल तर खुप भयानक आहे. मानवी विष्ठा भक्षण करणा-या गायीच्या गोबर गोमुत्राने कोणतीही वास्तू किंवा वस्तू पवित्र होऊ शकत नाही पण ज्यांच्या मेंदूत केवळ गाय गोबरचा भरणा आहे त्यांना दुसर काय समजणार आहे. ज्या वैष्णवी पाटील हीने लाल महालामध्ये जे नर्तन केल  त्यामुळे तिच्यावर गुन्हा नोंद करून तीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. पण आमची लोक भावनिक होऊन केवळ गोबर गोमुत्रे शिंतोडे उडवून शांत बसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. यापुर्वीही कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने आयोजित केलेल्या शाहु महाराज जयंतीमध्ये अदिल फरास यांनी पायात पादत्राणे घालून फोटो काढले म्हणून त्यांनी चूक मान्य करून माफी मागितली होती. पण  देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटप करणा-या भाजपकडून शाहु महाराज समाधीस्थळ अपवित्र केल म्हणून आकांडताडंव करत तेथिल परिसर गोमुत्र व पंचगंगेच्या पाण्याने स्वच्छ केला होता. सांगायच एवढच की, अदिल फरास जेवढे गुन्हेगार होते तेवढेच समाधीस्थळावर गोमुत्र शिंपडणारे होते हे विसरून चालणार नाही. म्हणून तर नृत्य करणारी वैष्णवी पाटील व गोमुत्राचा वर्षाव करणा-या विरोधात समाजातून तिव्र प्रतिक्रीया येताना दिसत आहेत त्यात फेसबुकवर संध्या ओव्हळ म्हणतात की, एका स्त्री च्या लावणी केल्याने लाल महाल बाटतो आणी गाई च्या मुत्राने पवित्र होतो ?धन्य धन्य झाले आज हा अविष्कार ऐकून !.

शेवटी बहुजन समाजातील तरुणांना सांगांव वाटत की, तुम्ही एखादी घटना घडून गेल्यानंतर तिथे गोबर गोमुत्राचा वर्षाव करून ती वास्तू किंवा वस्तू पवित्र करण्याच्या भानगडीत पडू नका कारण तुम्ही जी कृती करताय ती संघ विचारधारेला मजबूत करणारी असून त्यातून परत एकदा महापुरुषांच्या विचारांचा खून होतोय. आपल्या महापुरुषांच्या चारित्र्यावर, ऐतिहासिक वास्तू किंवा वस्तूवर कोणी अपमानकार टिप्पणी किंवा कृती करण्याची हिंम्मत केली नाही पाहीजे. त्यासाठी तुम्ही आधी स्वतः महापुरुष आणि त्यांची विचारधारा समजून उमजून घेतल्यानंतरच ती समाजाला समजून सांगा. तेव्हाच महापुरुषांना अपेक्षित असलेली समाज व्यवस्था निर्माण होईल, नाहीतर विकृती अपमान करत राहतील आणि तुम्हला केवळ गोबर गोमुत्राचा सडा मारत बसाव लागेल. त्यामुळे वेळीच सावध व्हा गोबर गोमुत्र केवळ शेतीच्या लायक आहे हे आतातरी समजून घ्या !गोबर गोमुत्र डोक्यातून काढा आणि पुस्तक वाचायला सुरूवात करा. 

नवनाथ रेपे लिखित 

'भट बोकड मोठा'

पुस्तक मिळवण्यासाठी

रुक्माई प्रकाशन, बीड 

मो. ९७६२६३६६६२

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...