वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
"डाँ. आगलावेंची वैचारीक आग तेवत ठेवा !"
नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा)
पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
चौतीसावेगळा सहस्रांआगळा ।
विठ्ठल सावळा बुध्द माझा ॥
नाही गदाचक्र आदि शस्त्र हाती ।
अहिंसेची मुर्ती बुध्द माझा ॥
सम हस्त-पाद संम्यकाची दृष्टी।
मंगलाची सृष्टी बुध्द माझा ॥
म्हणे विश्वंभर कटेवरी कर ।
बुध्द विठेवर विराजला ॥
अस 'बिजेचे अभंग' या पुस्तकात विश्वंभर वराट म्हणाले आहेत तर 'बुध्द अवतारी आम्ही झालो संत' अस संत नामदेव महाराज म्हणत. तसेच संत तुकोबाराय, संत बहीणाबाई, संत चोखामेळा, डाँ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांनी तसेच आता डाँ. विलास खरात यांनी पंढरीचा पाडूरंग कोण ?हे पुस्तक लिहून यापुर्वीच पंढरीचा पाडूरंग हा दुसरा तिसरा कोणी नसून तो बुध्द आहे असे सांगितले आहे. त्यामुळे डाँ. प्रदीप आगलावे यांनी जे म्हटल ते मुळीच चुकीच नाही. पण आजची मनुवादी प्रसारमाध्यम मुळाशी जाऊन खर वास्तव सांगण्याऐवजी आगलावेनी आग लावली म्हणून डांगोरा पिटत आहेत. बर झाल डाँ. आगलावेंनी आग लागली या आगीत तरी ही काल्पनीक भष्मासुरांची वास्तवातील मंदीर भस्मसात झाल्यास एकदाचा बहुजन समाज या मायाजाळातून नष्ट तरी होईल. डाँ. आगलावेंनी लावलेल्या आगीचा देशभर वैचारिक वनवा पेटला पाहीजे ह्यासाठी तरुणांनी आधी डाँ. के जमदास लिखित तिरुपती बालाजी एक प्राचीन बौध्दक्षेत्र तसेच डाँ. विलास खरात लिखित पंढरीचा पाडूरंग कोण ? ही पुस्तक वाचली पाहीजेत, तेव्हा खरी मजा येईल. कारण ब्राम्हण समाजातील एकनाथ यांनी देखिल पंढरीचा पांडूरंग बुध्दच आहे अस सांगताना म्हटले की,
नवनवा बैसे स्थिररूप !तया नाम बौध्दरूप !
संत तया द्वारी !तिष्ठाताती निरंतरी !
पुंडलिकासाठी उभा !धन्य धन्य विठ्ठल शोभा !
डॉ. प्रदीप आगलावे पुढे म्हणाले की, 'संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरं ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केलंय. दिवंगत प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, 'ठिकठिकाणाच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या' त्यांमुळे ही सर्व मंदिरं पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करा आणि आमची विहारं परत द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. (साम २५ मे २२) हो डाँ. आगलावे म्हणतात ते योग्य आहे कारण देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की,
स्थूल मनाने इसवी सनाच्या २ -या ३ शतकापर्यत हिंदू जनात व हिंदूस्थानात देवळे घुसलेली नव्हती.... त्या काळच्या कोणत्याही वाड्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला बौद्धधर्मी अशोक सम्राटच्या अमदानीपासून बौध्द भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुन्हा, संघ, मंदीरे ही अस्तित्वात आलेली होती, पुढे पुढे या संघ मंदीरात महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करुन त्यांच्या पूजा अर्चा बौद्धाच्या हीनयान पंथाने सुरू केल्या. हिंदुस्थानात देव देवळांचा उगम शोधीतच गेले तर तो या बौध्द विहारातच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सनाच्या ७-८ व्या शतकांत भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी.... रजपूतांच्या साथीने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. विहारांची नासधुस केली....ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तीचा उच्छेद केला, आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तीनाच थोडा बहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशारीतीने बौद्ध विहारांचे रुपांतर शंकराच्या देवळात झाले.'
ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे म्हणतात की, पढंरपूरचे पांडूरंग मंदिर हे पुर्वी बुद्ध विहार होतं, ही मंदिरं पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करा. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचे विहार होते, आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मुर्ती आहेत, यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती. तसेच आमची विहारं पाडून मंदिरं आणि मस्जिदी बनवल्या गेल्या” असा दावाही डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे. त्यामुळे सध्या ज्ञानवापीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमची विहारं परत द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. (साम २५ मे २२) डाँ. प्रदीप आगलावे म्हणाले ते काहीही चुकीच नाही पण सत्य त्यानांच वाटत ज्यांचा मेंदू मंदीरातील पुरोहीतांच्या सडक्या विचारांनी घेरला नाही. पण आमच्या बहुजन समाजाचे लोक भटांचे हस्तक होऊन भटांच्या चरणावर घालीन लोटांगण म्हणत नतमस्तक होतात त्यांना तर कुत्र्या मांजरा व सापा विचंवात भष्मासूर दिसतो त्यांना काय सांगावे ?म्हणून अशा हस्तकांसाठी थेट डाँ. के. जमनादास लिखित तिरुपती बालाजी एक प्राचीन बौध्दक्षेत्र या पुस्तकाच्या प्रस्तावणेत डाँ. एम.डी.नलावडे म्हणतात की, तेर, ऐहोळ, उन्डावळी, वेरूळ, बद्रीनाथ, आयोध्या, श्रुंगेरी, बुद्धगया तसेच इतर अनेक क्षेत्रे बौध्द होती.....पुरीचे जगन्नाथ, पंढरपुरचे विठ्ठल, केळचे अयप्पा, श्रीशैलम तशीच अन्य मंदिरे ही पुर्वी बौद्ध मंदीरे होती.' तसेच प्रबोधनकार ठाकरे हे त्यांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात म्हणतात की, बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यत) तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यत आमचे हिंदू देव थंडीवा-यात कुडकुडत आणि उन्हातान्हात धडपडत पडले तरी कोठे होते ?विद्वान संशोधकाच्या मते आर्याच्या ऋग्वेदकाळी गणना जास्तीत जास्त इसवी सनापुर्वी ७००० वर्ष धरली तरी इतकी वर्ष हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे ?आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी दुपारी पंचपक्वानाचे भरगच्च ताट पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण ! याशिवाय दिवस सुन्ना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या धुपार्त्या शेजार्त्या आहेतच.' म्हणून तर आज विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
कावळीचे घर उपटी कोकिळा ।
तरी तिच्या गळा हार पडे ॥
बुध्द विहारात घुसला बाबर ।
चोरावर मोर राम झाला ॥
आयोध्या नव्हे ती साकेत नगरी ।
न्यायदरबारी न्याय नाही ॥
म्हणे विश्वंभर कुठे राम राजा ।
शांतीदूत माझा बुध्द आहे ॥
जगद्गुरू तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात की, तोडावया अवघ्या चेष्टाचा संबंध ! शुध्दापाशी शुद्ध बुद्ध व्हावे !तसेच महात्मा फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाच्या प्रस्तावणेत डाँ. विश्राम रामजी घोले म्हणतात की, 'विठोबा हा बौद्धावतार मानिला आहे. विठोबाचे देऊळ बौद्ध लोकांनी बांधलेले आहे.... आर्य धर्मसंस्थापकांनी ते देऊळ बळकावून त्या मुर्तीला विठोबा नाव दिले.' असे सांगितले होते. मग तेच काल परवा डाँ. प्रदीप आगलावेंनी पंढरपुरच्या विठ्ठलाबद्दल वक्तव्य केल तसेच वक्तव्य देहु रोड येथे दि. २५ डिसेंबर १९५४ रोजीच्या भाषणात डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खडा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पांडूरंग कोण ? याचे पहिल्यांदा उत्तर द्या, तो होता कुठे ?त्याला पळविलं कोणी ?कोणी डुबविलं ?पांडूरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन. पुंडलीक या शब्दापासून पांडूरंग हा शब्द झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ.' असे सांगितले आहे. पण, ब्राम्हणवाद्यांनी संभ्रमित वातावरण निर्माण करून मराठा समाजाला बुध्द म्हणजे कोणीतरी वेगळा असून तो आपला नाही असे सांगितले. त्यामुळे मराठा समाजाच्या पुढे नुसत बुद्धांच नाव जरी घेतल तर त्या तरुणांच्या चेह-यावर आट्या पडतात व तोंड वाकड तिकड करत विषयांच विषयांतर करतात हे अल्पबिधी तरुण दिसतात. पण आज देशातील ज्या बहुजन चळवळी आहेत त्यात बामसेफ, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांनी मराठासह बहुजन समाजातील तरुणांना बुद्ध म्हणजे कोणी परका नाही हे सांगितल त्याविषयी डाँ. आ. ह. साळूखे म्हणतात की, बुद्ध कोणी परका नाही. कोणत्याही अर्थाने परका नाही. वैरी तर नाहीच नाही. खरे तर तो आपल्याच अंत:शक्तींचे साकार रुप आहे - आपल्याच सर्वस्वाचे अस्सल सार आहे. आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू, अगदी तंतोतंत तसा बुद्ध आहे. किंबहुना, आपण त्याचे अविकसित पूर्वरुप आहोत आणि तो आपले विकसित उत्तररुप आहे.' त्यामुळे आता मराठा समाजात बुध्द विचारांची गोडी निर्माण झालेली दिसत आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
अंगुलीमाल तो बुध्दाचा चोरला ।
वाल्या उभा केला रामायणी ॥
हस्तगत केली स्तुप नी विहारे ।
बांधली मंदिरे तयावरी ॥
दुस-याचा बाप म्हणू नये पप्पा।
बुध्द नाही सोपा चोरावया ॥
म्हणे विश्वंभर ऐसे हे भामटे ।
केले खोटे नाटे इतिहासाचे ॥
बहुजन समाजातील तरुणांना सांगावं वाटतं की, येथिल धर्मव्यवस्थेने पुरातन विहारावर जो कब्जा केला आहे, तो उधळून लावायचा असेल तर आधी तुम्ही बुद्धीवादी झाल पाहीजे. त्यासाठी के. जमनादास लिखित तिरुपती बालाजी एक प्राचीन बौध्दक्षेत्र हे व डाँ. विलास खरात लिखित पंढरीचा पांडूरंग कोण ?या पुस्तकाबरोबर इतरही वैचारिक पुस्तकांच वाचन कराव लागेल तेव्हाच तुमच्या डोळ्यासमोर सत्य वास्तव येईल. एकदा का सत्य समजल की, मग भटांनी बुध्द मुर्तींना रंगरंगोटी करून जो कब्जा केला आहे तो उधळून लावता येईल. डाँ. आगलावेंनी मंदीर हास्तांतरीत करण्याचा जो पुरोहीतांना इशारा दिला आहे तो योग्यच आहे. हे सडक्या विचारसरनीचे पुरोहीत लोक सहजासहजी कब्जा सोडणार नाहीत त्यासाठी एक जनांदोलन उभे कराव लागेल. म्हणून तर सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुध्द या पुस्तकात डॉ.आ.ह.साळुंखे म्हणालेत की, सुर्य होता आले नाही, तरी सुर्यफूल व्हावे. मस्तक त्याच्याकडे असावे त्याच्या आलोकात पहावे !बुध्द होता आले नाही, तरी बुध्दफूल व्हावे
ह्रदय त्याच्याकडे असावे, त्याच्या स्फुर्तीत जगावे !.' हे समजून उमजून घेतल्यास प्रा. मा. म. देशमुख सरांना अपेक्षित असलेले कार्य पुर्ण होईल कारण ते म्हणतात की, आता बहुजनांतील सर्वजातीय नवशिक्षित तरुण बुद्धाच्या मानवतावादी विचाराने प्रभावित होत आहे. मनुवादी पंड्यांच्या प्रभावाखाली असलेली पंढरपूरसारखी सर्व बौद्ध स्थळे मुक्त होतील हीच मंगल कामना !शेवटी पंढरीचा पांडूरंग दुसरा तिसरा कोणी नसून तो बुद्धच आहे हे कोणताही बुद्धी असलेला व्यक्ती नाकारणार नाही. त्यासाठी नामदेव महाराज सांगतात की,
शोधाचा महाशोध
बोधाचा महाबोध
शुद्धाचाही शुद्ध
बुद्ध विटेवरी !
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...