*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
पुणे :
लाल महालातील राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या समूहशिल्पा मध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवला गेला पाहिजे. पुणे महानगरपालिकेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेली दहा-बारा वर्षं झाली मागणी करून सुद्धा जाणीवपूर्वक सूडबुद्धीने शाळेची महाराज यांचा पुतळा बसवला जात नाही. पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना आणि आत्ता भाजपची सत्ता असताना सुद्धा वारंवार मागणी करून सुद्धा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त मतांसाठी वापर करून त्यांच्या विचारांचा मात्र जागर करत नाहीत. महापौर आणि खासदार यांच्या पुढच्या राजकारणामुळे लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला नाही. ही शिवप्रेमी म्हणून फार मोठी खंत आहे. आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागतील. म्हणून महापालिका आयुक्त यांनी पुतळ्याच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन लालमहालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवावा... अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाल महाल येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. पाच नद्यांचे पाणी आणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पुणे शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपमहापौर दिपकभाऊ मानकर, शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, माजी जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख साहेब यांनी मनोगत व्यक्त केले.
कोथरूड मध्ये शिवसृष्टी होणार होती. मात्र स्थानिक भागातील घाणेरडे राजकारणामुळे कोथरूड येथील ऐतिहासिक शिवसृष्टी चांदणी चौक मध्ये हलवण्यात आली. हे घाणेरडे राजकारण पुण्यात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणारे... शिवाजी महाराजांच्या विचारांशी मात्र गद्दारी करत आहे, हे सहन होणार नाही. शिवसृष्टी चे काम का थांबवले गेले ते तात्काळ सुरू करावे.
सौ. अप्सरी कासीम शेख संभाजी ब्रिगेड महिला आघाडी विभाग अध्यक्ष येरवडा
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, सचिव संदीप कारेकर, सिद्धार्थ कोंढाळकर, कुमार पवार, अविनाश घोडके, कीर्तिकुमार घोरपडे, राजेश आडसूळ, शंकर तात्या कुटे, सौ. अप्सरी कासीम शेख, जनता वसाहत चे अध्यक्ष मनपल्ली सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....