Home / महाराष्ट्र / कोकण / *ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत...

महाराष्ट्र    |    कोकण

*ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत विष्णुपूरीकर यांना कै. यशवंत पाध्ये स्मृति पुरस्कार*

*ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत विष्णुपूरीकर यांना कै. यशवंत पाध्ये स्मृति पुरस्कार*

 

(आशा रणखांबे ) 
मुंबई , 
नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत पंडितराव विष्णुपूरीकर यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र मुंबईचा कै. यशवंत पाध्ये पुरस्कार 2022 देण्यात येत असल्याची घोषणा मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे संस्थापक, अध्यक्ष  एकनाथरावजी बिरटवकर यांनी केले असून हा पुरस्कार 4 जुन 2022 रोजी मुंबई येथील मराठी ग्रंथ संग्रहालय डॉ.सुरेद्र गावस्कर सभागृह दादर मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र मुंबई या राज्य स्तरीय संस्थेच्या 21 वा वर्धापन दिन सोहळा या निमित्ताने पत्रलेखकांचे राज्य स्तरीय संमेलन 4 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
याच सोहळ्यात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृति पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि कै. यशवंत पाध्ये स्मृति पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत विष्णुपूरीकर यांना प्रदान करण्यात येत आहे.
या समारभांचे अध्यक्ष  सुकृत (खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार, संपादक दैनिक प्रहार )


तर प्रमुख अतिथी  भारत सासणे (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन )  व  ए.के.शेख (सुप्रसिद्ध कवी, गझलकार),  डॉ. लक्ष्मण शिवणेकर (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक) या मान्यवराच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
 याच कार्यक्रमात रंगतदार प्रकाशन निर्मित आणि वंदना एकनाथ बिरवटकर लिखीत ‘काव्यवंदना’ आणि ‘हृदन’ या दोन काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते होणार आहे.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....