Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / उत्तम* *शासनकर्ती* ----...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

उत्तम* *शासनकर्ती* ---- *अहिल्यामाता* *होळकर*

उत्तम* *शासनकर्ती* ----      *अहिल्यामाता* *होळकर*

 

*

उत्तम शासन कर्ती,उत्तम प्रशासक, लोककल्याणकारी व्यक्तिमत्व म्हणून लोकमाता अहिल्यामाता होळकर यांचा नामोल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल.
   आपला राजदंड कायम शोषणाच्या विरोधात व शोषितांच्या बाजूने वापरणाऱ्या अहिल्यामाता यांचा जीवन प्रवास असंख्य अडचणींचा, संघर्षाचा, तडजोडीचा आणि आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.         आदर्श मुलगी,आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श माता, लोकमाता या आपल्या भूमिका त्यांनी निष्ठेने, जबाबदारीने आणि आपले कर्तव्य समजून पार पाडल्या आहेत. त्यांचा इतिहास, त्यांचे विचार, कार्य आजच्या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या जनतेला दिशादर्शक ठरतील, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याचे बळ देतील.
   31मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदीच्या तीरावर वसलेल्या चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला. सुशिलाबाई आणि माणकोजी शिंदे या मातापित्यांनी त्यांच्यावर उच्च संस्कार केले होते. चौंडी गावच्या पाटीलकीचा मान माणकोजी शिंदे यांच्याकडे होता.  उत्तम शेती बरोबर गावचा कारभार ही ते उत्तम पद्धतीने करीत असत. ते युद्ध कलेमध्ये पारंगत होते. पेशव्यांचे बोलावणे आले की ते त्यांच्याकडे जात असत. त्यांना पाच मुले होती आणि एक कन्या अहिल्या.
     अहिल्या चे शिक्षण आपल्या भावंडांच्या बरोबरीने सुरु झाले.त्यांना लिहिता-वाचता येत होते.युद्धशास्त्रात त्या पारंगत होत्या.घोड्यावर बसणे, दानपट्टा चालवणे,तीर मारणे,नेम धरणे, तलवार चालवणे या कलांमध्ये त्या अतिशय तरबेज झाल्या होत्या.या शिक्षणामुळे  त्यांच्यामध्ये धाडस,आत्मविश्वास निर्माण झालेला होता. सर्व शिक्षणाचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यामध्ये झालेला दिसून येतो.
    एके दिवशी त्या घोड्यावर बसून शेताकडे जात असताना त्यांना दोन वाटसरू भेटले एक होते बाजीराव पेशवे दुसरे होते सुभेदार मल्हारराव होळकर. त्या दोघांना तहान लागली होती. त्यांनी अहिल्या कडे पाण्याची विचारणा केली. अहिल्याने त्यांना शेतात नेले.त्यांना पाण्यात अगोदर कांदा भाकर खायला दिली आणि नंतर पाणी दिले. त्यावेळी ती म्हणाली, " तहानलेल्यांना पाणी देण्यापूर्वी दोन घास जेऊघाले आमचा धर्म आहे." सात-आठ वर्षांची हुशार, चुनचूनीत व धाडसी मुलगी पाहून मल्हारराव माणकोजी शिंदे यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपला मुलगा खंडेराव यांच्यासाठी लग्नाची मागणी घातली. अहिल्या माता यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी 20मे 1733 रोजी पुणे येथे झाला.
   मल्हारराव महाराज युद्धशास्त्र निपुण, धाडसी,व्यवहार कुशल होते. अनेक अधिकार त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी मिळवलेले होते. दुसरे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ नंतर स्वतः पंतप्रधान होण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती आणि त्यांचे कर्तुत्व ही त्या पदाला न्याय देणारे होते पण त्यांच्या या विचाराकडे कोणीही लक्ष दिले नाही, त्यांची कदर केली नाही,कारण ते शूद्र होते.
    मल्हाराव महाराज मात्र गप्प न बसता स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि इंदोरला राजधानीचे ठिकाण करून स्वतंत्र राज्यकारभार त्यांनी सुरू केला.
   मल्हारराव यांच्या पत्नी आणि अहिल्या माता यांच्या सासुबाई गौतमाबाई अतिशय हुशार, धाडसी, धैर्यवान,स्पष्ट बोलणाऱ्या आणि युद्धशास्त्र पारंगत होत्या. बाजीराव आणि त्यांना खाजगी जहागिरी दिली होती. मल्हारराव महाराजांनी त्यांना स्वातंत्र्य हक्क अधिकार दिले होते. मल्हार राव महाराज  युद्धावर गेल्यानंतर त्या राज्यकारभार सांभाळत.
    नऊ वर्षांच्या अहिल्या इंदोरला आल्या.त्या गौतमाबाईंना राज्यकारभार सांभाळण्यात मदत करू लागल्या. त्यांनी समजदारी व बुद्धीच्या गुणांमुळे सासू-सासर्‍यांचे मन जिंकले होते व त्यांचा विश्‍वास मिळविला होता.
     मल्हारराव महाराज युद्ध होऊन परत आल्यानंतर अहिल्या मातांना राज्यकारभाराचे धडे देत असत देशाची स्थिती राजनीती व्यावहारिक शिक्षण डावपेच युद्ध क्षेत्रातील कामगिरी युद्धातील आणि राज्यकारभारातील समस्या व त्यावरील उपाय शासन-प्रशासन इत्यादी बाबींवर त्यांच्या चर्चा होतअसत. या विषयातील बारकावे मल्हारराव महाराज यांना  समजावून सांगत असत.ते गौतमाबाई व अहिल्या माता यांना तिर्थक्षेत्राला घोड्यावर बसून पाठवत असत. या पाठीमागचा हेतू हा असायचा की त्यांनी आपल्या राज्याची भौगोलिक, सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय स्थितीची माहिती करून घ्यावी आणि त्यांनी या सर्व क्षेत्रातील माहिती करून घेतली होती. मल्हारराव व खंडेराव युद्धावर असताना राज्याचा महसूल गोळा करणे,न्याय देणे, आर्थिक,सेना विषयक,गोळा बारूद,रसद, तोफा,बैल, चारा बंदी इत्यादी कामे अहिल्यामाता स्वतः पहात. त्यांना संपूर्ण भारताची भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय संदर्भातील  माहिती झालेली होती. सासरे व पती यांच्याबरोबर अनेक वेळा त्या युद्धावर गेलेल्या आहेत. सासू-सासरे व पती यांनी अहिल्या मातांना सर्व विषयावरील परिपूर्ण शिक्षण दिले होते. इतिहास,वेद, पुराण यांचे वाचन त्या सातत्याने करत. त्यांच्याकडे चिकित्सक वृत्ती होती. प्रत्येक गोष्टीत चिंतन -मनन करून सत्य शोधण्याचा त्या प्रयत्न करीत असत. त्या बुद्धिप्रामाण्यवादी होत्या.
       अहिल्या माता यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.अनेक दुःखद घटना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. सासू-सासरे,पती,मुलगा, नातू या जवळच्या माणसांचे निधन झाले. मुलगी सुना सती गेल्या. अशा दुःखद प्रसंगात ही स्वतःला सावरत त्यांनी प्रजेला आपली संतती मानली.आणि आयुष्यभर प्रजेच्या सुखात,आनंदात स्वतःचा आनंद मानला. एक उत्तम शासनकर्ती म्हणून जगात नावलौकिक मिळवला. त्या काळात आहिल्यामाता जगातील सर्वश्रेष्ठ महाराणी ठरल्या.
    महाराज मल्हाररावांच्या निधनानंतर 16 कोटीचे धन स्वतःच्या खाजगी मालकीचे होते. तो सर्व पैसा त्यांनी जनतेच्या सुखसोयी साठी,समाज हितासाठी, लोककल्याणासाठी वापरला.स्वतः योजना आखल्या,कामाचा आराखडा तयार केला. रस्ते,राहण्यासाठी धर्मशाळा, पिण्याच्या पाण्याची सोय,स्नानासाठी गरम पाण्याची कुंड,घाट बांधले.अन्नछत्रे उघडली. वृक्षारोपण केले. भारतामध्ये एकूण साडेतीन हजार ठिकाणी अशा पद्धतीची त्यांनी कामे केलेली आहेत.यातून कारागिरांना, कामगारांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिलेला होता.
     महाराणीनी स्त्रियांना युद्धाचे शिक्षण देऊन त्यांची सेना निर्माण केली होती. त्यांना स्वातंत्र्य, हक्क, अधिकार, न्याय मिळवून देण्याचा  प्रयत्न केलेला आहे.अन्याय, अत्याचार होणार नाही यासाठी योजना आखल्या होत्या. तसे झालेच तर स्वतः पीडित स्त्रिया राणीकडे अर्ज करीत. त्यांना कधीही दरबारात येण्यापासून कोणीही अडवू शकत नव्हते.
   शेतीमध्ये त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणलेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या साठी विशेष सुविधा त्यांनी उपलब्ध केलेल्या होत्या शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी वेळेवर सोडविले जात. शेतकरी, मळेवाले श्रीमंत झाले पाहिजेत हा त्यांचा हेतू होता.उद्योग - व्यवसायालाही  त्यांनी चालना दिली होती. माहेश्वरी येथे जगप्रसिद्ध कपड्यांचा उद्योग त्यांनी उभा केलेला होता.
    राज्यातील सामान्य जनतेला ही वेळेवर न्याय मिळण्यासाठी त्यांनी न्यायालयात योग्य न्यायाधीशांची निवड केलेली होती. ज्यांना योग्य न्याय  मिळत नसे ते राजमाते कडे अर्ज करून न्याय मागत.स्त्रियांनाही न्याय मागण्याचे अधिकार त्यांनी दिलेले होते. ताबडतोब व वेळेवर न्याय देण्याची व्यवस्था असल्यामुळे तुरुंग निर्माण करण्याची गरजच नव्हती. लोकमाता जगातील पहिली आदर्श राज्यकर्ती स्त्री ठरली.
    पण इतिहासकारांनी आणि साहित्यिकांनी हा मानव कल्याणाचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा इतिहास फारसा उजेडात आणलाच नाही. पण त्यांना सातत्याने एक धार्मिक स्त्री म्हणून पुढे आणले.हातात पिंड घेतलेली दीनवाणी अशी अहिल्यामाता आमच्या समोर उभी करण्यात आली.
   अहिल्यामाता एक चिकित्सक, विज्ञाननिष्ठ,कालबाह्य रूढी परंपरातून बाहेर पडलेली एक धाडसी, व्यवहारकुशल, हुशार स्त्री होती.आणि त्यांच्या याच इतिहासाच्या अभ्यासाची आज गरज आहे.
    जेव्हा वीर खंडेराव यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या नऊ बायका व अहिल्यामाता सती जाणार होत्या. मल्हाररावांनी त्याही परिस्थितीत आपल्या रयतेचा, प्रजेचा विचार केला आणि अहिल्या मातांना सती न जाण्याचा सल्ला दिला. अहिल्या मातानी पोथ्या पुराणे वाचली होती,त्यावर चिंतन केले होते.सती गेल्यामुळे मोक्ष मिळतो यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. या अंधश्रद्धेला झुगारून त्या महाराज मल्हाररावांना म्हणाल्या, सती गेल्यावर मोक्ष मिळविण्यापेक्षा जिवंत राहून आपल्या प्रजेला सुखी करण्यासाठी मी माझे आयुष्य पणाला लावीन.
   देवघरात जप-तप,उपवास करण्यापेक्षा रणांगणावर युद्ध करून, प्रजेला सुखी करण्यात, आनंदी करण्यात,आपली कर्तव्य पार पाडण्यास त्यांनी आपली पूजा मानली.
   अनेकदा आलेल्या प्रतिकूल परिस्थितीत वर त्यांनी मात केलेली आहे. स्वतःवरील विश्‍वास कधीही कमी होऊ दिलेला नाही. त्या कर्तव्यापासून कधी दूर झाल्या नाहीत. सासू-सासरे, पती, मुलगा,नातू,मुलगी,सुना सर्व जवळची माणसे निधन पावली तरीही स्वतःवरील विश्वास ढळू न देता,कोणतेही कर्मकांड, कालबाह्य रूढी परंपरा त्यांनी आचरणात आणलेल्या नाहीत .   तरीही त्यांना सत्तर वर्षांचे आयुष्य लाभले आहे.13 ऑगस्ट 17 95 रोजी त्यांचे निधन झाले.
     शिक्षणामुळे शहाणपण येते आत्मविश्वास धाडस वैज्ञानिक दृष्टिकोण निर्णय क्षमता तयार होते. अहिल्या माता यांच्या आईवडिलांनी त्यांच्या इतर पाच भावांच्या बरोबरीने त्यांना युद्धशास्त्र व इतर विषयाचे शिक्षण दिले होते. मुलगा-मुलगी भेदभाव त्यांनी केलेला नव्हता. ज्या कुटुंबामध्ये स्त्री-पुरुष समानतेचा विचार शिकलेला असतो स्त्रियांचा सन्मान केला जातो त्यात कुटुंबामध्ये सुख समाधान असते.अशी कुटुंबे विकास आणि प्रगती करू शकतात. महाराज मल्हाररावांनी पण आपल्या पत्नी गौतमी बाईना बरोबरीचे स्थान दिले होते. त्यांना मानसन्मान दिलेला होता. खासगी जहागिरी मिळवून दिलेली होती.हक्क-अधिकार दिले होते. लढाईवर जातानाही त्यांना लढण्यासाठी बरोबर घेऊन जात. आपल्या सुनेला ही सर्व प्रकारचे शिक्षण, हक्क, अधिकार त्यांनी दिले होते. सासरा आणि सुन यांचे एक आदर्श उदाहरण म्हणजे मल्हारराव होळकर आणि अहिल्यामाता आहेत.भारतातील सर्वच महापुरुषांनी स्त्रियांना समतेने, ममतेने वागवले आहे. त्यांचे हक्क-अधिकार दिले आहेत.
      भारतामध्ये अशा अनेक महामाता घडून गेलेल्या आहेत. त्यांनी आपला एक स्वतःचा दैदिप्यमान असा इतिहास निर्माण केलेला आहे. हा इतिहास आज समाजासमोर येणे, तो समजून घेऊन कृतीत आणणे ही आजच्या काळाची गरज आहे. याच इतिहासातून पाठ व प्रेरणा घेऊन आपण स्त्री पुरुष समानतेचा आणि शोषण मुक्त समाजव्यवस्थेचा नवा इतिहास निर्माण करू शकतो. जगातील एक सर्वोत्तम शासनकर्ती अहिल्यामाता होळकर यांना कोटी कोटी प्रणाम.
  ????????????????????????????????????????

    -- डॉ निर्मला पाटील. सांगली.
   
  Mobil- 9822725678.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...