वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
"
संकलन - हंसराज कांबळे
नागपूर ✍️
इतिहासाची ही पुनरावृत्ती होईल का? या विचारानेच माझे काळीज चर्र होते.यात आणखी एक चिंतेची भर पडलेली आहे. कारण,जातीभेदांच्या बुज- बुजाटात आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष व तत्वप्रणाल्याचाही एकच गोंधळ उडालेला आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता देशात अग्रस्थानी मानून तत्वप्रणालीस दुय्यमस्थानी मानेल की तत्वप्रणालीसच देशाच्या डोकीवर ठेवेल? याचे उत्तर मला काही माहित नाही.तथापी, एवढे मात्र निश्चित की, जर देशापेक्षाही तत्वप्रणाली श्रेष्ठ मानण्यात आली तर पुह्ना एकदा आपल्या देशाचे स्वातंत्र्य जाईल, आणी ते कधीही परत मिळणार नाही. या संदर्भात घटने संबंधी आपण डोळ्यात तेल घालून दक्ष असले पाहिजे.
भारताला लोकशाहीची ओळख नव्हती असे नव्हे. भारतामध्ये एकेकाळी अनेक प्रजासत्ताक राज्ये तसेच राजघराणीही होती. जेथे राजे लोक राज्य करीत तेथे देखील लोकमतानुसार कारभार चाले, अगर राजाच्या अनियंत्रित सत्तेवर नियंत्रणे टाकण्यात येत. पार्लमेंट अगर पार्लमेंटरी पद्धती भारतास माहीत नव्हत्या, असेही नव्हे. बौद्ध भिक्षुकांच्या संघांचे परिशील न केल्यास हे स्पष्ट दिसून येते की, भारतात नुसती पार्लमेंटच होती असे नव्हे तर आधुनिक पद्धतीचे पार्लमेंटरी नियमही त्यांना पूर्ण माहिती होते.पार्लमेंटात कोणी कोठे बसावे, ठराव कसे आणावे, कोरम कसा आसवा, पक्ष प्रमुख कोणास मानावे, गुप्त मतदान कसे करावे, अविश्वासाचा ठराव कसा संमत करावा वैगरे संबंधी बौद्ध भिक्षुकांनी आपल्या संघात नियम केले होते. हे पार्लमेंटरी नियम गौतम बुद्ध फक्त भिक्षुकांच्या संघासच लागू करीत होते हे खरे असले तरीही बुध्दाने ते नियम तत्काळी चालत असलेल्या राज्य पद्धतीतुन घेतले असावेत हे नाकारले जाऊ शकते आहे.
वरील प्रकारची लोकशाही पद्धती भारतातून निघून गेली आहे. तिची पुह्ना एकदा हकालपट्टी होईल काय? तेही मला माहीत नाही. परंतु गेली, कित्येक वर्ष या देशातील लोकशाहीवर माती पडली असल्याकारणाने लोकशाहीच्या ठिकाणी हुकूमशाही स्थापना होईल की काय अशी भीती वाटते अथवा लोकशाही नावाला राहील आणी व्यवहारात हुकूमशाहीच नांदेल. यापैकी दुसराच धोका अधिक संभवनीय वाटतो.
लोकशाहीच्या पुरस्कर्त्यास व संरक्षकास जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो :-
" मोठयातल्या मोठया माणसाच्या देखील चरणावर तुह्मी आपले स्वातंत्र्य अर्पिता कामा नये. अगर शासन संस्थाचा तो दुरपयोग करील एवढी सत्तादेखील त्याजकडे तुह्मी विश्वस्त म्हणून ठेऊ नये. "
ज्यांनी आपली उभी ह्यात सेवेसाठी खर्ची घातली याबाबत दनियल कॅनल आयरीश देशभक्ताचे विचार ध्यानात ठेवण्यासारखे आहेत. तो म्हणतो :-
" मोठया माणसाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर एखाद्यास आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागत असेल, अगर एखाद्या स्त्रीस तिचे शील भ्रष्ट करावे लागत असेल तर ते कसे शक्य आहे? अगदी याच न्यायाने राष्ट्राचे स्वातंत्र्यच एखाद्या मोठया व्यक्तीकडे गहाण ठेऊन कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तेही शक्य नाही. "
या धोक्याच्या इशाऱ्याची आवश्यकता इतर देशापेक्षा भारतात अधिक आहे. कारण, भारतीय राजकारणात, भक्तीचा, निष्ठेचा अगर विभुतीपूजेचा जेवढा खेळ दिसतो त्याला जगातील विभूतीपूजेत कोठे तोडच सापडत नाही. धार्मिक भक्तीत आत्म्याची मक्ती असू शकेल परंतु राजकीय भक्ती मधून खात्रीलायक अध:पाताचा मार्ग आहे. त्यातूनच हुकूमशाही निर्माण होते.
आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ठ होऊन चालणार नाही. राजकीय लोकशाहीचे रूपांतर आपण सामाजिक लोकशाहीतही केले पाहिजे. सामाजिक लोकशाहीचा आधारभूत पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही फार दिवस टिकाव धरू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय? समता, स्वातंत्र्य व भातृ- भाव निर्माण करणाऱ्या जीवन पद्धतीस सामाजिक लोकशाही म्हणतात. समता, स्वातंत्र्य व भातृभाव या त्रिवेणीची अलग अलग फारकत करता येणार नाही. ज्यांचे ऐक्य अविभाज्य आहे. यातील एक एक तत्व वेगळे करून त्यांची परस्परांपासून फारकत करणे म्हणजे लोकशाही चा हेतू हाणून पडण्यासारखे आहे. स्वातंत्र्य समतेपासून अलग करता येत नाही.अगर स्वातंत्र - समतेला भातृभावा पासून दूर लोटता येत नाही. समता नसेल तर केवळ स्वातंत्र्यामुळे मूठभर लोकांची मिरास बहुल भारतीय समाजावर माजल्याशिवाय राहणार नाही. समता असेल आणी स्वातंत्र्य नसेल तर व्यक्ती साहसास संधी राहणार नाही. भातृभावाचा अभाव असेल तर समता व स्वातंत्र्य नैसर्गिकपणे कार्यच करू शकणार नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचाच बंदोबस्त ठेवला पाहिजे.
परस्परविरोधी तत्वाचा हा खेळ किती काळ आपण आपल्या जीवनात चालू देणार? ही विसंगती आपण अशीच चालू दिली तर राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. अगदी शक्य तो तातडीने ही विसंगती दूर केली पाहिजे. नाहीतर, विषमतेच्या ज्वालांनी जे तावून सुलाखून निघाले आहेत, ते राजकीय लोकशाहीच्या चिंधडया उडवतील, आणी एवढ्या परिश्रमाने आपल्या घटना समितीने जे कार्य केले आहे ते मातीमोल ठरेल.
भातृभावाचे तत्व सर्वांनी मान्य केले पाहिजे. परंतु, भातृभाव म्हणजे तरी काय? आपण सर्व भारतवासीय एकाच मायेची लेकरे आहोत असा भाव निर्माण होण्यास भातृभाव म्हणतात. भारतीय लोक येथून तेथून एक अशी भावना निर्माण करणारे हे तत्व आहे. सामाजिक ऐक्य साधनारे व समाजाची शक्ती वाढविणारे हे तत्व आहे. भातृभाव निर्माण करणे अत्यन्त कठीण आहे.
भारत जातीने बुजबुजला आहे. या जाती स्वभावता: राष्ट्र विरोधी आहेत, असे म्हणण्याचे कारण असे की, त्या परस्परात द्वेष व तिरस्कार निर्माण करतात. तथापि, आपल्याला भारतास राष्ट्र बनवावयाचे असेल तर या अडचणीतून आपण मार्ग काढलाच पाहिजे. कारण, भातृभावाशिवाय स्वातंत्र्य समतेचे पापुद्रे अगदीच काचोळ्यासारखे राहतील. या देशातील राजकीय सत्तेवर मूठभर लोकांची मक्तेदारी राहीली असून बाकीचे बहुसंख्य लोक हमालीच करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना मिरासदारी लांडग्यापुढे ' भक्ष्य ' म्हणून टाकण्यात येत आहे. त्यामुळे चांगल्या जीवनाची गरिबांना संधी मिळत तर नाहीच, उलट त्यांचे जीवनसत्वच नष्ट करण्यात आलेले आहे. या पददलित लोकांना दुसऱ्याच्या हुकमती खाली राहण्याचा आता पुरा कंटाळा आला आहे. ते स्वतःच राज्य कारभार करण्यास अत्यन्त उत्सुक आहेत.
स्वातंत्र्य ही केंव्हाही आनंदाची गोष्ट आहे, परंतु स्वातंत्र्या बरोबर फार मोठया जबाबदाऱ्याही आपल्या शिरावर आल्या आहेत. हेही आपल्याला विसरता येणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आता कोणत्याही घोडचुकीसाठी ब्रिटिशांना दोषी धरून चालणार नाही. जर येथून पुढे चुका झाल्यात तर त्याबद्दल आपल्या शिवाय दुसऱ्या कोणालाही दोष देता येणार नाही. चुकीच्या मार्गाने गोष्टी घडण्याचा मला पार जबर धोका दिसतो. काळ फार झपाट्याने बदलत आहे. जगातील व आपल्या देशातील लोकही नवनवीन तत्वप्रणाली कडे आकर्षिले जात आहेत. केवळ नाममात्र ' लोकराज्याचा ' त्यांना कंटाळा आला आहे. त्यांना ' लोकांकरिता ' राज्य हवे आहे.
तेंव्हा ' लोकांचे, लोकांकडून चालणारे राज्य ' या तत्वाचे आपल्याला परिपालन करावयाचे असेल तर वर उल्लेखीलेल्या धोक्याची दखल घेण्याबाबत आपण सुस्त रहाणार नाही अशी प्रतिज्ञा दरेकाने घ्यावयास पाहिजे नाहीतर ' लोकांकरिता ' असणाऱ्या राज्याकडे जनता ओढली जाईल आणी आपल्या घटनेचे संरक्षण आपल्याला करता येणार नाही. या एकाच मार्गाने देशाची सेवा करता येईल. दुसरा अधिक चांगला मार्ग निदान मला तरी माहीत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
( दि.25/11/1949)
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...