Home / महाराष्ट्र / कोकण / *मूकनायकाच्या हाकेची...

महाराष्ट्र    |    कोकण

*मूकनायकाच्या हाकेची १०२ वर्ष*, *कल्याण नगरीत पत्रकारितेचा जागर!

*मूकनायकाच्या हाकेची १०२ वर्ष*,  *कल्याण नगरीत पत्रकारितेचा जागर!

*

( कल्याण / ठाणे प्रतिनिधी)

     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०२ वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली. मूकनायकचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी मुंबईत प्रकाशित करण्यात आला. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं होतं. त्या भूमिकेतूनचं बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाची सुरुवात केली.    मूकनायकाच्या याच धरतीवर  कल्याण तालुक्यात मूकनायक ते प्रबुद्ध भारत टीम द्वारा आंबेडकरी पत्रकारितेचा वैचारिक जागर  पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण येथे घालण्यात आला.  हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 
         या कार्यक्रमा समयी विचारमंच्यावर  प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून पत्रकार सुजात प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले  तर  प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत , फिल्ममेकर सोमनाथ वाघमारे , विद्रोही कवी  अनिल शिंदे , कवी जीवन संघर्षकार  फेम   नवनाथ रणखांबे, कवी संविधान गांगुर्डे  मान्यवर उपस्थित होते . कवींनी काव्य  वाचन कविता  - गजल सादर करून उपस्थितांची मने जिंकली .  यावेळी शाहीर मेघानंद जाधव यांच्या वादळवारा कार्यक्रमाचा  कल्याण नगरीत रसिकजनांनी आनंद लुटला.  तसेच चित्रकार किर्तीराज, पूजा कदम आणि सुनील अवचार यांच्या कलाकृतींनाही प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.

       कार्यक्रमाचे  प्रास्ताविक कमलेश उबाळे यांनी केले तर  सूत्रसंचालन स्नेहल सोहनी यांनी केले आणि  आभार रोहित डोळस यांनी मानले. सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने  लोकांनी उपस्थिती दर्शवली होती.
      सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील जवळगेकर, हर्षद बोले, आदित्य कांबळे, तुषार माळवी,  यांनी अथक परिश्रम घेतले .

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....