वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
पुणे प्रतिनिधी :
महाराष्ट्रात फक्त धर्माचा राजकारण सुरू आहे. विद्वेषाचे प्रतीकं ही पुजली जात आहेत. सामाजिक आणि धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी सरकार पुरस्कृत काही मंडळी महाराष्ट्रात वाद निर्माण करत आहेत. लोकांना भावनिक करून सोयीचं राजकारण करण्यासाठी मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा देश चालवणार्या लोकांकडून पुरस्कृत केलेला स्टंट सध्या देशभर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा इतर सगळे नेते हे घाणेरड्या राजकारणाला पाठिंबा देत आहेत. म्हणून नवनीत राणा, राज ठाकरे, ओविसी सारखी माणसं धार्मिक आणि धर्मांध राजकारणाचं विष पेरत आहेत हे थांबलं पाहिजे. लोकांच्या मूलभूत प्रश्नांना किंमत दिली पाहिजे. सध्या देशात महागाईने सर्वसामान्य जीवन उध्वस्त झाले आहे याला सर्वस्वी प्रधानमंत्री जबाबदार आहेत. म्हणून सर्वप्रथम महागाई, जीवनावश्यक वस्तूची किंमती कमी करून लोकांना रोजगार, नोकरी याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा 2024 पर्यंत हे सरकार टिकणार नाही... असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत,' हे लहानपणापासून आम्ही वाचत, म्हणत आणि ऐकत आलेलो आहोत. हेच आम्ही शेवटपर्यंत निर्विवाद चालवत ठेवू. तुम्ही कितीही धर्माचं राजकारण करा, आम्ही भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत... हेच म्हणत राहु. कुणालाही जातीयवाद पसरू देणार नाही... हीच संभाजी ब्रिगेड ची शिकवण आहे. म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्या 365 व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही भारत माझा देश आहे हाच संकल्प ठेवून संभाजीराजांना अभिवादन करू. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची गरज महाराष्ट्राला आहे... असेही मत संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कात्रज येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, सचिव संदीप कारेकर, राजेश आडसुळ, सचिन शिंदे, नितिन वाघिरे, मंदार बहिरट, विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...