Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / *मृत्युंजय छ.संभाजी...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

*मृत्युंजय छ.संभाजी महाराज* - रामचंद्र सालेकर

*मृत्युंजय छ.संभाजी महाराज*         - रामचंद्र सालेकर


------------- 
विश्वातील आदर्श राजा छ.शिवाजी महाराजांना पुरंदरच्या किल्ल्यावर सईबाईच्या पोटी १४ मे १६५७ ला पुत्ररत्न जन्माला आले. स्वराज्याचा दुसरा छत्रपती, असा राजा की जो दहा ही दिशा संकटांनी घेरलेला.जन्मा पासून मृत्यूपर्यंत संकटे आणि यातना यावर मात करत जणू मृत्युंजयच नव्हे तर महा विद्वान, महा पराक्रमी,महान सुसंस्कृत राजा परंतु घरभेद्यांनीच जगज्जेता असण्याची कुवत असलेल्या या आपल्या राजाला अगदी ३१ वर्षात कपट कारस्थानाने संपविले.अल्पशा कारकिर्दित त्यांनी केलेल्या कामगीरीला जगात तोड नाही.
 "छ.संभाजी" नाव कानी पडताच किंवा मुखातून उच्चारताच डोळ्यापुढे येतात स्वराज्याच्या संघर्षात एकही पराजय न पाहलेला सुर्यतेजाप्रमाने दिपवून टाकणारा पराक्रमाचा धगधगता ज्वाला म्हणजे छ.संभाजी महाराज. जन्माला येताच अवघ्या दोन वर्षात हरपलेलं मातृछत्र ते मृत्यूच्या भयान यातनांना पराजीत करणारा मृत्युंजय म्हणजे छ.संभाजी महाराज. अनगनीत संकटांना तोंड देणारा जणू हिमालय म्हणजे छ.संभाजी महाराज. अवघ्या चौदा वर्षाच्या बालवयात मोठ मोठ्या तत्ववेत्यावर मात करणारे  बुदभुषण,नायिकाभेद,नखशिख,सातसतक इ.लिहीलेले ग्रंथ अभ्यासल्यास त्यांच्या विद्वत्तेची जगात तोड नसणारा,अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला,अथांग ज्ञानसागर असलेला असामान्य राजा म्हणजे छ.संभाजी महाराज. कसल्याही प्रकारच्या व्यसनाला आपल्या जीवनात स्पर्श होवू न देणारा अतिउच्च जीवनमुल्य जपणारा राजा छ.संभाजी महाराज.आयुष्याच्या अवघ्या ३१ वर्षात छ.संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सर्व आघाड्यांवर एवढी दैदिप्यमान कामगीरी करण्याचं कारण शोधल्यास आपल्या लक्षात येईल की छ. संभाजी महाराज हे स्वकर्तुत्वातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या विश्वातील आदर्श छ.शिवाजी महाराजांचा वारसाच नव्हे तर उच्च कोटीची तालीम देवून तावून सलाखून निर्माण केल्या गेलेला शिवरायांनी स्वतःच्या राज्यभिषका सोबतच आपल्या बाजुला बसवून स्वराज्याचा उत्तराधिकारी म्हणून युवराज्यभिषक करुन नेमलेला स्वराज्याचा वारस होता. जन्मताच मातृत्वाला मुकलेला परंतु विश्वातील आदर्श मातृत्वाची खाण असलेल्या राष्ट्रमाता राजमाता माॕ. जिजाऊंच्या संस्कारात घडलेला सुसंस्काराचा सुगंध म्हणजे छ.संभाजी महाराज होते.छ.शिवाजी महाराज  उमेदीच्या अवघ्या पन्नास वर्षाच्या अर्ध्याच आयुष्यात व छ. संभाजी महाराज फक्त एकतीस वर्षाच्या आयुष्यात एवढं दैदिप्यमान कार्य बघता जर दोन्ही राजांना शंभर वर्ष आयुष्य मिळालं असतं तर विश्वस्वराज्य निर्माण केलं असतं.असे म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही.
 समता, स्वातंत्र्य ,बंधुता या मौलीक विचारधारेवर निर्माण केलेले स्वराज्य व या मुल्यांची आपल्या आयुष्यात काटेकोर पालन करणारे छ.शिवराय व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराज्याचा हा गाढा पुढे नेणारे छ.संभाजी हे विषमतावाद्यांना काट्याप्रमाणे सलत होते.
   छ.शिवरायांच्या मृत्युसमयी राजधानी रायगडावरील संशयास्पद परिस्थितीच्या सर्व हालचाली अभ्यासता छ.शिवरायांचा नैसर्गिक मृत्यु नसून स्वराज्याच्या पेशवे कारभाऱ्यांकडूनच घातपात झाल्याचे छ.संभाजी राजांना परिस्थितीची संपुर्ण जाणिव होताच त्या मोरोपंत, राहुजी पंत, अनाजी पंत,...सारख्या कारभाऱ्याना छ.संभाजीने मृत्युदंडाची हत्तीच्या पायी,कडेलोट करुन शिक्षा दिली तेव्हा सर्व स्वराज्यद्रोही पंत पेशवा कंपुंनी मराठा स्वराज्य नष्ट करण्यासाठी मोगल इंग्रज ..या सर्व शत्रूशी हातमिळवणी करुन मराठा साम्राज्य नष्ट करण्याचा विडाच उचलला होता. छ.शिवरायांनी स्वकष्टाने निर्माण केलेलं स्वराज्य जर मोगलांनी संपविले असते तर मोगलांची सत्ता आली असती परंतु मराठ्यांची सत्ता जावून पेशवाई आली यावरुन स्वराज्याचे खरे शत्रू  हे पेशवे असल्याचे सिद्ध होते.याच फितुरांनी छ.संभाजी राजांना पकडून हाल हाल करुन मारण्याचे महापाप औरंगजेबाच्या माथी मारुन केले. एवढ्यावरच न थांबता बखरी लिहुन संभाजी महाराजांची व्यसनी, बदफैली, दुराचारी, क्रोधी, स्वराज्यद्रोही ......अशी प्रतीमा रंगवून त्यांना बदनाम केलं.पुढे बखर या अनैतिहासिक साधनाचा आधार घेवून शिवकाळानंतर आजतागायत याच स्वराज्यद्रोह्यांच्या पिलावळांनी छ.संभाजी महाराजांवर बदनामीकारक पात्रे रंगवून अनेक कादंबऱ्या नाटके  साहित्य लिहून या महान आदर्श राजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. एवढच नव्हे तर वर्तमानकाळातही या नतभ्रष्ट्यांची जेम्स लेन सारख्या विदेशींना हाताशी धरुन विश्वातील आदर्श राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंवर चिखलफेक सुरुच आहे. अशावेळेस छ.संभाजी महाराज असते तर यांचे काय केले असते याची कल्पनाच न करने बरे ! 
  तरीपण मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड...व इतर ३३ कक्षाच्या माध्यमातून  सत्य इतिहासाचे संशोधन करुन आपल्या लेखनी रुपी शस्त्राने तथा विधायक संविधानीक मार्गाने  माॕ.जिजाऊ, छ.शिवाजी,संभाजी महाराजांना अभिप्रेत असणारा 'मानव हिच खरी जात व मानवता हाच खरा धर्म' अशी शिकवन देणारा प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक अंधश्रद्धा विरहित विज्ञाननिष्ठ बळीसिंधुशिवसंस्कृतीतील महान अशा शिवधर्माच्या तत्वज्ञानाने या विकृतींना परास्त करीत आहे.
   ✒️  *रामचंद्र सालेकर,* राज्यउपाध्यक्ष  
शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद,महाराष्ट्र 
मोबा.9527139876

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...