वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
जात धर्म सोडून कामगार म्हणून एकत्र या श्रम हाच तुमचा धर्म आहे भारत देशाचा खरा मालक हा फक्त कामगार आहे बाहेर च्या देशात तिथले कामगार तिथला देशचालवतात कोरोनाच्या ह्या धामधुमीत जवळपास 14/15 कोटी कामगारांचा रोजगार गेल्या दोन वर्षात गेला आहे आणि कित्येकांचा जाणार आहेआधीच चुकीच्या धोरणामुळे देश खड्ड्यात घातलाच आहे.येणारा काळ कामगारांसाठी अत्यंत संघर्षाचा असणार आहे कामगारांचे आणि मालकांचे संघर्ष आता सगळीकडे पाहायला मिळतील कामगार मग तो कुठला ही असो सर्वांनी आता संघटित होऊन कायम स्वरुपी नोकऱ्या,(कंत्राटी नोकऱ्या नको) किमान वेतन,सर्व सुखसोयीया साठी येणाऱ्या काळात आग्रही राहील पाहिजे. "कामगार" जो पर्यंत कामगार म्हणून एकत्र येतं नाही किंवा मतदान करणार नाहीत तोवर हे चित्र बदलणं अशक्य आहे.जगातल राजकारन हे कामगार नेते आणि कामगार चालवतात,पण जो पर्यंत आपल्या इथे जाती धर्मावर सर्जिकल स्ट्राईक राष्ट्रपुरुषांच्या स्मारकावर व मंदिर मस्जिद धर्मावर व फाजील अस्मितेवर मतदान चालत आहे तो पर्यंत कठीण आहे. म्हणून उठा जागे व्हा तुमची कामगार अस्मिता जागी ठेवा.तुम्ही ह्या देशाचे खरे मालक आहात.आप आप सातली भडवेगिरी दलाली बाजूला ठेवा देशात तयार होणाऱ्या संपत्तीचे खरे मालक तुम्ही आहात. कामगार म्हणून स्वाभिमानाने जगा कंपनी चे किंवा व्यवस्थापणाचे "भडवे"म्हणून नका जगू...।
मालक आणि कामगार यांच्या संघर्षात मी कामगारांची बाजू घेईन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य त्यांनी किती पुढचा विचार करून बोलले असतील ह्याची आज पदोपदी आठवण येते.कामगार नेत्यांनी आणि कामगारांनी पण हे वाक्य कायम डोक्यात फिट करून ठेवावे.कंत्राटी कामगार पद्धती हा संपूर्ण कामगार चळवळीला लागलेला मूळ रोग होय ही ‘महाअवदसा’ असून.ती संपूर्ण भारतात ल्या कामगार कर्मचारी वर्गाच्या अन्नात माती कालवेलतुम्हांला विचार करणारे मेंदू आहेत विचार करा कामगारांनो आपल्या संसद विधिमंडळात रोजगारनिर्मितीवर चर्चा होते पण,तो रोजगार,ती नोकरी कुठल्या लायकीची असावी,यावर सगळेच प्रस्थापित राजकीय पक्ष मूग गिळून असतात! अशातऱ्हेनं, ‘राजकीय वटवृक्षा’चा आधार नसलेल्या कामगार चळवळ नावाच्या वेलीला उत्तरोत्तर,पायदळी तुडवणं, भांडवली-व्यवस्थेला अगदीच सोप्पं काम झालं.इथे भारतात मात्र,धोरणं कुठून राबवली जाणार? म्हणून आपल्याकडे ‘किमान-वेतन’, हे धड बेकार भत्त्याच्याही लायकीचं नसतं आणि असं, तुटपुंज ‘किमानवेतन’, एकही पैसा खर्च न करता १०० वर्षांचं एकत्र केलं; तरच, कुठे ठाणे, पुणे, मुंबई सारख्या शहरांमधून 1BHK फ्लॅट घेणं शक्य होईल,नाहीतर १० × १० च्या कोंदट कोंडवाड्यात रहाणाऱ्या शहरी श्रमिकांची मोठी शोकांतिका होय..
अमेरिकेचे अध्यक्ष . जो बायडेन यांनी त्यांच्या कार्य काळाला १०० दिवस पूर्ण होत असताना,संपूर्ण अमेरिकेतील सगळ्याच राज्यांमध्ये ‘किमान-वेतन’ प्रति महिना 50 हजार करण्याची हाक दिलेली आहे आणि कामगार संघटनांच्या (Unions) अधिकच्या बळकटीकरणासाठी कामगारकायद्यात अनुकूल बदल करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत भारतातल्या कुठल्या प्रधानमंत्री मुख्यमंत्र्याने,असं काही अखिल कामगार कर्मचारी वर्गासाठी भरीव भरघोस योगदान देलंय कधी किंवा देतील का हा विचार कामगारांनी करावा.? इथे भारतामध्ये वेतनमान वाढणं दूर राहीलं; पण तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे कामगार कर्मचारीवर्गाचे जगभरात कामाचे तास कमी होतं असताना आपल्याकडे गंगाउलटी वहातेय सध्या आपल्या अर्थव्यवस्थेची केवळJobless Growth अशी वाटचाल नसून, तंत्रज्ञानाचा बेसुमार व गैरवापर करतं जॉबलॉस ग्रोथ (Jobloss Growth) हा भयंकर ‘कॉर्पोरेट-फंडा’ चालू झालाय एकीकडे कंपन्यांच्या वार्षिक उलाढाली वाढत चालल्यात; तर दुसरी कडे नोकऱ्यांची संख्या मात्र,अद्ययावत तंत्रज्ञानामुळे घटत चाललीय अशी जीवघेणी विसंगती आपल्या अर्थ व्यवस्थेत निर्माण झालीय.त्यामुळे, (६ × ७ = २४ अशा) सर्वांसाठी सहा सात तासांच्या शिफ्ट्स् होणं (ज्यातून, ३३% बेकारीदेखील आटोक्यात येईल आणि सार्वजनिक वहातूक व्यवस्थेवरचा ताणही कमी होईल) ही काळाची गरज असण्याच्या पार्श्वभुमीवरचं, हे मन सुन्न करणारं चित्र आहे.
‘कंत्राटी’ सापळ्यात अडकलेला तरुण कंत्राटी कामगार कर्मचारी वर्ग ही महाराष्ट्राची नवी दुर्दैवी ओळख बनलीय,काश्मीरमधला आतंकवाद एकवेळ परवडला पण, उद्योग सेवा क्षेत्रात ‘स्मशान-शांतता’ पसरवणारी सध्या सर्वत्र प्रचलित असलेला कंपनी दहशतवाद (Corporate Terrorism)हा जास्त खतरनाक (भाडोत्री बाऊन्सर्सचा सढळ वापर तसेच,कामगार खातं व इतर संबंधित सरकारी यंत्रणा यांच्याशी साटंलोटं करुन कायदेकानून धाब्यावर बसवून निर्माण केली जाणारी) करोडो आत्म्यांचा आक्रोश बनलेली ही,राष्ट्रीय दृष्टीकोनातून सर्वात मोठी व भयंकर समस्या असतानाही राजकीय प्रशासकीय व्यवस्था तर सोडाच पण, देशात अस्तित्वात असलेल्या लाखो NGOS देखील त्याविषयी अवाक्षर सुद्धा काढत नाहीत कारण, पुन्हा तेच, क्षुद्र स्वार्थापोटी “या सगळ्यांचीच जीभ गळून पडलीय!” लहानसहान व खरंतर राजकीय प्रशासकीय व्यवस्थेचे विषय असलेल्या,नसत्या भानगडीत गुंतून समाजसेवेचा आपला तथाकथित कंड शमवत,देशातल्या सगळ्यात मोठ्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि अन्यायी-अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध तोंडातून ‘ब्र’सुद्धा न काढणाऱ्या या लाखो NGOs करायच्यात काय? फक्त, बक्कळ देणग्यांमधून आपली आर्थिक सोय लावत व स्वतःचं फसवं समाधान करत, या ‘संस्थान’ बनलेल्या खाजगी स्वयंसेवी-संस्था (NGOs), शोषक अन्यायी राजकीय प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याचंच काम करतात.। या सरंजामी व्यवस्थेतले बडे बडे सरकारी अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या न्यायालयांवर ढकलून मोकळे होताहेत, हेच चित्र सगळीकडे दिसतंय. न्यायालयं काय म्हणून कामं करतील.?कामगार’ नावाचा उल्लेख असला तरी कामगार खातं, नक्की काय काम करत आणि कुणा साठी राबतं, हा मोठा संशोधनाचाच विषय आहे. संप करायची कामगारांनी चुकूनमाकून कधी नोटीस दिलीच तर, झोपेतून जागं झाल्यागत तत्परतेनं त्यात अडथळे उभं करणारं हे कामगार खातं, एरव्ही कामगारांच्या पोटतिडकीच्या प्रश्नांवर अगदी षंढ आणि थंड असतं! कामगार सचिवांना, कामगार-मंत्र्यांना, कामगार आयुक्त उपायुक्तांना भेटा नाहीतर, शेकडो निवेदनं द्या.तरीही,बेकायदे शिररित्या सर्वत्र सर्रासपणे चालू असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती बाबत ते ढिम्म् हलणार नाहीत. राजकारणी कामगारांच्या हितासाठी कायदे करायला तयार नाहीत, उलट पक्षी जे थोडेबहूत शिल्लक आहेत, तेही ते रद्द करु पहातायत.“कामगार कायदे म्हणजे, मालक कायदे”, “कामगार खातं म्हणजे, मालक खातं”, ही भीषण परिस्थिती आहे. कंपनी दहशतवादा मुळे ( Corporate-Terrorism), हाताळणीच्या दृष्टीनेकामगार चळवळीच्या ताकदी बाहेरचे, हे विषय झालेत कामगार कर्मचारी वर्गामध्ये थोडी जरी राजकीय जनजागृती निर्माण झाली पाहिजे..।
‘शकुनी/भेदनीति’च्या दोन शब्दांनी कामगारांनी स्वतःमध्ये हकनाक करुन घेतलाय त्यातूनच सध्या औद्योगिक जगतात,कामगारचं कामगाराचा खरा शत्रू बनलाय मालक व्यवस्थापनं, हे त्याचे नंतरचे शत्रू होतं! कंत्राटी कामगार जणू जिवंत हाडा मांसाची माणसंच नव्हेत,अशा आविर्भावात कंपन्यांमधून उरले सुरले कायम’कामगार कर्मचारी त्यांच्या प्रति अत्यंत संवेदनशून्यतेनं वागताना दिसतात व फक्त,आपल्या नोकऱ्या टिकतील कशा आणि पगार-बोनस वाढतील कसे, एवढाचं आत्यंतिक स्वार्थी,संकुचित व नीच दृष्टीकोन बाळगतात जे नेमकं, “फोडा आणि झोडा” या कुटील नीतिने, या सगळ्या बदमाष व्यवस्थापकिय मंडळींच्या चांगलंच पथ्यावर पडतं! त्यातबहुसंख्य कंपन्यां मधून ‘कमिटी मेंबर (यात,अनेक चांगले अपवादही असतात पण सुक्या बरोबर हे ओलं जळून जाताना पहावं लागतं) नावाची स्वार्थी,अज्ञानी ‘बांडगुळं’ (जी बहुशः, कामगारांनी नव्हे तर, कंपनी दहशतवादाच्या बळावर,लोकशाही तत्त्वाचा साफ गळा घोटून HR/IR व्यवस्थापकिय मंडळींनीच निवडलेली असतात) स्वतःचा स्वार्थ,फुकटचा मिळणारा मोठेपणा जपण्यासाठी सगळीकडे सर्रास कामगारांचा घात करतात अशांना आपल्या व्यवस्थापकीय स्वार्थासाठी हवा भरुन तट्ट फुगवण्यात व्यवस्थापकीय मंडळी एकदम वाकबगार असतात आणि गरज संपली की, त्यांना बऱ्याचदा टिश्श्यूपेपरसारखं लागलीच वापरुन फेकूनही देतात..।
म्हणून कामगार एक जूट कशा राहिल हा गोष्टींचा सर्व कामगारांनी विचार केला पाहिजे तर कुठे बद्दल घडेल आणि आता “कुणी बोध घेवो अथवा न घेवो, कुणाचा ‘जीभ’ नावाचा अवयव शिल्लक असो वा नसो” म्हणून म्हणता की बंधू-भगिनीनों कामगारांनो श्रम हाच तुमचा धर्म होय..महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तसेच माझ्या सर्व कष्टकरी शेतकरी कामगार बांधवांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शिव्येच्छा दिल्या.
✍️संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे पुणे - 9689446003
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...