सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
( प्रतिनिधी उल्हासनगर / ठाणे ) भारतीय वार्ता :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीच प्रेरणा, शक्ती आणि ऊर्जा आहे. प्रज्ञावंत ज्ञान सूर्य डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सन्मार्गावर जे जे चालले त्यांचे कल्याण आणि उत्कर्ष झाला आहे . त्यांनी दिलेल्या सन्मार्गावर जे जे चालणार आहेत त्यांचे ही कल्याण आणि उत्कर्ष होणार आहे. जातीचा आणि धर्माचा चष्मा काढून पहा बाबासाहेबांचे कार्य मानवतावादी आणि कल्याणकारी आहे. ते मोजता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती घराघरात साजरी झाली पाहिजे .बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करून त्यांचा प्रचार आणि प्रसार जोमाने केला पाहिजे. आयोजक शिवाजी गायकवाड हे बाबासाहेबांच्या सन्मार्गावर चालले असून जनजागृती आणि सामाजिक प्रबोधन ते उत्कृष्ठ करीत आहेत. असे मत प्रसिद्ध कवी नवनाथ रणखांबे, प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने आयोजित भीम जयंती महोत्सव 2022 गणेश नगर, सेक्शन 39 , उल्हासनगर - 5 येथे यावेळी बोलतांना व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर भाऊ कांबळे ( शिव सेना शाखा प्रमुख) यांनी यावेळी बोलताना साहित्यिक नवनाथ रणखांबे, प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते यांनी छान प्रकारे आपल्या व्यख्यानातून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे व्यख्यान मलाही फार आवडले आहे. असे मत व्यक्त करून या कार्यक्रमाचे अध्यक्ष केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी आभार मानले. तर प्रमुख वक्ते भरतजी गोंगोत्री ( सभाग्रह नेते ) यांनी भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रिया राजेश पेठारे यांनी करून प्रमुख मान्यवरांचा परिचय दिला. मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.
मान्यवरांचा सन्मान आयोजकांकडून करण्यात आला तर मान्यवरांच्या हस्ते भीम जयंती महोत्सवातील कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास मान्यवर म्हणून प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विविध पुरस्काराने सन्मानित असलेले जीवन संघर्षकार साहित्यकार नवनाथ रणखांबे , भरतजी गोंगोत्री ( विरोधी पक्ष नेता) , सागर भाऊ कांबळे ( शिवसेना शाखा प्रमुख) , हरि आल्हाट ( संपादक जनहित न्यूज) , मनोहर कदम ( सायकल वरून जग फिरणारे ) आदी मान्यवर आणि बहू संख्याने लोक उपस्थित होते.
भिम जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवाजी गायकवाड , जनार्दन पारधे, अमर पवार, रणजित साळवे, धनराज साबळे , गणेश साबळे ,अनिता जाधव, यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन आणि आभार रणजित साळवे यांनी केले.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...