वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
*
भारतीय वार्ता :पुणे महानगरपालिकेला अनाधिकृत बॅनर (होर्डिंग) चा शहरात व उपनगरात सुळसुळाट झालेला आहे त्यामुळे पुणे शहराचे विद्रूपी करणं झाल्याचे समोर येत आहे,या विरोधात वांरवार तक्रार केली तरी बॅनर काढले जात नाहीत. छोट्या-मोठ्या चौका-चौकात सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पुण्यात बॅनर युद्ध सुरु झाले आहे, त्याचा परिणाम अपघात वाळीवर झाला असून हे तात्काळ थांबलं पाहिजे.अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.पुण्यात बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली तर संबंधित अधिकाऱ्यांना त्या तक्रारीवर पैसे कमावण्याचे नवीन साधन मिळतं असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला ज्यांच्याविरोधात तक्रार केली असेल त्यांच्याकडून सर्रास पैसे घेऊन प्रकरण मिटवले जाते. मात्र दिलेल्या तक्रारीचा निकाल लागत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर, आतील रस्त्यांवर, उपनगरांमध्ये नगरसेवकांच्या दहशतीखाली व आशीर्वादाने सर्रास अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले जातात, अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ते लहान करून टाकले आहेत..या सगळ्यां व्यवस्थेला पाठीशी कोण घालत आहे...? हे शोधून काढलं पाहिजे.असा सला पण दिला.
पुणे मनपा कडे तक्रार करून सुद्धा जर कर्तव्ये कसूर करीत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई होणार नसेल तर जबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे. बरेच कर्मचारी त्या त्या ठिकाणी दहा-वीस वर्षापासून नोकरी करत असल्यामुळे सर्वांचे सवते 'सुभे' झालेले आहेत. बरेच खालचे कर्मचारी हे नगरसेवकांचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. हेच लोक अनधिकृत बांधकामांना अनधिकृत होर्डिंग आणि बेकायदेशीर कामांना अभय देतात. या सर्वांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
नगरसेवकांच्या घरातील आई-वडिलांची, काका-मामांची नाव उद्याने, दवाखाने, चौक, मनपा शाळा, सभागृह इ. यांना देण्याचा संबंध काय...? ज्यांचं शून्य काम असतं... अशा लोकांची नावं उद्यान, दवाखाने, मनपा शाळा व चौकांना दिली जातात हे थांबले पाहिजे. पैसा जनतेचा...! आम्ही टॅक्स भरतो आणि नगरसेवकांची आणि त्यांच्या कुटुंबाची नाव दिली जातात हे थांबलं पाहिजे. मा. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन सर्व उद्याने, शाळा, सभागृह, दवाखाने चौक व इतर ठिकाणची नगरसेवकांच्या नातेवाईकांची सर्व नावे तात्काळ रद्द करावीत... अन्यथा दहा दिवसात संभाजी ब्रिगेड पुणे महानगर पालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करणार आहे.असा इशारा प्रदेश संघटन राज्य अध्यक्ष संतोष शिंदे यानी दिला आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...