Home / महाराष्ट्र / मराठवाडा / *नवनाथ रणखांबे यांना...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

*नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान*

*नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार  प्रदान*

 

( प्रतिनिधी    )ठाणे :

      नवनाथ रणखांबे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल  जागतिक आंबेडकरवादी  साहित्य महामंडळाच्यावतीने   दीक्षाभूमी , नागपूर  येथील ऑडिटोरियम सभागृहात  दुपारी १२ वाजता  प्रमुख अतिथी भंते नागार्जून सुरई ससाई ( अध्यक्ष, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) यांच्या हस्ते    डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार  नवनाथ रणखांबे  यांना देऊन गौरविण्यात आले आहे.   जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा  वर्धापन दिन ,पुरस्कार वितरण समारंभ , ग्रंथ प्रकाशन  व सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात  संपन्न झाला. यावेळी प्रा. दीपककुमार खोब्रागडे  ( अध्यक्ष , जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळ) , उदघाटन  डॉ. चंद्रशेखर मेश्राम ( आंतरराष्ट्रीय मेंदूरोग तज्ञ),  
डॉ.रवींद्र तिरपुडे (कार्यवाह)  
डॉ. गोविंदराव कांबळे ( कार्याध्यक्ष)  ,  सुजित मुरमाडे ( सरचिटणीस )   डॉ. सुमा  टी.  रोडनवर ( हिंदी विभाग प्रमुख  ,  मंगलूर विद्यापीठ )   आदी मान्यवर उपस्थित होते. 
       नवनाथ रणखांबे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य वैचारिक चळवळच्या आंदोलनात आघाडीवर असणारे व्यक्तिमत्त्व  आहे.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा  आपल्या लेखणीच्या  माध्यमातून  ते प्रचार आणि प्रसार करीत  आहेत .
    " नागपूर हे ऐतिहासिक शहर प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  घेतलेल्या धम्मदीक्षा सोहळ्यामुळे  या शहराची नोंद जगाच्या इतिहास झाली आहे. बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र, धम्मक्रांतीचे विध्यपीठ , प्रेरणापीठ, क्रांतिपीठ, विचरपीठ, तत्वज्ञानपीठ, शक्तीपीठ, वैचारिक आंदोलनाचे नागपूर शहर याठिकाणी  आज पहिल्यादाच आलो आहे. तो ही  डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी!  नागपूरच्या साहित्यिकांनी  माझ्य 'जीवन संघर्ष'  पुस्तकावर  परीक्षणे लिहिल्यामुळे येथील साहित्यिक आणि   या शहरातील प्रसार माध्यमाद्वारे मी अगोदरच येथे पोहचलो आहे.  या शहराचा  आणि माझा पिढ्यानपिढ्याचा संबंध आहे. डॉ. बाबासाहेब हेच माझी प्रेरणा , ऊर्जा आणि शक्ती  आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन मी  विविध क्षेत्रात कार्य करीत आहे. आज त्यांच्या नावाने मिळणारा मानाचा पुरस्कार  दीक्षाभूमीवर  मला मिळतो आहे याचा आनंद होतो आहे. सद कार्य करण्यासाठी   मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळली आहे.  आता अजून  माझ्यावर सामाजिक   जबाबदारी आणि बांधिलकी  वाढलीआहे."
   असे नवनाथ रणखांबे यांनी यावेळी बोलतांना  मत व्यक्त केले.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...