Home / महाराष्ट्र / मराठवाडा / *औंध मधील डॉ.पंजाबराव...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

*औंध मधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह तात्काळ सुरू करा - संभाजी ब्रिगेड*

*औंध मधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह तात्काळ सुरू करा - संभाजी ब्रिगेड*

*औंध मधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह तात्काळ सुरू करा - संभाजी ब्रिगेड*

 

मराठा समाज लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर राज्य सरकारने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वस्तीगृहाची निर्मिती केली. पुण्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख (औंध आयटीआय, पुणे) वस्तीगृहाचे उद्घाटन 2018 मध्ये तत्कालीन मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. मुलांसाठी २५० आणि मुलींसाठी ५० आसन क्षमता असणारे हे वस्तीगृह सध्या बंद आहे. सरकारचा प्रचंड भोंगळ कारभार सुरू असून वस्तीगृहात प्रवेश असणारे मागील वर्षातील विद्यार्थी वारंवार जिल्हाधिकारी व सरकारकडे पाठपुरावा करत असताना सुद्धा जाणीवपूर्वक सरकारच्या निष्क्रिय पणामुळे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू होत नाही. कोरोना काळातील बिकट परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील 'मुलांकडे राहिला घर नाही आणि खायला पैसे नाहीत' अशी परिस्थिती असताना सरकार त्यांचा छळ करत आहे, हेच महाविकास आघाडी सरकारचे निष्क्रियपणाचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या मुलाची पुण्यात प्रचंड हेळसांड होत आहे. पुण्यातील बंद केलेली सर्व वस्तीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी... अशी संभाजी ब्रिगेडची मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हाधिकारी यांना विनंती आहे... अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह व प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू झाले पाहिजे. अन्यथा गुरूवार दि. ३ मार्च २०२२ पासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन औंध आयटीआय समोर 'अमरण उपोषण' करण्यात येईल. मुळात राज्यामध्ये शाळा, महाविद्यालय सुरू झालेली असताना सुद्धा राज्य सरकार मुलांचे वस्तीगृह सुरू करू नाही, हे दुर्दैवी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह, पुणे मध्ये पूर्ण वेळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून मुलांना जेवणासाठी सुद्धा उत्तम प्रकारची मेस (खाणावळ) त्या ठिकाणी सुरू करावी. मागील काळात याच हॉस्टेल मध्ये दोन वर्ष मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हते. यापेक्षा दुर्दैवी अवस्था काय...? तसेच सदर वसतिगृहासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्यात यावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

आज गरजू मुलांनी भेट घेतली. यावेळी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे, संदिप लहाने पाटील, विद्यार्थी हर्षवर्धन शिंदे, स्वप्निल चौधरी, स्वप्निल बहीर, जयेश सोनवणे, अभिषेक शिंदे आदी उपस्थित होते.

सुडबुद्धीच्या राजकारणात महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, बे-रोजगार तरूण, नोकर भरती... इत्यादी तरुणांचे प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांवरील होणारा अन्याय संभाज ब्रिगे  सहन करणार नाही.असा इशारा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड संघटन राज्य अध्यक्ष यानी दिला.

 

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...