Home / महाराष्ट्र / मराठवाडा / रयतेचे राजे छ. शिवाजी...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

रयतेचे राजे छ. शिवाजी महाराज

रयतेचे राजे छ. शिवाजी महाराज

रयतेचे राजे छ. शिवाजी महाराज

'खुप वेळा झालं शिवरायांना डोक्यावर मिरवण्याचं

आता गरज आहे शिवरायांना डोक्यात शिरवण्याचं'

'केवळ एक शिवाजी हे नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते' असे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणत त्या शिवरायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्लावर माॅसाहेब जिजाऊ यांच्या पोटी १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. पण तरीही काही विकृती शिवरायांच्या शिवजयंतीविषयी तिथीचा घोळ घालून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बहुजन समाजातील तरुणांना सांगावे वाटते की,

'तिथीशी आपले एकदाचे नाते तोडा

अन् तारखेशी आपले नाते घट्ट जोडा

पण जर कोण तिथी परत बोलला

तर त्याचे तिथेच तिथीला थोबाड फोडा'.

स्वत:च्या घरचा पाण्याचा हौद खुला करून शिक्षणाची गंगा घरघरापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं संपुर्ण आयुष्य खर्ची घालत ते महात्मा फुले हेच शिवजयंतीचे जनक आहेत. पण आज काही मनुवादी विकृती समाजा समाजामध्ये वाद भडकवण्याठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून दंगल घडवताना दिसतात पण शिवराय खरेच मुस्लिम द्वेष्ठे होते का ?तर याचे उत्तर नाही असेच मिळेल. तरीही आमच्या बहुजन समाजातील तरुणांना ते खरे वाटत नाही. कारण त्यांच्यासमोर आजपर्यंत नाटक, कथा, कांदबरी, पोवाडे यामधून खोटा आणि विकृत इतिहास लिहण्याचे व सांगण्याचे कटकारस्थान काही मनुवादी विकृत लांडग्याचा कळप सतत करताना दिसतो त्यामुळे तोच शिवरायांचा खरा इतिहास आहे असे समजून आमचा बहुजन समाज बसला त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही कधीही पोवाडा न लिहिलेल्या अथवा न गायिलेल्या शिवद्रोही स्वयंघोषीत शाहीर बाबा पुरेदरेंचा उदो केला. म्हणून तर शिवराय म्हणजे केवळ मुस्लिमांचे शत्रू हा समज लोकांच्या मनामनात कायम बसला परंतू काॅ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकातून मानवतादी लोककल्याणकारी धर्मनिरपेक्ष खरे शिवराय व त्यांचे ढाल तलवार याव्यतिरीक्त असलेले कार्य जगासमोर मांडण्याचे धाडस काॅ. गोविंद पानसरे यांनी केले म्हणून मनुवादी बांडगुळांनी त्यांना खुलेआम छातीवरती गोळ्या घातल्या.

जगाला हेवा वाटावा असे विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य आहे पण त्यांच्या उज्ज्वल व पराक्रमी इतिहासाचे विकृतीकरण करणा-या विकृतींना आजही ही मनुवादी शासन व्यवस्था 'महाराष्ट्र भुषण व पद्मविभूषण पुरस्कार' देऊन सन्मानित करते व आमचे राजकीय बांडगुळ त्या शिवद्रोही महाराष्ट्र भूषणच्या चित्तेत उडी घेतात की काय ?अस वाटत होत तेव्हा म्हणावेसे वाटते की,

'अरे आहे कसे म्हणावे देशात लोकशाही,

खुर्चीमध्ये बसले खुन्याचे खुले शिपाई,

हे निष्पाप माणसांना घालतात गोळ्या,

अन् सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही'

छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जाती मधील मावळ्यांना स्वत: सोबत घेऊन रयतेच राज्य निर्माण करून ०६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक करून छत्रपती झाले होते. पण शिवराय हे इतर राजकुमाराप्रमाणे वासराहक्काने राजसिंहासनावर विजारमान झालेले छत्रपती नव्हते.

शिवरायांचा स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला हे आपलं स्वराज्य आहे असं वाटतं होत त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर शिवा न्हावी कारण त्यांना माहीत होते की, आपण पकडले जाऊत  आणि आपला जीव जाणार हे माहीती असताना देखिल त्यांनी जबाबदारी स्विकारली होती. कारण त्यांना वाटत होतं की मी हे कार्य माझ्या स्वराज्यासाठी करतो आहे. आग्र्याच्या प्रसंगातील मदारी म्हेतर, हिरोजी फर्जंद तसेच पावनखिंड लढवणारे बाजीप्रभू अशा प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती ती म्हणजे आपण मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहीजेत.

छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. शिवराय म्हणत की, 'स्त्री ही मराठ्यांच्या मंदीरातील देवता आहे'. पण एकदा वतनदार रांझ्याच्या पाटलाने गरीब शेतकऱ्यांच्या मुलीला दिवसाढवळ्या उचलुन नेऊन भोगली त्यामुळे अशा जगण्यापेक्षा मरण बरं म्हणून त्या मुलीने जीव दिला त्यावेळी सारा गाव हळहळ व्यक्त करत होता हीच गोष्ट शिवरायांच्या कानावर पडली तेव्हा त्यांनी त्या पाटलाच्या मुसक्या आवळून पुण्यास आणून त्याचे हातपाय कलम केले होते. त्याचवेळी सर्वसामान्य रयतेला वाटलं की मुलीवर अत्याचार केला म्हणून पाटलाला शिक्षा झाली. तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच भावना निर्माण झाली की, शिवराय जर आमच्या माता भगिनींची अब्रु लुटणाराला शिक्षा देतात तर मग आपण त्यांच्यासाठी प्राण दिला पाहीजे. 

१६७८ मध्ये सकुजी गायकवाड यांनी २७ दिवस लढुन बेळवाडीचा किल्ला जिंकला पण सुड भावनेतून त्यांनी किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांच्यावर बलात्कार केला. ही बातमी जेव्हा शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी सकुजी गायकवाड यांचे डोळे काढून जन्मभर तुरूंगात डांबून ठेवले होते. तसेच शिवरायांनी दुष्मनांच्याही आई बहीणांचा सन्मान करताना त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन सन्मान केला होता. पण आजची परिस्थिती बघितली तर जे लोक शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत येतात त्यांचेच काही सहकारी दिवसाढवळ्या महीला मुलींना उपभोगताना दिसतात तेव्हा अशा विकृतींच्या तोंडी छ. शिवरायांचे नाव शोभते का ?

आज देशात खुप भयावह परिस्थिती निर्माण होऊन दररोजच महीलांना हीन दर्जाची वागणूक मिळत असून खुलेगाम महीलांवर अत्याचार होताना दिसत आहेत ही खुप मोठी शोकांतिका आहे. तेव्हा आज परत एकदा छ. शिवरायांच्या विचारांचा प्रचार प्रसार होऊन शिवराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. प्रत्येक षुरूषाने महीलांचा सन्मान राखला पाहीजे. याविषयी कवयित्री ज्योती हनुमंत भारती म्हणतात की, 

'छत्रपतींच्या थोर आचरणाचे तू ठेव जरासे भान

सांभाळ मावळ्या आता लेकींच्या अब्रुंचा मान'.

'शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नका' असा आदेश छ. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला दिला होता. म्हणून रयतेतील शेतक-यांची दहा बारा वर्षांची छोटी ढोटी मुलंही घोडेस्वारांना म्हणत की, 'खबरदार ! पुढे जाल तर चिंधड्या उडवीन ! तुम्ही कोण आहात ? कुठे चाललात ?. पण ही मुलं ज्या घोडेस्वारांना दम देत होती ती शिवरायांचीच होती हे त्या मुलांना माहीत नव्हतं म्हणजेच माहीत नसताना देखिल शिवरायांच्या स्वराज्याविषयी 'आपलं स्वराज्य' ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. पण कालपर्यंत 'शिवछत्रपती का आशिर्वाद अन् चला देऊ .... साथ' म्हणून आशिर्वाद मागणारे आणि आज त्यांच्याबरोबरच स्वत:ला मिरवतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. आणि शिवरायांचा आशिर्वाद मागणारांचे सहकारी हे शेतक-यांचा अवमान करणारी वक्तव्ये करून गोळ्या झाडण्याची भाषा करताना दिसतात तेव्हा शिवरायांना अभिप्रेत असणारी शिवशाही व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी लोकशाही आहे का ?. कारण आज इथे नांदणारी भांडवलादारांची मनुवादी व्यवस्था सत्तेवर आहे हे ओळखण्याची कला फक्त शिवत्ररित्र व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्यांनी वाचले त्यानांच समजते. बाकी इतर लोकांना तर दिवसा आणि रात्रीसुध्दा 'अच्छे दिनची' स्वप्न पडतात. त्यामुळे आता आमच्या बहुजन समाजातील तरुणांनी चौकाचौकात नाचणं सोडून शिवरायांचे खरे शिवचरित्र वाचले पाहीजे. याविषयी कवयित्री ज्योती हनुमंत भारती म्हणतात की,

जाणत्या राजाची कर्तव्ये, 

घे त्यांच्या आचरणाचा तू वसा,

उमटू दे तुझ्या कार्यातून मग, 

त्या थोर छत्रपतींचा ठसा.

आजपासून शिवजन्मोत्सव साजरा करताना छ. शिवाजी महाराज व शिवजयंतीचे जनक महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा. शिवरायांसोबत शाळेत शिकणाऱ्या लहान लहान मुलांना महात्मा जोतिबा फुले समजतील आणि महात्मा फुले समजले तर 'बुध्द शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ' ही महापुरुषांची संपूर्ण साखळी समजेल त्याचवेळी 'शिवरायांना अपेक्षित असलेली शिवशाही व बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही' निर्माण होण्यास वेळही लागणार नाही हे मात्र निश्चित.

'जगात भारी १९ फेब्रुवारी

माझ्या राजाची जयंती हीच खरी'

 

 

'भट बोकड मोठा' पुस्तकाचे लेखक

रेपे नवनाथ दत्तात्रय

मो. ९७६२६३६६६२

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...