Home / महाराष्ट्र / मराठवाडा / 'भट बोकड मोठा' मनुवादी...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

'भट बोकड मोठा' मनुवादी विचारांवर प्रहार करणारे हे पुस्तक

'भट बोकड मोठा' मनुवादी विचारांवर प्रहार करणारे हे पुस्तक

'भट बोकड मोठा'
मनुवादी विचारांवर प्रहार करणारे हे पुस्तक


              नवनाथ रेपे लिखित भट बोकड मोठा हे आजच्या आधुनिक समाज ( ब्राह्मणी)  व्यवस्थेवर भाष्य करणारे उत्तम असे पुस्तक आहे. डोक्यात जे अंधश्रध्देच्या, तर्क नसलेल्या गोष्टींचे, वाईट विचारांचे जंग चढले आहेत ते काढण्याचे काम या पुस्तका मार्फत तसेच लेखकांच्या लेखणीतून होत आहेत . पुस्तकाचे नाव जरी बऱ्याच लोकांना विनोदी वाटत असले ( असे म्हण्याचे  कारण बऱ्याच लोकांनी मला विचारले की, पुस्तक विनोदी आहे का ?) तरी त्यात ह्या बिकाऊ मीडिया ने जे काही अवैचारीक विचार आपल्या समोर मांडले आहेत त्याला सडेतोड उत्तर या भट बोकड मोठा पुस्तकातून दिले आहे. 

           राजकारणी लोक आपल्या फायद्यासाठी महामानवाचा व त्यांच्या विचारांचा अपमान करत आहेत. अमरावती, दर्यापूर मध्ये झालेल्या घटना आपल्याला माहिती असेलच, छ. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे राजकीय लोक सत्तेत येतात आणि त्यानंतर त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्यासाठी परवानगी नाकारतात, त्यांच्याकडे शिवरायांच नाव घेऊन मते मागायला वेळ असतो पण त्याच शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी जागा नसते. अशा घटनांना कुठे तरी पायबंद घातला गेला पाहिजे. लोक फक्त आणि फक्त दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टी ऐकतात त्यावर विचार न करता तर्क लावतात आणि मग गैरसमज वाढत जातात. या मागचे मूळ कारण म्हणजे वाचनाचा अभाव. आपण स्वतः तर्क लावून वाचन न करता कोणी तरी सांगितले त्यावर विश्वास ठेवतो. बहुजनांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करणाऱ्या महामानवांच्या पेक्षा भारतावर वर्चस्व करणाऱ्या साडेतीन टक्के लोकांचे जे प्रेरणास्थान आहे ते कसे व किती महान आहेत ते आपल्याला वारंवार पटवून देत आहेत, परंतु नवनाथ रेपे यांच्या सारखे लेखक नेहमी आपली तळपती लेखणी घेऊन त्या भाकड व रंगवलेल्या ब्राम्हणी महापुरुषावर वैचारिक घाव घालण्यास तयारच आहेत. मनुवादी विचारांवर प्रहार करणारे 'भट बोकड मोठा' हे पुस्तक आहे . 
            शिवश्री नवनाथ रेपे आपली लेखणी अशीच तळपत राहो कारण माणूस गेला तरी त्याचे विचार नेहमी जिवंत असतात आणि चांगले विचार नेहमी जपले जातात. आपले हे दुसरे पुस्तक आहे असेच अनेक पुरोगामी विचारांचे, वैचारिक, सांस्कृतिक  पुस्तके आम्हा सर्वांसाठी आपल्याकडून वाचनासाठी येवोत हीच सदिच्छा.


शिवमती अश्विनी सविता हेमराज बिजेवार
उपाध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, अमरावती

  • पुस्तक घरपोच मिळेल
    संपर्क - रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
    मो. 9762626662

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...