वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
'भट भोकड मोठा पुस्तक म्हणजे'
वैदिक - अवैदिक संघर्षाची मांडणी
नवनाथ दत्तात्रय रेपे यांनी लिहिलेलं 'भट बोकड मोठा' हे पुस्तक वाचनात आलं. या पुस्तकाच्या नावातच खूप काही दडलेलं आहे. पुर्वापार चालत आलेली वैदिक - अवैदिक यांच्यातील सामाजिक संघर्षाची मांडणी या पुस्तकात केलेली आहे. काल्पनिक देवाच्या नावाखाली बहुजनांना लुटणाऱ्या ब्राह्मणी व्यवस्थेवर लेखकाने या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
पाच हजार वर्षांपूर्वी याच ब्राह्मणांनी तेहत्तीस कोटी देवांची निर्मिती केली. ब्राम्हणांनी स्वतःच्या मेंदूतून निघालेल्या नरक कुडांमुळे आकाशापलीकडे स्वर्ग नरकाच्या वसाहती स्थापन करून शुभ - अशुभ, पंचांग, ग्रह व तारे यामध्ये बहुजन समाजाला अडकवून त्यांना या सर्वाची भिती दाखवून ब्राम्हण आजपर्यंत बहुजनांच्या जीवावर ऐशोआरामात जीवन जगत आहेत. बहुजनांच्या गुलामीचा फायदा घेऊन त्यांच्या मेंदूवर राज्य करणा-या विकृत बुद्धीच्या ब्राह्मणांनी आमच्या शिवाजी राजांचा अनेकदा अपमान केला, विडंबना केली आज त्यांचेच जानवेधारी व बहुजनांतील मनुवादे कोंबडे त्यांचाच कित्ता गिरवत संघाच्या उकीरड्यावर बांग देत आहेत या सर्वाचा समाचार लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.
सिंधू संस्कृतीत होम हवन, कर्मकांड अजिबात नव्हते मात्र ब्राम्हणांनी आमच्या संस्कृतीवर घाला घालून आम्हाला मूर्ख बनवले, आजही बनवत आहेत त्या सर्वांचा समाचार घेऊन या बोकडांपासून दूर कसे राहता येईल हे लेखकांंनी या पुस्तकात समजून सांगितले आहे. ज्यांना कोकण माहीत नव्हता, त्यांच्यामते नऊ खंड पृथ्वी आणि दहावे खंड काशी इतकेच जग आहे.
छत्रपती शाहु महाराजांनी सुद्धा वैदिकांना कडाडून विरोध केला होता. छत्रपती शाहू महाराजांनी कुलकर्णी पद रद्द करून तलाठी पद सुरू केले होते. कारण हे कुलकर्णी खोट्या नोंदी ठेवत आणि गावात गुप्त कारस्थाने करत. तसेच शाहूंनी राजाराम कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला होता कारण त्या कॉलेजमध्ये ६१ पैकी ५५ ब्राह्मण होते. गौतम बुद्धांनी देखील तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेवर ताशेरे ओढण्याचं काम केलं
आजही ब्राह्मणी वर्चस्व कमी झालेल नाही पण बहुजनांची बाजू मांडणाऱ्या भक्कम प्रतिनिधींची संख्या मात्र कमी आणि तुरळक आहे. ब्राम्हण व ब्राम्हणवादाला विरोध करण्याचं धाडस फार कमी लोकांमध्ये आहे त्या अत्यल्प लोकांमध्ये एक विद्रोही लेखक म्हणून नवनाथ रेपे यांच नाव घ्यावं लागेल. एखादा विषय मुद्देसूदपणे मांडण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. कुंभकर्णा सारख झोपेच सोंग घेणा-या व लोकशाहीच्या नावाखाली चाललेल्या दांभिकतेवर वार करणारे त्यांचे लेखन आहे.
आजचे सर्वपक्षीय राजकीय नेते जसा गिरगिट रंग बदलतो त्याप्रमाणे शब्द बदलून स्वतःचा नावलौकिक वाढवण्यासाठी ते राजकारण करतात त्यात छत्रपती शिवाजी राजांच्या कार्यकर्तृत्वावर शिंतोडे उडवणारे रामदासी स्वयंसेवक असतील, महाविकास आघाडीचे उसनी शिवभक्ती दाखवणारे दंगलखोर असतील किंवा पंजाब मधील शेतकरी आंदोलनाला विरोध करून शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान चा हात आहे असं म्हणणारे केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे नेते रावसाहेब दानवे किंवा महापुरुषांच्या समाधी स्थळावर गोमूत्र शिंपडणारी संघी पिलावळ असो या सर्वांचा समाचार नवनाथ रेपे यांनी 'भट बोकड मोठा' पुस्तकात घेतलेला आहे.
'मंदिर हे बहुजनांच्या लुटीचं आणि ब्राह्मणांच्या उपजीविकेचं साधन' या लेखात देशभरातील मंदिरांची संख्या आणि त्यातून मिळणारे दैनिक व वार्षीक उत्पन्न याचीही आकडेवारी दिलेली आहे. ब्राम्हणांनी सांगितलेल्या पाप पुण्याच्या भीतीने लोक मंदिरात दान धर्म करतात पण याच दानपेटीतील मिळालेल्या पैशावर भटा ब्राम्हणांची रोजोरोटी चालते. आजही स्वतःला पुरोगामी म्हणवणारे भुरटे पुरोगामी देवीला कोंबडा कापून नवस फेडतात अशा लोकांनी आपण पुरोगामी आहोत की प्रतिगामी याविषयी तटस्थ रहावं. सदरील लेखातून देवभोळ्या लोकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील हे मात्र निश्चित.
एकीकडे संधी विचारधारेचे लोक गोबर गोमुत्र म्हणजेच सर्व काही म्हणत त्याचे प्राशन करण्याचे सल्ले बहुजन समाजाला देऊन स्वतः मात्र तुपाशिवाय जेवण करत नाहीत म्हणून ब्राम्हण व ब्राम्हणवाद्यांच्या चक्रव्युहामध्ये फसलेल्या बहुजन समाजाला भट बोकड मोठा या पुस्तकातून लेखक नवानाथ रेपे सांगतात की,
माणसाच्या स्पर्शाने कोणीही अपवित्र होत नाही,
आणि जनावरांचे मलमूत्र हे खताशिवाय काहीच देत नाही...'
भटांनी गोमूत्र पवित्र मानलं आहे पण हे जनावरांचे मलमूत्र असून त्याचा काहीही उपयोग नाही अस विश्लेषण केलेलं आहे.
प्रसारमाध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मात्र आज ह्या स्तंभावर ब्राम्हणी वर्चस्व असल्यामुळे ही प्रसारमाध्यम सध्या लोकांना भूल देण्यासाठीच वापरली जात आहेत ह्या भुललेल्या लोकांना जागे करण्यासाठी लेखकांनी आपली लेखणी चालवली पाहीजे कारण लेखकाला कोणताच पक्ष नसतो, तो सर्वसामान्य लोकांना सत्य समजाव यासाठी ते सत्याची बाजू घेतात हे वास्तव नवनाथ रेपे यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे समाज परिवर्तनाच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी 'भट बोकड मोठा' हे पुस्तक दिशादर्शक आहे.
नवनाथ रेपे आपल्याकडून असेच नवनवीन साहित्य प्रकाशित होवो, यापुढे अधिक विचारी, आणि आशयघन पुस्तकांची आपणाकडून अपेक्षा आहे. आपल्या पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा...!
©शब्दांकन
शिवमती रंजना शिवाजी पाटील,
कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता,
जिजाऊ ब्रिगेड.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...