Home / महाराष्ट्र / मराठवाडा / जगद्गुरु तुकोबारा...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

जगद्गुरु तुकोबाराय

जगद्गुरु तुकोबाराय
जगद्गुरु तुकोबाराय - रेपे नवनाथ दत्तात्रय (भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक) मो. ९७६२६३६६६२ विज्ञान ज्ञान गुणे अधिकार पावला ! तोची वाखाणीला सर्व जगी ! असे म्हणणा-या संत तुकोबाराय यांना छ. शिवराय हे आपले गुरू मानायचे त्यांचा जन्म इ.स.१६०८ मध्ये देहु येथिल मोरे मराठा- कुणबी घराण्यात झाला होता. त्यांनी गाथा लिहली होती त्या गाथेतील एका एका अभंगावर आजचे तरुण पीएचडी करताना दिसताहेत ही खुप कौतुकास्पद गोष्ट आहे पण त्यांचे खरे कार्य आणि विचार समाजापर्यंत गेले अथवा काही बांडगुळांनी जाऊ दिले नाहीत ही खुप मोठी शोकांतिका आहे. आमच्या लोकांना तुकाराम महाराज याच्याबद्दल माहीती आहे ती फक्त तुकराम महाराज आले त्यांनी गाथा लिहिली अन् ते गरूडावर बसून सदेह वैकुंठाला गेले, येवढ्यापलीकडे काही माहित नाही परंतू नसलेल्या गरुडापलीकडेही तुकोबाराय आहेत हे कधी आजच्या नकली पोटभ-या महाराजांनी आमच्या बहुजन समाजाला सांगितलेच नाही. ते केवळ बनावट कथा सांगून लोकांना हासवण्याचा धंदा करताना दिसतात पण तुकोबाराय म्हणतात की, 'नको दंतकथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोणे !' केवळ समोर बसलेल्या लोकांना खळखळून हासवून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करून कोट्यावधी रुपयांची माया जमवण्यासाठी 'अंखड हरिनाम सप्ताह' यांचा बाजार मांडला दिसतोय पण तुकोबाराय म्हणतात की, कीर्तनाचा विकरा मातेचे गमन ! भाड खाई धन विटाळ तो ! हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ती ! इजभर पोट भरिती चांडाळ ते ! त्यामुळे आमच्या बहुजन समाजाने खरे तुकोबाराय आणि केवळ त्यांची गाथा जरी वाचली असती तर आजच्या महाराजांनी जी 'खंड न पाडण्याची म्हणजे अंखड' करण्याची दुकानदारी बंद पाडली असती. गरुडापलीकचे तुकोबाराय म्हणजे नेमकं काय ? तर तुकोबाराय यांचे शेतक-यासंबधीचे, वैज्ञानिक दृष्टिकोन, महीलांचा आदर व समाज प्रबोधन हे समजून घेणे काळाची गरज आहे. पण प्रश्न पडतो की, आजच्या किर्तनकारांचा तुकोबाराय समजले का ? जगद्गुरु तुकोबांनी ४५० वर्षांपूर्वी सांगितले होते की, नवसे कन्यापुत्र होती, तरी का करणे लागेपती ! तरीपण अमेरिकेत एकादशी आहे असे सांगणारे महाराष्ट्रातील काही दंगलखोर म्हणतात की, माझ्या मित्रांच्या शेतातील आंबा खाल्ल्यास पुत्रप्राप्ती होते. पण आज जर तुकोबाराय असते तर त्या मनोहर कुलकर्णीचे नाव घेऊन म्हटले असते की, अभक्त ब्राम्हण जळो त्याचे तोंड ! काय त्यास रांड प्रसवली ! हेच विज्ञाननिष्ठ तुकोबाराय आमच्या बहुजन समाजाने समजून घेतले पाहीजे अन्यथा भिडे अन् किडे पुत्रप्राप्तीसाठी काहीही खाऊ घालतील त्यामुळे वेळीच सावध झाले पाहिजे. तसेच आज जे काही तथाकथित पोटभरे महाराज प्रबोधनकाच्या नावाखाली कोणत्या तरी ग्रंथात लिहलेले आहे म्हणून सम-विषम तिथेचे समर्थन करून स्वत:ची बौध्दीक वेश्यागिरी करतात तेव्हा तुकोबाराय म्हणतात की, मेळवूनि नरनारी ! शिकून सांगे नानापरी ! तुका म्हणे मैंद ! नाही त्यापाशी गोविंद ! तसेच मुखे सांगे ब्रह्मज्ञान ! जन लोकाची कापितो मान ! ज्ञान सांगतो जनासी ! नाही अनुभव आपणासी ! कथा करितो देवाची ! अंतरी आशा बहु लोभाची ! तुका म्हणे तो चि वेडा ! त्याचे हाणूनि थोबाड फोडा !. पावसाळा आला की जसा बेडकांचा सुळसुळाट होतो तसेच उन्हाळा आला की, बहुजन समाजात काही बांडगुळं गावागावात स्पेशल दर्शन आणि प्रवचन सोहळा किंवा भागवत कथा यांचे आयोजन करण्यासाठी सामान्य लोकांकडून देणगीच्या नावाखाली गावातील लोकांची खिस्से कापताना दिसतात पण भागवत कथेविषयी विष्णू तपसे हे एका कार्यक्रमात म्हणतात की, 'ज्यांच भागत नाही ते भागवत कथा करतात'. मग तरीही लोक त्या भागवत कथा, किर्तनकार यांना लाखो रूपयांची सुपारी देताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. पण तुकोबाराय म्हणायचे की, जेथे करावे कीर्तन ! तेथे सेवू नये अन्न ! गळा घालू नये माळा ! बुक्का लावू नये भाळी ! तृटा मागू नये दान ! करूनी हरिदासाची कथा ! जे द्रव्य घेती आणि देती ! दोघेही नरका जाती !. आमचा बहुजन समाज आजही मंदीराच्या पाय-या झिजवताना दिसतो पण तुकोबाराय म्हणतात की, देही असोनिया देव ! वृथा फिरतो निर्देव ! देव आहे अंतर्यामी ! व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी !. भगवा रंग हा त्यागाचे प्रतिक असून तथागत गौतम बुद्धांचे चिवर, तुकोबाराय यांचा फेटा व शिवरायांनी वापरलेली पताका ही भगवीच होती परंतू आज काही भामटे तो रंग मलीन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात त्याविषयी तुकोबाराय म्हणतात, 'भगवे जरी श्वान सहज वेष त्याचा ! तेथे अनुभवाचा काय पंथ !' आज काही तथाकथित महाराज सांगतात की, तुकोबाराय विमानावर बसून सदेह वैकुंठाला गेले. पण आमच्या मनात संशय येतो की, तुकोबाराय यांचा भार एक गरुड नामक पक्षी घेईल का ? तसेच तुकोबाराय त्यांच्या अभंगांत म्हणतात की, नाही देवापाशी, मोक्षाचे गाठोडे ! मोक्षपद तुच्छ केले या करणे ! आम्हा जन्म घेणे युगायुगी ! भय नाही जन्म घेता ! मोक्षपदी हाणू लाथा ! इह लोकाचा हा देहे ! देव इच्छीताती पाहे ! नलगे देवा तुझे आम्हाशी वैकुंठ ! जगद्गुरु तुकोबाराय यांनी 'नलगे देवा तुझे आम्हाशी वैकुंठ' म्हणून काल्पनिक वैकुंठ नाकारला त्या वैकुंठाला तुकोबाराय गरुडावर बसून जातील कशाला ? म्हणूनच तर वाटते की, तुकोबांची हत्या घडवून आणली असावी कारण प्रश्न त्यांनाच पडतात ज्यांची मती आणि निती भष्ट आणि भ्रमिष्ट नसते म्हणून तर तुकाबांची हत्या की वैकुठगमन या विषयावर इंजि. पुरुषोत्तम खेडेकर यांनी 'संत तुकारामांचा खून रामदासी ब्राम्हणांनी केला' असे पुस्तक लिहिले त्यात ते म्हणतात की, तुकोबाराय आपल्या किर्तनातून वैदिक ब्राम्हण बहुजनांना कसे लुटतात हे सांगून देव, दैव, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, वैकुंठ, नशीब हे सर्व खोटं असल्याचं मांडत. हे ब्राम्हणांच्या पोटाचे धंदे असल्याचे सांगत तसेच अणु - रेणू सारखे शब्द वापरून विज्ञानवादाचा सिध्दांत मांडत होते. त्यामुळे ब्राम्हणांचे पित्त खवळले त्यामुळे एकेदिवशी लोक धुळवडीच्या रंगात व नशेत असताना भट्ट मंबाजी, भट्ट सालोमालो व इतर ब्राम्हण देहुत घुसून तुकोबारायांना ओढत ओढत इंद्रायणी काठावर आणले व तिथेच मारून टाकून त्यांच्या शरीरास दगड बांधून वाहत्या पाण्यात फेकून दिले ती तारीख इ.स. ०९ मार्च १६५०. ही घटना गावातील खंडू मांग नावाच्या एका तरुणाने पुर्णपणे पाहीली होती. ज्या लोकांच्या घरातील मुलं विदेशात जाऊन शिक्षण घेतात तर शेतक-यांची मुलं सैन्यात भर्ती होतात पण तथाकथित काही मनुवादी विकृतीं जेव्हा सैनिकांच्या पत्नींचा अवमान करतात तर काहीं शहीदांना दहशतवादी म्हणतात तेव्हा तुकोबाराय यांचा अंभगाची आठवण होते, शुरा साजती हतियारे ! गांढ्या हसतील पोरे !. तुकोबाराय यांनी गाथेत लिहिलेला शब्द ना शब्द आज खरा ठरतो त्यामुळे त्यांचा किती दुरदृष्टीकोन होता हे समजून घेणे आवश्यक आहे. 'बोले तैसा चाले ! त्याची वंदावी पाऊले !' असे तुकोबाराय म्हणत पण आजचे आमचे प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी खुप काही आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात त्यांचं कार्य काहीच नसतं म्हणून तर प्रा. गंगाधर बनबरे म्हणतात की, बोले तैसा थोडा थोडा तरी चाले ! त्याची वंदावी पाऊले ! पण बोले तैसा थोडाही न चाले ! त्याची तोडावी पाऊले ! हे आमच्या बहुजन समाजाने लक्षात घेतलं पाहीजे तेव्हा ख-या अर्थाने जगद्गुरु तुकोबाराय यांना खरे अभिवादन ठरेल. 'ऐसे संत झाले कळी ! तोंडी तमाखूची नळी ! स्नानसंध्या बुडविली ! पुढे भांग वोडवली !'

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...