वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
भारत देशात काँग्रेस सरकार भुईसपाट करून संघप्रणित भाजपचे सरकार सत्तेवर स्थानापन्न झाले. मात्र यामुळे देशात जातीय तेढ आणि धार्मिक वाद तसेच जाणिवपुर्वक महापुरूषांचा अवमान करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामध्ये १८ व्या शतकात म्हैसूरचा शासक असलेल्या टीपू सुलतान याची जयंती दरवर्षी १० नोव्हेंबरला साजरी केली जाते मात्र संघप्रणित भाजप सरकारने या जयंतीवर बंदी घातली ही खुप मोठी शोकांतिका आहे.
कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकारच्या काळात टीपू सुलतान जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात येत होती मात्र संघप्रणित भाजप सरकार नव्याने सत्तेवर येताच टीपू सुलतान जयंतीवर सरकारची बंदी घातली गेली. टीपू सुलतान जयंती साजरी करू नये, असे आदेश नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज दिलेही आहेत. त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार बोपय्या यांनी टीपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवला होता. कर्नाटकात टीपू सुलताना जयंती सोहळ्यांना पूर्वीपासूनच संघप्रणित भारतीय जनता पक्षाचा विरोध राहिलेला आहे. टीपू सुलतान हा कट्टर मुस्लीम शासक असल्याचे भाजपचे मत आहे. टीपू सुलतानाने अनेक मंदिरे तोडली, तसेच मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर केले असे भाजप आणि दक्षिणेतील विविध संघटनांचे म्हणणे आहे.
संघप्रणित भाजप सरकारने ज्यांच्या जयंतीवर बंदी घातली ते टिपू सुलतान म्हणजेच ‘सय्यद वलशरीफ सुलतान फतेह अली साहब टिपू’ हा म्हैसूर राज्याचा राजा होता. त्यांना लोक म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखत असत. अनेक लोक त्यांना टिपू साहब सुद्धा म्हणत असत. त्यांनी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध क्रांतिकारी लढा दिला होता. इंग्रजांना दक्षिणेत सत्ता स्थापन करण्यासाठी त्याने कडवा विरोध करून तीव्र लढा दिला. तसेच एक पराक्रमी आणि शूर शासक असण्यासोबतच टिपू सुलतान हे एक विद्वान व कुशल
सेनापती तर होतेच शिवाय ते एक उत्तम कवी सुद्धा होते. मग प्रश्न पडतो की, भाजपला इंग्रजाच्या विरोधात लढणा-या टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या येवढा तिरस्कार का ? इंग्रजांना कडवा विरोध करणा-या टिपू सुलतान यांच्या जयंतीला विरोध करणारे हे संघप्रणित भाजप सरकार मात्र त्याच इंग्रजांना १७ माफीनामे सादर करणा-या विनायक दामोदर सावरकांचा आणि त्यांच्या जयंतीचा उदो उदो करताना दिसतेय ही खुप मोठी शोकांतिका आहे. आणि हेच आमच्या हिंदू - मुस्लिम समाजातील लोकांनी हे संघप्रणित भाजपचे षंढयंत्र लक्षात घेतले पाहीजे.
टीपू सुलतान हा कट्टर मुस्लीम शासक असल्याचे भाजपचे मत आहे पण काही इतिहासकार तर टिपू सुलतानला क्रांतिकारक म्हणतात. संघप्रणित भाजप चे व इतर काही विकृत विचारसरणीचे लोक आजपर्यंत जसे छ. शिवरायांना मुस्लिमांचे विरोधक म्हणून मिरवतात तसे हजरत टिपू सुलतान यांना हिंदूचे दुश्मन म्हणून मिरवत नसतील कशावरून यांचा बहुजनांनी गांर्भियाने विचार करावा लागेल.
टीपू सुलतानाने अनेक मंदिरे तोडली, तसेच मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर केले असे भाजप आणि दक्षिणेतील विविध संघटनांचे म्हणणे आहे. टिपू सुलतान हे धर्म सहिष्णू राजे होते. त्यांनी १५६ मंदीरांना देणग्या दिल्याचे पुरावे आजही मैसुर गैझेटीयर मध्ये उपलब्ध आहे. टिपू सुलतान बद्दल महात्मा गांधी यंग इंडियाच्या २३ जानेवारी १९३० च्या अंकात म्हणतात टिपू सुलतान खरा धर्म सहिष्णू होता इंग्रजांनी टिपू ला बदनाम केले टिपू सुलतान यांच्या महलाच्या चारही बाजुने श्रीवेंकटरमना, श्रीनिवास, श्रीरंगनाथ चे मंदीर आहेत हा स्पष्ट पुरावा आहे की टिपू सुलतान धर्म सहिष्णू होते हिंदू प्रजेवर प्रेम करणारे होते. तसेच त्यांनी हिंदुच्या मंदीरापैकी एक पडझड झालेले शृंगेरिचे शारदादेवी मंदीर हजरत टिपू सुलतान यांनी बांधले होते. हे का संघटना समजून घेत नसतील हा प्रश्न पडतो कारण त्यांना सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करायची आहे.
टिपू सुलतान यांच्यामुळे हिंदूंचे धर्मांतर केले याविषयी एका भाषणात ऐकले की, अशा प्रकारचे भावणिक मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी ते धार्मिक लोक विनायक दामोदर सावरकरांनी लिहलेल्या लिखाणाचाही संदर्भ देतात. मग प्रश्न पडतो की, सावरकारांनी बहुजनांतील महापुरूषांविषयी विषारी गरळ ओकल्याचे अनेक पुरावे आहेत. 'नुसते शिवाजी हे नाव जरी उच्चारले तरी हिंदूच्या तेहतीस कोटी देवाची फलटन बाद होते असे प्रबोधनकार ठाकरे म्हणत परंतू याच शिवरायांविषयी सावरकर विषारी गरळ ओकताना म्हणतात की, 'काक तालिके न्यायाने शिवाजी छत्रपती झाला' तर एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्यांची गिनिज बुक आँफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे अशा छत्रपती संभाजी महाराजाबद्दल हेच सावरकर लिहतात की, 'मदीरा आणि मदीराक्षीच्या नादी लागलेला राज्य बुडवा राजा' तसेच गाडगेबांनी ज्यांना देव माना म्हणून सांगितले ते बहूजानांचे देव व या देशाला महान असे संविधान देणारे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यानी १४ आक्टोबर १९५६ रोजी बौध्द धम्माची दिक्षा घेतल्यानंतर याच विनायक दामोदर सावरकरांनी एक विधान केले होते. त्या विधानात ते म्हणतात की, 'आंबेडकरांनी शौचकुपावर उडी घेतली' अशा प्रकारे आपल्या लेखणीतून व वाणीतून जे सावरकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्द व छत्रपती संभाजी महाराजाबद्दल तसेच भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकरानबद्द विषाचा फुत्कार करतात त्या सावरकरांकडून भारताचे पहिले मिसाईलमँन हजरत टिपू सुलतान यांच्या सन्मानाची अपेक्षा करणे म्हणजे 'वांझोट्या गाईकडून दुधाची अपेक्षा करणे होय' त्यामुळे सावरकरांच्या विचारांचे वारसदार हे टिपू सुलतान यांच्या जयंतीला विरोध करतीलच आणि करतही राहतील व त्यातून त्यांची विकृत विचारसरणी दाखवतील हे स्पष्ट होताना दिसतेय.
हजरत टिपू सुलतान यांच्या राज्यात त्यांनी व्यसनमुक्ती व नशाबंदीचा आदेश काढला होता तसेच 'फौजी अखबार' हा पेपर चालत होता. त्यांचे स्वतःचे ग्रंथालय होते त्यामध्ये १८८९ ग्रंथ होते. टिपू सुलतान यांनी स्वतः ६२ पुस्तके मेडिकल सायन्सवर लिहलेली आहेत. भारतातील पहीला साखर कारखाना काढणारे हजरत टिपू सुलतान होते. शेतक-यांविषयी छत्रपती शिवरायांनी जसे आपल्या सैनिकांना सांगितले होते की, माझ्या शेतक-याचा गवताच्या काडीलाही हात लावू नका. तसेच हजरत टिपू सलतान हे देखिल शेतक-याविषी म्हणत की, 'जो शेतक-यावर अन्याय करतो, जो शेतक-यांचा शत्रू आहे, तोच ईश्वराचा शत्रू आहे' तसेच ते म्हणत की, 'शेती ही राष्ट्राची रक्त वाहीणी आहे, ज्याप्रमाणे रक्त वाहीणी शरीराला रक्त पुरवून जिवंत ठेवते त्याप्रमाणे शेती अन्न निर्माण करून देशाला जिवंत ठेवते.' म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि हजरत टिपू सुलताना यांची शेती आणि शेतक-यांप्रती असलेली जाणिव सहज लक्षात येते. म्हणून महापुरूष हे जातीचे किंवा धर्माचे प्रतिक नसून हे महापुरुष मानव जातीच्या कल्याणाचे प्रतिक आहेत. तसेच एकात्मता व सामाजिक एकात्मतेचे प्रतिक आहेत हे आजच्या तरुणांनी लक्षात घेतल पाहीजे.
वर्ल्ड तसेच भारतात रॉकेटची टेक्नोलॉजी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय टिपू सुलतान यांना जाते. म्हणून त्यांना वर्ल्ड तगरकमँन (मिसाईलमँन) म्हणूनही ओळखले जाते. आज भारताने अवकाशात एकाच वेळी अनेक उपग्रह सोडून एक रेकॉर्ड केला आहे. १५ फेब्रुवारी २०१७ साली एकाच सिंगल रॉकेट मधून १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विक्रम भारतीय अवकाश संशोधन केंद्राने केला आहे. ह्या आधी मिशन मंगळयान सुद्धा यशस्वी करून दाखवले आहे. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डाँ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे हजरत टिपू सुलतान यांना आदर्श माणत असत त्यामुळे त्यांनी क्षेपणास्त्रे निर्माण केली. त्यांनी 'अग्निपंख' या पुस्तकात दहा पाने हजरत टिपू सुलतान यांच्यावर लिहली आहेत. कारण त्यांच्या हा आदर्शाचा परिणाम आहे. म्हणून आमच्या बहूजनांतील तरूणांनी स्वतःचे आदर्श हे आपलेच महापुरुष ठेवायला पाहीजेत आणि विकृत विचारसरणीच्या विकृतींपासून दूर राहीले पाहीजे. आज महाराष्ट्रात टिपु सुलतान ब्रिगेड या सामाजिक संघटनेने घराघरापर्यंत हजरत टिपू सुलतान आणि त्यांचे विचार घेऊन जाण्यात यशस्वी झालेली आहे. त्यामुळे काही विकृतींनी हजरत टिपु सुलतान यांच्यावर लावलेला धार्मिक तसेच जातीवादाचा जो कलंक लावला आहे तो पुसून टाकण्याठी सज्ज झाले पाहीजे.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...