वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
लातूर : लातूर शहरातील जेएसपीएम कॅम्पस, एमआयडीसी, कळंबरोड, लातूर येथे आज संस्थेच्या सचिव मा.सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार covid-19 च्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्याविना ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.तर या कार्यक्रमात विद्यार्थी त्यांच्या घरून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री.अजितसिंह पाटील कव्हेकर साहेब, संचालक समन्वयक श्री.निळकंठराव पवार साहेब, समन्वयक श्री.डी.एन.गोरे सर, समन्वयक श्री.व्ही.बी.जाधव सर, यांच्यासह सर्व युनिट प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.राजकुमार साखरे सर यांनी केले, आभार प्राचार्य श्री.संदीप पांचाळ सर यांनी मानले तर संचलन श्री.रामकांत शिंदे सर यांनी केले.
'प्रत्येक चांगले काम देशभक्तीच असते - मा. अजितसिंह पाटील कव्हेकर'
शिक्षण क्षेत्र असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला देशभक्ती सिद्ध करण्याची संधी नामी असते. आपण जे काम करत असतो ते काम निष्ठेने आणि आपल्या संपूर्ण क्षमतेने करणे म्हणजे करणे म्हणजेच खरी देशभक्ती असते. एखादा बागकाम करणारा शिपाई त्या परिसराची शोभा वाढवत असतो आणि एका अर्थाने तो आपल्या देशाची शोभा वाढवत असतो तसेच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना देशाची उज्वल पिढी घडवत असतो त्यामुळे त्याच्या हातून सुद्धा देशभक्तीचे फार मोठे काम होत असते. म्हणून देशभक्ती सिद्ध करण्यासाठी वेगळे काही न करता आपण करत असलेले काम निष्ठेने आणि संपूर्ण क्षमतेने करणे म्हणजेच देशभक्ती असते अशा पद्धतीचे विचार त्यांनी आपल्या मार्गदर्शना दरम्यान मांडले.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांसाठी प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य सचितानंद जोशी, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य संदीप पांचाळ, प्राचार्य शिरीन श्यामसन, मुख्याध्यापक संजय बिरादार, समन्वयक डॉ.शैलेश कचरे, मुख्यलेखापाल युवराज उफाडे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, Covid-19 च्या नियमांचे पालन करुन उपस्थित होते.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...