Home / महाराष्ट्र / मराठवाडा / कोरोना वरील लसीकरणाचे...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

कोरोना वरील लसीकरणाचे संभाव्य परिणाम

कोरोना वरील लसीकरणाचे संभाव्य परिणाम

फुड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) ने पुढील 22 संभाव्य गंभीर प्रतिकूल परिणामांचा खुलासा एका सुचीद्वारे केला आहे. जे परिणाम कोविड-19 वरील वॅक्सीन घेतल्यानंतर होऊ शकतात.

कोरोना वरील लसीकरणाचे संभाव्य परिणाम" फुड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) ने पुढील 22 संभाव्य गंभीर प्रतिकूल परिणामांचा खुलासा एका सुचीद्वारे केला आहे. जे परिणाम कोविड-19 वरील वॅक्सीन घेतल्यानंतर होऊ शकतात.

1. Guillain-Barré syndrome (गिलिन-बॅरी सिंड्रोम - म्हणजे शरीराची रोगप्रतिकार यंत्रणे भोवती मज्जासंस्थेच्या काही भागांवर आक्रमण करणारी व्याधी.)

2. Acute disseminated encephalomyelitis (ॲक्युट डिस्सेमिनेटेड एन्सेफॅलोमाइलिटिस - म्हणजे ही एक दुर्मिळ प्रकारची सुज आहे जी मेंदू आणि पाठीच्या कण्यावर परिणाम करते, सहसा लहान मुलांमध्ये.)

3. Transverse myelitis (ट्रान्सव्हर्स मायलिटिस - एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो पाठीच्या कण्याच्या संपूर्ण भागात सुज आल्यामुळे होतो.)

4. Encephalitis/ myelitis/ encephalomyelitis/ meningoencephalitis/ meningitis/ encepholapathy (एन्सेफलायटीस म्हणजे मेंदूला सुज येणे/ मायलायटिस म्हणजे पाठीच्या कण्याला सुज येणे/ एन्सेफॅलोमाइलाइटिस म्हणजे मेंदूत आणि पाठीच्या कण्याला सुज येणे/ मेनिन्गोएन्सेफलायटीस म्हणजे मेंदू आणि आसपासच्या ऊतींना सुज येणे/ मेनिंजायटीस म्हणजे मेंदू आणि पाठीचा कण्या भोवती सुज येणे/ एन्सेफोलापॅथी म्हणजे मेंदूत विकृति येणे)

5. Convulsions/ seizures* (कॉनवुलजन्स/ सेइज्युरेस - झटके किंवा फिट येणे

6. Stroke* (स्ट्रोक - आघात/ झटका)

7. Narcolepsy and cataplexy (नार्कोलेप्सी आणि कॅटॅप्लेक्सी - मेंदूचे झोपेवरील नियंत्रण हरवणे/ अनिद्रा)

8. Anaphylaxis (ॲनाफिलेक्सिस - एक गंभीर, संभाव्य जीवघेणी ॲलर्जी)

9. Acute myocardial infarction (ॲक्युट मायोकार्डियल इन्फ्रक्शन - हृदयाच्या स्नायूमधील रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होणे)

10. Myocarditis/ pericarditis (मायोकार्डिटिस म्हणजे हृदयाच्या स्नायूंना सुज येणे आणि पेरिकार्डिटिस म्हणजे हृदयाच्या बाहेरील भागाला सुज येणे)

11. Autoimmune disease* (ऑटोइम्युन डिसीज - स्वयंप्रतिकार रोग

12. Deaths* (डेथ - मृत्यू)

13. Pregnancy and birth outcomes (प्रेग्नंसी अँड बर्थ आऊटकम्स - प्रेरित गर्भपात किंवा मुदतीपूर्वीचा जन्म)

14. Other acute demyelinating diseases (ऑदर ॲक्युट डायमायलेटिंग डिसीज - अन्य तीव्र विकृतिचे आजार)

15. Non-anaphylactic allergic reactions* (नॉन-अनाफिलेक्टिक ॲलर्जीक रिॲक्शन्स - म्हणजे ॲलर्जीच्या गंभीर प्रतिक्रिया)

16. Thrombocytopenia* (थ्रोम्बोसाइटोपेनिया - रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे)

17. Disseminated intravascular coagulation* (डिस्सेमिनेटेड इंट्राव्हास्क्यूलर कोग्युलेशन - छोट्या नसांमध्ये रक्ताच्या लहान लहान गुठळ्या होणे)

18. Venous thromboembolism (वेनस थ्रोम्बोइम्बोलिझम - रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होणे)

19. Arthritis and arthralgia/ joint pain* (आर्थ्रीटीज अँड आर्थ्राल्जिया/ जॉइंट पेन - संधिवात आणि सांधेदुखी)

20. Kawasaki disease* (कावासाकी डिसीज - काही रक्तवाहिन्यांच्या भोवती सुजणे.

21. Multisystem Inflammatory Syndrome in Children (मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन - मुलांचे हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड, मेंदू, त्वचा, डोळे किंवा लैंगिकदृष्ट्या कार्यशील अवयवांसह शरीराचे वेगवेगळे अवयव सुजणे)

22. Vaccine enhanced disease* (वॅक्सीन एनहान्स्ड डिसीज - लस वर्धित रोग) हे सर्व विनाशकारी विकार प्रतिकूल परिणामांच्या सुचीमध्ये दिलेले आहेत. 22 ऑक्टोबर 2020 रोजी वैक्सीन संबंधित सल्लागारांची एक मिटिंग झाली, ज्या मिटिंगमधील प्रोसिडिंगच्या पान नंबर 17 वर FDA safety surveillance of Covid 19 vaccines: ही हेडिंग प्रविष्ट केलेली आहे. तिथे हे 22 संबंधित परिणाम दिलेले आहेत. लसींमुळे आपल्या शरीरावर आपापल्या शरीर प्रकृतीनुसार वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. हे परिणाम काही जणांवर त्वरित तर काही जणांवर काही काळाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण घेत असलेल्या लसीमध्ये कोणकोणते घटक टाकलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची माहिती आपण लस घेण्यापूर्वी जाणून घेणे नक्कीच आवश्यक आहे. कारण हा आपल्या अमूल्य अशा आरोग्याशी संबंधित असलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.

Source- https://www.fda.gov/media/143557/download?fbclid=IwAR3QgDbbutVOVXtGFgWz3JlL4i4nJe0DS0Ac9Vbp7K3mjVw1Is3S0fZ6Pc

✍️ संकलन © हर्षद रुपवते

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...