वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
उमेश तपासे (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ) : कोविड-19 या महामारीमुळे ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावली, अशा कुटुंबियाचे पुनर्वसन करण्याकरीता महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ याच्यांमार्फत ‘स्माईल’ या योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.
या योजनेमध्ये 1 लाख ते 5 लाखापर्यंत कर्ज मिळणार असून एन.एस.एफ.डी.सीचा 80 टक्के सहभाग असेल, भांडवल अनुदान 20 टक्के राहील. व्याजदर 6 टक्के तर परतफेडीचा कालावधी 6 वर्षापर्यंत राहील.
अर्जदार हा अनुसूचित जातीतील असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. 3 लाखापर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीकरीता महानगरपालिका, नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती तसेच एखाद्या गावात स्मशानभुमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक राहील.
आवश्यक कागदपत्रे : अर्जदाराने मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला (3 लाखापर्यंत), कोविड-19मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशनकार्ड तसेच वयाचा पुरावा इ. कागदपत्रे आवश्यक राहील.
कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे 15 जून 2021 पर्यंत मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 ह्या लिंक वर भरावी, असे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...