वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वतःचा उद्योग, सेवा उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सन 2021-22 या वर्षाकरीता जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ग्रामीण व शहरी भागात सुधारीत बीज भांडवल कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
पात्रता: अर्जदार कमीत कमी 7 वी पास व वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष असावे. अर्जदार महाराष्ट्राचा किमान 15 वर्षाचा रहिवासी असावा.
वैशिष्टे : उदयोग सेवा व व्यापार व्यवसायातील प्रकल्प मर्यादा रु.25 लाखापर्यंत आहे. 10 लाखावरील प्रकल्पास बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या 15 टक्केप्रमाणे अथवा जास्तीत जास्त 3.75 लक्ष बीज भांडवल रक्कम देण्यात येते. 10 लाखापेक्षा कमी प्रकल्पास सर्वसाधारण प्रवर्गातील लाभधारकांसाठी 15 टक्के तर अनुसूचित जाती, जमाती, अंपग, विमुक्त व भटक्या जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांकरीता 20 टक्के बीज भांडवल देण्यात येते. बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज सॉफ्ट लोन म्हणून दरसाल 6 टक्के व्याजाने देण्यात येते.
बीज भांडवल कर्जाची परतफेड विहित कालावधीत करण्यात आली नाही तर थकीत रकमेवर दरवर्षी 1 टक्के नुसार दंडनीय व्याज आकारण्यात येते. बीज भांडवली कर्जाची नियमितपणे विहित कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांस 3 टक्के सवलत देण्यात येते. तसेच कर्जाची परतफेड 7 वर्षाच्या आत करावयाची असून त्यामध्ये 3 वर्षाचा विलंबावधी समाविष्ट आहे. तर वाहतूक व्यवसायासाठी, व्यापार व सेवा उद्योगासाठी विलंबावधी 6 महिन्याचा राहील.
आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट आकाराचे फोटो, मार्कशीट, टीसी, राशन कार्ड, सेवायोजन नोंदणी जागा भाडेतत्त्वावर असल्यास संमतीपत्र तसेच अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
पात्रता : अर्जदारास शिक्षणाची व वयाची अट नाही. अर्जदाराचे महाराष्ट्रातील किमान 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. अर्जदार उद्योग सेवा व उद्योग नोंदणीस पात्र असावा.
उद्योगांमधील यंत्रसामुग्रीची गुंतवणूक 2 लाखाच्या आत असावी. उद्योगात 1 लाख लोकवस्ती पेक्षा कमी असणाऱ्या गावामध्ये सुरू करता येतो.लाभार्थ्यांस 65 ते 75 टक्के बँक कर्ज देण्यात येते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 20 टक्के बीज भांडवल रु. मर्यादा 3 लाख 75 हजार तर अनुसूचित जाती- जमाती करीता 30 टक्के कमाल रु. 60 हजारापर्यंत देय राहील. बीज भांडवलावर व्याजदर 4 टक्के राहील.
लाभार्थ्यास स्वतःचे 5 टक्के भांडवल भरणा करणे आवश्यक आहे. कर्जाचा परतफेड कालावधी 7 वर्षे आहे.
आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट आकाराचे फोटो, मार्कशीट, टीसी, राशन कार्ड, सेवायोजन नोंदणी जागा भाडेतत्त्वावर असल्यास संमतीपत्र, अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
तरी इच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे अथवा 07172-252208 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. राठोड यांनी कळविले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...