Home / महाराष्ट्र / अभियांत्रिकी महाविद्यालयातील...

महाराष्ट्र

अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकी सोडून दुग्धव्यवसायात.

अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकी सोडून दुग्धव्यवसायात.

शेती कडील ओढ स्वस्थ बसू देईना,  गोवरी येथे उभारले डेअरी फॉर्म


राजुरा:  कम्प्युटर सायन्स मध्ये एम टेक पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र स्वतःचा व्यवसाय करण्याची आवड व शेती कडची ओढ त्याला नोकरीत स्वस्त बसू दिले नाही. अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकरी सोडून शेती सोबत दुग्ध व्यवसायात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी गाव गाठले. स्वतःच्या मेहनतीवर आणि दूरदृष्टीने या युवकाने ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात इतरांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या  उच्चविद्याविभूषित युवकांचे नाव आहे प्राध्यापक ऋषिकेश लोनगाडगे.

राजुरा तालुक्यातील गोवरी येथील युवक आहे.  बालपणापासून अभ्यासात तल्लख बुद्धिमत्ता होती. त्यामुळे बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे वळला. जळगाव येथे अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर 2013 -14 मध्ये नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी कॉलेज मधून पदवीत्तर एमटेक (कम्प्युटर सायन्स ) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि याच महाविद्यालयांमध्ये नोकरीला सुरुवात केली. नागपूर सारख्या महानगरांमधील प्रसिद्ध कॉलेजमधील नोकरीत मात्र मन रमले नाही. गावाकडील काळी माती त्याला वारंवार खुणावत होती. बालपणापासून शेतीची आवड असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्याची सुरुवातीपासून इच्छा होती. संगणक क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर शेवटी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले आणि पाच वर्षांपूर्वी चंद्रपूर येथे दूध पॅकेजिंगला सुरुवात केली. त्यानंतर मूळ गाव गोवरी येथे शेती असल्यामुळे   गोपालन करून दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या प्रजातीतील गाई खरेदी करून गोवरी येथे मितांश डेरी फार्म ची निर्मिती केली. आजच्या मितीला 15 ते 20 गाई डेअरी फार्म मध्ये आहेत वेगवेगळ्या प्रजातीच्या दूध देणाऱ्या गायचे  फार्म मध्ये केली जाते. दररोज साधारणपणे दीडशे लिटर गाईचे शुद्ध ताजे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा उभी केलेली आहे. चंद्रपूर बल्लारपूर राजुरा शहरामध्ये सकाळीच गायीचे ताजे दूध घरपोच पोचवण्यात येते. यासाठी सकाळी पाच वाजल्यापासून दिनक्रम सुरुवात होतो. गाईचे दूध काढताना यंत्राचे वापर केले जाते. गाईचे आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेण्यात येते. आहार व त्यांचे आरोग्य जोपासण्यासाठी तसेच दुधाचे वितरण करण्यासाठी गावातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. स्वच्छता आणि शुद्धता याला प्राधान्य देऊन दुग्धव्यवसायात मितांश डेअरी फार्म चे सदस्य काम करीत आहेत. उच्चशिक्षित तरुणाने समाजाला दिलेला हा एक आदर्श आहे. स्वबळावर शेतीसोबत दुग्धव्यवसायाला चालना देऊन एक वेगळा मार्ग निर्माण केलेला आहे. या व्यवसायात ऋषिकेश लोणगाडगे याला पत्नी सौ. करिश्मा लोनगाडगे हीची मोलाची साथ आहे.


कोट..

ऋषिकेश लोनगाडगे,
 मितांश डेअरी फार्म, गोवरी..

सुरुवातीपासून शेतीची आवड असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. कम्प्युटर सायन्स मध्ये एमटेक केल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये नोकरी असताना सुद्धा माझे मन शेतीकडे होते . त्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे वळलो. दूध पॅकेजिंग पासून आता स्वतःचा डेरी फार्म निर्माण केलेला आहे. दररोज जवळपास दीडशे लिटर दूध ग्राहकांपर्यंत पोचविले जाते . ग्राहकाला शुद्ध आणि ताजे गायीचे दूध मिळावे हा उद्देश ठेवूनच व्यवसाय सुरू आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रसामग्री उपलब्ध आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...