Home / चंद्रपूर - जिल्हा / 23 डिसेंबर रोजी नगरपंचायतीची...

चंद्रपूर - जिल्हा

23 डिसेंबर रोजी नगरपंचायतीची आरक्षण सोडत..!

23 डिसेंबर रोजी नगरपंचायतीची आरक्षण सोडत..!

आरक्षण सोडतीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी ): चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या ना.मा.प्र. व ना.मा.प्र. महिला ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या दि.15 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.

त्यानुषंगाने, उपरोक्त नगरपंचायतीची आरक्षण सोडत काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. यामध्ये, सावली नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी वरोरा, पोंभुर्णा साठी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, गोंडपिपरी साठी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, कोरपना साठी उपविभागीय अधिकारी राजुरा, जिवतीसाठी अतिरिक्त आयुक्त, चंद्रपूर मनपा आणि सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी चिमूर हे आरक्षण सोडत करीता नेमणूक करण्यात आलेले पीठासीन अधिकारी आहेत.

वरील नगर पंचायतींची आरक्षण सोडत गुरुवार दि. 23 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. यात सावली नगरपंचायतीसाठी सोडत तहसील कार्यालय सावली येथे, पोंभुर्णासाठी नगरपंचायत कार्यालय पोंभुर्णा, गोंडपिंपरीसाठी पंचायत समिती सभागृह गोंडपिपरी, कोरपना साठी नगरपंचायत अभ्यासिका कोरपना, जिवती साठी नगरपंचायत कार्यालय जिवती तर सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृह सिंदेवाही या ठिकाणी पार पडणार आहे. वरीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...