Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / अपक्षामध्ये महिला उमेदवार...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

अपक्षामध्ये महिला उमेदवार प्रचारात आघाडीवर..!

अपक्षामध्ये महिला उमेदवार प्रचारात आघाडीवर..!

प्रविण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत चौदा प्रभागात इतर पक्षाने आपापले उमेदवार रिंगणात उतरविले असून अनेक प्रभागात अपक्ष उमेदवार यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. मातब्बर पक्षाच्या उमेदवाराला प्रभाग क्रमांक १५ मध्ये अनुसुचित जमाती महिला आदर्श मंडळाच्या अपक्ष उमेदवार सौ. पुष्पा विजय किन्नाके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र निवडणुक प्रचार रॅलीतून दिसत आहे.

राळेगाव शहरात जवळपास चाळीस वर्षांपासून आदर्श मंडळ हे क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहे, ज्यामध्ये रक्तदान शिबीर, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा, गाव विकासाठी आपलं जीवन गावासाठी अर्पण करणाऱ्या आदर्श सरपंच, गाव सुधारक भास्कर पेरे यांना मंडळाच्या वतीने दरवर्षी साजरा होत असलेल्या दुर्गा उत्सवादरम्यान बोलावून प्रभागातील व शहरातील जनतेला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून दिला आणि कोरोना काळात अनेक गरजूंना प्रसिद्धी न करता मदतीचा हात दिला व नुकताच मंडळातर्फे कोरोना लसीकरण शिबीर सुध्दा आयोजित केले होते.

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आदर्श मंडळाने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळाचे विजय किन्नाके यांच्या सौभाग्यवती सौ. पुष्पा विजय किन्नाके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असून मंडळाचे ७७ कुटुंबीय स्वतःच्या घरातील उमेदवार म्हणून सर्व नवतरुण, युवती, जेष्ठ पुरुष महिला मंडळी सह सौ. पुष्पा विजय किन्नाके यांना विजयी करण्यासाठी प्रचारात उतरले असून सौ. पुष्पा विजय किन्नाके प्रचारादरम्यान प्रभागातील जेष्ठांचा चरणस्पर्श करून आशिर्वाद घेत असतांना मतदार स्वयंस्फूर्तीने  प्रचारादरम्यान प्रभागातील मतदार कुठलीही अपेक्षा न बाळगता आदर्श मंडळाच्या अपक्ष उमेदवार सौ. पुष्पा विजय किन्नाके व मंडळाचे स्वागत मतदार स्वयंस्फूर्तीने करीत आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.  सौ. पुष्पा विजय किन्नाके मातब्बर पक्षाच्या विरोधात एक चांगला पर्याय म्हणून प्रभाग क्रमांक १५ तील मतदार आदर्श मंडळाच्या अधिकृत अपक्ष उमेदवार सौ. पुष्पा विजय किन्नाके यांना पहिली पसंती देत  आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...