Home / महाराष्ट्र / एलसीबीने जप्त केला...

महाराष्ट्र

एलसीबीने जप्त केला ३३ लाखाचा मुद्देमाल दारूतस्कराला अटक, शहर, रामनगर ठाणे हद्दीत कारवाई..

एलसीबीने जप्त केला ३३ लाखाचा मुद्देमाल दारूतस्कराला अटक, शहर, रामनगर ठाणे हद्दीत कारवाई..

चंद्रपूर:  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू जप्तीच्या दोन कारवाया केल्या. या कारवाइत दारूसाठा आणि दोन वाहने असा सुमारे ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका चालकाला अटक करण्यात यश आले. तर, दुसरा चालक फरार आहे. विनोद आडे राहनार वर्धा असे अटकेतील एका चालकाचे नाव आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.

जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातून दारूतस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर खाडे यांनी दारूतस्करीवर आळा घालण्यासाठी विशेष पथके गठित केली आहेत. शहर पोलिस ठाणे हद्दीतील छोटा बाजार चौकातील एका गल्लीत बेवारसस्थितीत असलेल्या वाहनात दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून वाहनाची तपासणी केली. त्यात ११५ पेट्या देशी दारू, २४ पेट्या विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा जप्त केला. चालक, मालकाचा शोध सुरू असून, शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, दुसरी कारवाई रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील जनता कॉलेज चौक परिसरात करण्यात आली. चारचाकी वाहनाने दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी पाठलाग करून वाहन पकडले. वाहनाची चौकशी केली असता त्यात विदेशी दारूच्या ४४ पेट्या आढळून आल्या. यावेळी वाहन चालक विनोद आडे  याला अटक केली. त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने केली.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...