Home / चंद्रपूर - जिल्हा / बालकांच्या न्युमोकॉकल...

चंद्रपूर - जिल्हा

बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ..

बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ..

चंद्रपूर महानगरपालिका बालकांना मोफत लस देणार

चंद्रपूर दि. 13 : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जातात. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या माध्यमातून रामनगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पीव्हीसी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे मनपाद्वारे बालकांना ही लस नि:शुल्क देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबु वैरागडे, नगरसेवक देवानंद वाढई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गलहोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत यांची उपस्थिती होती.

एक वर्षाच्या आतील बालकांना निमोनिया, मेनेटांयटीस, बॅक्टेरीमिया, सेपसीस, ओटायटीस आणि सायनुसायटीस आजारापासून ही लस संरक्षण देईल. न्युमोकोकल/निमोनिया हा फुफ्फुसांना होणारा संसर्ग आहे. ज्यामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. धाप लागते आणी ताप व खोकला येतो. संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्यास मृत्युसुध्दा होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. निमोनियापासून लहान बाळांच्या संरक्षणासाठी न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

गंभीर न्युमोकॉकल आजार होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो.  या लसीमुळे गंभीर न्युमोकॉकल आजारापासून बाळाचे संरक्षण तर होईलच सोबत समाजातील इतर घटकांमध्ये न्युमोकॉकल आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल. लस पूर्णपणे सुरक्षित असून  लसीचा  पहिला  डोस  दीड महिना पहिला  पेंटासोबत, दुसरा डोस साडेतीन महिने तिस-या पेंटासोबत व  तिसरा बुस्टर डोस  9 महिन्यात एम. आर. सोबत देण्यात  येईल. 

न्युमोकॉकल न्युमोनिया काय आहे?

न्युमोकॉकल आजार म्हणजे Streptococcus Pneumoniae या बॅक्टेरीयामुळे होणारा आजार आहे. StreptococcusPneumoniae हा बॅक्टेरीया 5 वर्षाच्या आतील मुलांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे.

आजाराची लक्षणे :

ह्या आजाराची मुख्य लक्षणे खोकला, ताप येणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...