रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
शिक्षण महर्षि स्व. श्रीहरी जिवतोडे गुरुजी या अमर वादळाची कहाणी।
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): शिक्षण महर्षि स्व. श्रीहरी बळीरामजी जिवतोडे गुरुजी हा एका जिवनाशी झालेला संघर्ष होता। या वादळाची आज (दि. 27 मार्च) पुण्यतिथी आहे। आजपासुन तब्बल तेवीस वर्षांअगोदर गुरुजी आपल्यामधुन निघुन गेले।
नऊ नंदयाची 'नंदोरी' या गावात श्रीहरी जिवतोडे यांचा जन्म 18 मे 1927 ला झाला। श्रीहरींच्या वडीलांचं नांव बळीराम तर आईचे नांव बयाबाई। गुरुजी अगदी 10 वर्षांचे असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले। त्यांची आजी रुखमाबाई यांनी श्रीहरींच्या डोक्यावर ममतेचा हात ठेवला। आजी रुखमाबाई व आजोबा कान्होबा पाटिल जिवतोडे यांनी नंदोरी येथे चौथी पर्यंतचे श्रीहरींचे शिक्षण आटोपल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता वरोरा शहरात पाठविले। इंटर पर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर श्रीहरी नागपुरला शिक्षणाकरिता गेले। बी. एसस्सी. (क्रुषी) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलं। नंतर चंद्रपुरला सीटी हायस्कुल मधे त्यांना गणिताचे शिक्षक म्हणुन नौकरी लागली व ते "जिवतोडे गुरुजी" म्हनुन ओळखु लागले।
राष्ट्रपिता म. गांधींच्या प्रेरणेतुन स्थापन झालेल्या 'हरिजन सेवक संघाच्या' माध्यमातुन गुरुजी जिल्हा सचिव म्हनुन काम करु लागले। खेडयातील झोपडया-झोपडयातुन दिसुन येणारी दैनावस्था, अज्ञान, अंधश्रध्दांचा जनमानसावर असलेला पगडा गुरुजींना हरिजन सेवक संघाच्या माध्यमातुन काम करतांना जाणवु लागला।
कावडी गावच्या आनंदराव पाटिल खामनकरांच्या 'लिला' नावाच्या कन्येशी ते विवाहबध्द झाले। गुरुजींना आधार मिळाला।
त्यानंतर 1 मे 1953 ला सिटी हायस्कुल च्या शिक्षक पदाचा राजीनामा देवुन 1 मे 1953 लाच "चांदा शिक्षण प्रसारक मंडळाची" स्थापना करण्यात आली। जयंत टॉकीज जवळील श्री. खोब्रागडे यांचे गोदाम वजा घर शाळा सुरु करण्यासाठी किरायाने घेण्यात आले। व तिचे "जनता विद्यालय, चंद्रपूर", असे नामाभीधान केले।
जनता विद्यालयाच्या हजेरीपटावर पहिल्याच वर्षी 46 मुले दाखल झाली। विशेषत्वाने, ग्रामीण भागातील अनपढ-अशिक्षित बांधवांनीच गुरुजींवर अपार विश्वास टाकला।
मध्यप्रदेश सरकारमधे मंत्री असलेले वरोड्याचे आर. के. पाटील यांच्या प्रभावामुळे शाळेला सरकारी मान्यता मिळाली।
वर्ष 1956 ला "जनता विद्यालय, कोठारी" ही ग्रामीण भागातील पहिली शाळा म्हणुन उदयास आली। त्याच वर्षी गुरुजी नागपुरवरुन BT होवुन आले। व नंतर जून 1957 मध्येच "जनता प्राथमीक प्रशिक्षण विद्यालय" स्थापन केले। ज्यातुन अनेक शिक्षक घडले।
30 जुन 1958 ला चंद्रपुरच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस, की, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदयाला म्हणजेच तत्कालीन 'दक्षिण गोंडवन' नावाने परिचीत असलेल्या आदिवासी बहुल जिल्ह्यात विद्यापीठ स्तरीय शिक्षणाची सोय करित महाविद्यालय सुरु केले। व त्यानंतर संपुर्ण विदर्भातील शैक्षणिक क्रांती घडली। ती 27 जुलै 1959 ला मंडळाद्वारे शिक्षण महाविदयालयाच्या स्थापनेच्या घटनेतुन...!
नंतर गोंडपिपरी, दुर्गापुर, धाबा, पाटणबोरी, नंदोरी, नागपुर, आदी अनेक ठिकाणी झपाटयाने शाळांची निर्मिती करण्यात आली।
सन 1962 मधे "जनता आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय" अनेक राजकीय विरोध मोडुन स्थापन केले।
10 मे 1964 ला संस्थेच्या सिव्हील लाईन कार्यालयावर वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री पदावर विराजमान असतांना संस्थेवर CBI धाड पडली। गुरुजींच्या विरोधकांनी आकसापोटी गुरुजी व संस्थेला त्रास देणे सुरु केले।
आपल्याला आपल्या तोडीचा राजकीय विरोधक राहु नये व आपले एकछत्री राज्य विदर्भात कायम रहावे, यासाठीच विरोधकांनी ठिकठिकाणी संस्थेविरुध्द खोट्या केसेस टाकल्या।
1967 मधे गुरुजी राजुरा विधानसभा क्षेत्रातुन आमदार म्हनुन निवडुण आले। 1968 मधे सरकारतर्फे दाखल केलेल्या फौजदारी केसेसचा निकाल लागला आणी गुरुजींची निर्दोष मुक्तता झाली।
महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या कोर्ट रिसीव्हरने 1965 मधे अनुदानावर आलेल्या "जनता क्रुषी महाविद्यालय", व "जनता आयुर्वेदिक कॉलेज" या संस्था बंद केल्या। त्यामुळे खेळयापाडयातुन तरुणांच्या अपेक्षा, स्वप्न धुळीस मिळाले। गुरुजी तब्बल 18 वर्षे कोर्टात भांडत राहिले।
आपल्या शेवटच्या काळात गुरुजींनी आपल्या प्रत्येक शाळेची पाहणी करुन पक्क्या इमारत बांधणीचा धडक कार्यक्रम हाती घेतला आणी 27 मार्च 1998 रोजी या वादळाची ज्योत मालवली।
गुरुजींच्या जिवनात कित्येक प्रसंग असे आले की, शिक्षण प्रसाराच्या या पुण्याच्या कार्यात पडण्यापेक्षा निव्वळ कास्तकारी केली असती किंवा अमरावतीच्या डिपटी कॉलेजमधे नौकरी केली असती तरी यापेक्षा शंभर पटिने सुखी राहता आले असते। परंतु विरुध्द परिस्थितिशी दोन हात करण्याची सदैव तयारी असणा-या गुरुजींच्या नशिबात सततचा संघर्ष लिहिलेला होता।
गुरुजींचे झोपडया-झोपडयातुन वावरणा-या तरुणांकरिता स्वतंत्र स्वायत्त विद्यापीठ "जनता ग्रामीण विश्वविद्यालय", चंद्रपूर स्थापन करण्याचे स्वप्न होते। परंतु केवळ व्यक्तिद्वेशापोटी गुरुजींना आयुष्यभर त्रास झाला। परंतु या क्रुतीमुळे चंद्रपुर जिल्ह्याची अपरिमीत हानी झाली।
एखादा चित्रपट निघावा, असं गुरुजींच कर्तुत्वाने भरलेलं वादळी आयुष्य। अशा या अमर व महान पुरुषाचा जयजयकार करु।
"जनता ग्रामीण विद्यापीठ, चंद्रपूर" चे कुलपती शिक्षण महर्षि श्रीहरी बळीराम जीवतोडे गुरुजी यांना श्रध्दांजलि अर्पण।
रोप शिक्षणाचा लावुनी, महाव्रुक्ष त्याचा केला।
शपथ आम्हा अपुली गुरुजी, पुढे चालवु तव कार्याला।।
प्रा. रविकांत वरारकर।
जनता महाविद्यालय, चंद्रपूर।
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...