वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सुमठाना जंगलातून दोन आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक
उमेश तपासे (चंद्रपूर) : तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक पाळत ठेऊन होते. गुरुवार दि. १७ जून रोजी सकाळच्या सुमारास राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलातून दोन आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून अंदाजे ३० लाख रुपये किमतीचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला. चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी (३७ ) सागर वाल्मिक पाझारे (२६), दोघेही रा. वरोरा अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात यापूर्वी याच परिसरात दोन कारवाया करण्यात आल्या. त्यात पहिल्या कारवाईत ७४ किलो, तर दुसऱ्या कारवाईत ८ किलो गांजा जप्तसुद्धा करण्यात आला आहे. तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे काही दिवसांपूर्वी मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एएसआय केमेकर, गणेश भोयर, विनोद, प्रमोद, गोपीनाथ यांचे विशेष पथक तयार करून गांजा तस्करांवर पाळत ठेवण्याचे निर्देश दिले.
हा गांजा राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा शहरात वितरित केला जाणार होता, अशी माहिती अटकेतील व्यक्तींनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.
त्यानंतर हे पथक मागील चार दिवसांपासून राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलात ठाण मांडून होते. गुरुवार च्या सकाळच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीने गांजाची तस्करी केली जात होती. यावेळी या पथकाने वाहने थांबवून तपासणी केली. तेव्हा दुचाकी वाहनावरील दोन चुंगड्यात गांजा आढळून आला. तसेच चारचाकी वाहनातील ट्युबलेस टायरमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला. यावेळी अन्य दोघे सुमारे १० किलो गांजा घेऊन पसार झाले.
पोलिसांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यानंतर खाडे यांनी घटनास्थळ गाठले. पंचासमोर गांजाचे वजन केले असता सुमारे ९० किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. याची अंदाजे किंमत ३० लाख रुपये आहे. सर्व गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली वाहने जप्त केली. राजुरा पोलिस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी, सागर वाल्मिक पाझारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...