Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / यवतमाळ मध्ये उभे होत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

यवतमाळ मध्ये उभे होत आहे क्रांतिसूर्य महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ.

यवतमाळ मध्ये उभे होत आहे क्रांतिसूर्य महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार लाभ

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ: महाराष्ट्राच्या नकाशा मध्ये यवतमाळ तसा मागासलेला जिल्हा. सर्वाधिक शेतकरी  आत्महत्या झालेला जिल्हा.  नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणांमध्ये  सर्वात जास्त गरीबी असलेला जिल्हा म्हणून सुद्धा यवतमाळ जिल्ह्याची नोंद झालेली आहे.  अशा या जिल्ह्याची निर्मिती 1902 साली झाली. त्यापूर्वी वणी हा जिल्हा होता.  ब्रिटिश काळामध्ये कोळशाच्या खाणी मुळे वणी ला जिल्ह्याचे रूप निर्माण झाले होते आणि  या छोट्या गावाचा उल्लेख  "ऐने अकबरी " या ग्रंथांमध्ये यवतमाळचा उल्लेख आहे.  ब्रिटिशांनी आपले राहायचे ठिकाण थंड हवेच्या ठिकाणी असावे, याकरिता त्यांनी यवतमाळला  कार्यालये उभी केली . तसं यवतमाळला  येवता येवती या पद्धतीचं नाव  होतं , माळावर असल्यामुळे यवता ला माळ जोडला गेला. यवतमाळ च्या चारी बाजूने घाट आहे, अतिशय सुंदर अशी वनराई आहे. अतिशय सुंदर पद्धतीने यवतमाळला वसवले गेले आहे या यवतमाळमध्ये धामणगाव पर्यंत जाण्याकरता ब्रिटिशांनी तत्कालीन रेल्वे रुळाचा  मार्ग निर्माण केला होता. यवतमाळ पासून धामणगाव रोडवर जात असताना 22 किलोमीटरवर असलेला पूल त्याला नांदुरा पूल म्हणतात. हा कमकुवत असल्यामुळे त्याठिकाणी रेल्वे रूळ टाकणे  अशक्यप्राय झाले.  याच मार्गावर मोहा नावाचे गाव आहे, तेथे चांदोरे नगर वसलेले आहे. मोहा फाट्या पासून शंभर मीटरवर डाव्या हाताला सत्यशोधक नगरी वसवली गेली. या सत्यशोधक नगरीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या नावानं ज्योती सावित्री विहार या नावाची इमारत उभी केली गेली. आणि त्या ठिकाणी महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ या नावाने माणसाला माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याची निर्मिती तयार करण्याची प्रक्रिया व्हावी, सोबत महापुरुषांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्या महापुरुषांचा संघर्ष तमाम येणाऱ्या पिढीला कळावा, ज्या मुलांचे वय 15 ते 30 वयोगटातील आहे, अशा  वयोगटातील मुलांना प्रशिक्षण दिले जावे , प्रशिक्षणातून भारतीय संविधानाची माहिती त्याला दिल्या जावी , प्रशिक्षणातून या देशांमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी एकंदरीतच मानवतावाद निर्माण केला आणि मानवतावादाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्तीने उतरले पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये समता निर्माण झाली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वातंत्र्य,समता,आणि बंधुत्व, न्याय, प्रगती यांचे महत्व कळले पाहिजे. हे स्वप्न ज्या महापुरुषांनी पाहिले त्यांचे स्वप्न साकार करण्याकरिता प्रशिक्षणाची व्यवस्था केल्या गेलेली आहे.

या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा गावातील डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे हे पूर्वी मिलिटरी मध्ये कार्यरत होते . नंतर त्यांनी एल आय सी ची परीक्षा दिली आणि ते डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून यवतमाळ मध्ये रुजू झाले. यवतमाळमध्ये राहिल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर पडला आणि महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मार्गच हा सत्यशोधक मार्ग आहे . या सत्यशोधक मार्गानेच या देशांमध्ये नवनिर्मिती व्हावी या पद्धतीची भूमिका त्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगिकारली आणि त्याकरता स्वतःच्या एकंदरीतच कमाईतला सर्वच्या सर्व भाग या सत्यशोधक विद्यापीठासाठी अर्पण केला.

सत्यशोधक विद्यापीठ उभे करत असताना त्यांनी पूर्वीच दहा  वर्षांपूर्वी जागा घेऊन ठेवली , आणि महाराष्ट्रात कुठेतरी एक चांगले विद्यापीठ कशा पद्धतीने उभे होईल याचाही शोध त्यांनी भ्रमण करून घेतला. परंतु यवतमाळच्या मातीची ताकद त्यांना जास्त जाणवली आणि यवतमाळ-धामणगाव रोडवर तीन किलोमीटरवर मोहा फाट्याजवळ महात्मा फुले  यांच्या नावाने " महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाची " निर्मिती त्यांनी केली.  त्यांची पत्नी मायाताई गोरे यांचाही मोठा वाटा यामध्ये आहे.  सत्यशोधक प्रबोधनकार अरविंद माळी यांची प्रेरणा सुद्धा त्यांना मिळाली असे जाणवते. हे सर्व होत असताना या विद्यापीठामध्ये सत्यशोधक तुकाराम शिकवला जावा, सत्यशोधक सम्राट, अशोक शिकवल्या जावा, सत्यशोधक सावित्रीबाई फुले यांची माहिती व्हावी, महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती व्हावी, महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जी विचारधारा संपूर्ण जगामध्ये पेरली त्या विचारधारेच्या प्रक्रियेतून लोकांना प्रबोधन करण्याची प्रक्रिया व्हावी, या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आहे. सोबतच भारताचचा स्वातंत्र्याच्या पूर्वीचा इतिहास व भारताचा  स्वातंत्र्यानंतरचा, भारताच्या सर्वांगीण विकासाकरता ज्यांचे ज्यांचे योगदान आहे, त्यांची संपूर्ण माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , संत गाडगेबाबा यांची माहिती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेला संघर्ष, भारतामध्ये असलेला वारकरी संप्रदाय,  भारतामध्ये  जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा झालेला संघर्ष एकंदरीतच संपूर्ण समाज व्यवस्थेची माहिती या विद्यापीठामध्ये  प्रशिक्षणार्थ्यांना दिली जाईल . सदर विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेला संघर्ष आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्यात ज्या ज्या गोष्टी अपु-या आहेत, ज्या ज्या गोष्टी ओबीसींच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करायच्या होत्या परंतु त्या निर्माण करण्याकरिता तत्कालीन राजकीय व्यवस्थेने समर्थन दिले नाही त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचे काम या विद्यापीठातून केले जाईल आणि भारतीय संविधानाची संपूर्ण माहिती सुद्धा सदर विद्यापीठातून दिली जाईल. या पद्धतीची योजना या ठिकाणी केल्या गेलेली आहे हे विद्यापीठ होत असतांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक अध्यात्मिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना जे जनक मानले जाते हीच विचारधारा आपण आता सर्वांपर्यंत पोहोचविली पाहिजे ही भूमिका त्यांनी याप्रसंगी घेतलेली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आर्थिक आणि राजकीय क्रांती करण्याकरिता त्यांचे योगदान देशाने स्वीकारले आणि ते योगदान नवीन येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचविले गेले पाहिजे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या देशामध्ये व्यवस्था परिवर्तन करण्याकरिता जे कार्य केलं त्या कार्याची माहिती  भारतातील तमाम लोकांना देण्याची भूमिका ही आता नव्या पिढीने स्वीकारली पाहिजे, याकरिता हे विद्यापीठ काम करेल अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केल्या गेलेली आहे. महात्मा फुलेंनी २४ डिसेंबर १८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ३ जानेवारी २०२२ ला महात्मा फुले यांच्या विचारांना त्याकाळात पुढे नेण्याकरिता कार्यरत असलेल्या क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचा १९१ वा जयंती उत्सव आहे , याच जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक संस्कृती पुरोगामी विचारधारा समृद्ध करण्यासाठी येत्या 3 जानेवारी २०२२ला महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाचा लोकार्पण सोहळा यवतमाळमध्ये संपन्न होत आहे, या लोकार्पण सोहळ्यामध्ये माननीय डॉक्टर जी. एस. शाक्य, संस्थापक अध्यक्ष तथा एमडी बौद्ध कम्युन इंटरनॅशनल इलाहाबाद, उत्तर प्रदेश हे आहेत तर भारतामध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या घटनेचे शिलेदार शिल्पकार आणि नवीन पिढी करिता आयकॉन असलेले पत्रकार उर्मिलेश् जी , जे राज्यसभा टीव्ही चे कार्यकारी संचालक होते आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची गणना भारतामध्ये केल्या गेलेली आहे , ते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर श्रावण देवरे, ओबीसी विचारवंत नाशिक, एस .जी. माचलवार , राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पीछडा ओबीसी शोषित  संघटन, नई दिल्ली .लता प्रतिभा मधुकर , संस्थापक बहुजन संसद, बहुजन महिला समीक्षक, मुंबई. भदन्त सुमित रत्न थेरो, श्रमान संस्कृती संघ, लखनऊ . उत्तर प्रदेश. एडवोकेट प्रकाश मौर्य, राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक समाज महात्मा फुले स्थापित मुंबई . हेमंत् सैनी सत्यशोधक विचारवंत हरियाणा. नितीन सरदार , दीनबंधू ट्रस्ट नागपूर, नौशाद उस्मान ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत औरंगाबाद , प्रकाश अण्णा शेंडगे, अध्यक्ष ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र मुंबई. भावनाताई गवळी खासदार यवतमाळ वाशिम लोकसभा. हरिभाऊ राठोड माजी खासदार माजी आमदार मुंबई. मदन येरावार आमदार यवतमाळ विधानसभा. संजय राठोड आमदार दारव्हा विधानसभा. कांचनताई चौधरी नगराध्यक्ष यवतमाळ. चंद्रकांत बावकर कार्यकारी अध्यक्ष ओबीसी जनमोर्चा रत्नागिरी महाराष्ट्र राज्य.जे.डी. तांडेल चार्टर अकाउंटंट अर्थतज्ञ मुंबई. राजेंद्र आन्डे अध्यक्ष महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अमरावती. दशरथ कुलधरण संस्थापक अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ पुणे. सुदाम चिंचाने अध्यक्ष औरंगाबाद विभाग    ओबीसी   संघटना. प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गायकवाड समीक्षक नवीन शैक्षणिक धोरण 2020 औरंगाबाद. दिलीप कोटरंगे सत्यशोधक विचारवंत वणी. माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे आयुक्त उद्योजकता विकास, टी. पांचाळ सी.ई. ओ. जिल्हा परिषद यवतमाळ, दिलीप पाटील भुजबळ जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, विनय ठमके अतिरिक्त सी ई ओ  जिल्हा परिषद यवतमाळ,  माधुरी मडावी मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ.  सदर कार्यक्रमाची भूमिका मांडणार आहेत मायाताई गोरे संचालिका महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ, प्रास्ताविक करणार आहेत डॉ. ज्ञानेश्वर गोरे अध्यक्ष तथा प्रवर्तक महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ. 
बीजभाषण करणार आहेत अरविंद माळी, सत्यशोधक प्रबोधनकार.  सूत्रसंचालन करणार आहेत प्राध्यापक काशिनाथ लाहोरे , विलास काळे. आभाराची भूमिका वठवणार आहेत अमेय गोरे 
संयोजन समिती मध्ये कार्यरत सुनिता काळे अध्यक्ष विदर्भ अध्यक्ष भारतीय ओबीसी शोषित समाज संघटन, प्राध्यापिका सविताताई हजारे राज्य कार्यकारणी सदस्य ,माधवी चिंचोळकर अध्यक्ष सावित्रीबाई फुले महिला मंडळ, भानुदास केळझरकर  राज्य कोषाध्यक्ष, ज्योती प्रफुल्ल खेडकर, सुभाष वानरे, नारायण नाकतोडे , सुधा वाघमारे , प्राध्यापक दीपक वाघ, मोहन लोखंडे, संतोष विनोद, विनोद इंगळे, प्रमोद संजय, संजय बारी, दिलीप विठ्ठल, विठ्ठल ताकतोडे , शशिकांत लोळगे , दत्ता मेहत्रे, माधुरी फेंडर, प्रतिभा प्रवीण गोबरे , विनोद गोबरे , पराग गोबरे, प्रियंका गोरे, हे सदर कार्यक्रमाचे संयोजक आहे.

यवतमाळ जिल्ह्यातून सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता भारतीय पिछडा ओबीसी शोषित समाज संघटन नई दिल्ली आणि ओबीसी जनमोर्चा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे पदाधिकारी, राज्य सचिव उत्तम बरवड,  जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत , जिल्हा संघटक ज्ञानेश्वर रायमल, अशोक मोहुर्ले , विनोद इंगळे , मीडिया प्रभारी डॉक्टर संजय ढाकुलकर, शहराध्यक्ष कमलताई खंडारे, दिग्रस अध्यक्ष शाम पाटील महिंद्रे,  सचिव संजय दुधे, पुसद अध्यक्ष लक्ष्मणराव आगाशे, सचिव डॉक्टर नयनश्री श्रीराम वानखडे. कळम अध्यक्ष गायत्री नवाडे , सचिव अर्चना हजारे , दारव्हा अध्यक्ष रोहित गुल्हाने, सचिव अक्षय दुधे , घाटंजी अध्यक्ष सतीश मलकापुरे, सचिव सचिन करनेवार, राळेगाव अध्यक्ष राजू रोहणकर, सचिव विवेक गवळी , महागाव अध्यक्ष योगेश खरे , सचिव अंकुश आडे, पांढरकवडा अध्यक्ष राम भंडारे, सचिव आतीश चव्हाण, मारेगाव समन्वयक बाबाराव धवस, समन्वयक बाबाराव दैने , आर्वि अध्यक्ष ज्ञानदीप चोपडे, सचिव अमोल ठाकरे, नेर मनोज झोपाटे, सचिव विनोद गोबरे, जिल्हा संघटक वनी एडवोकेट पौर्णिमा शिरभाते, समन्वयक दिलीप पडोळे सचिव शशिकांत लेनगुरे, बाभूळगाव अध्यक्ष अरुण दामेदर, सचिव राजू बोरकर ,उमरखेड अध्यक्ष साहेबराव धात्रक, सचिव अरविंद वझलवार, झरी जामणी संघटक आशिष साबरे, ओबीसी शिक्षक अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष संजय बारी, जिल्हा समन्वयक रामेश्वर कपाट, विदर्भ संघटक शशिकांत दत्ता, जिल्हा सचिव मोहन लोखंडे, सत्यशोधक महिला विचार मंच. संगीता डहाणे शोभना कोटंबे ,वनिता बिजूलकर सुनंदा मडावी  जयश्री मडावी, उषा सोनटक्के ,सिंधुताई धवणे, शुभांगी मालखेडे ,विजया हुडे ,विजया गटलेवार अश्विनी दाहेदार ,नम्रता कडव, सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंच .नम्रता खडसे ,अनिता गोरे, वैशाली फुसे ,नीता दरणे, कल्याणी मादेशवार ,प्रमिला पारधी ,रेखा कोवे, वंदना डवले विद्या भगत, प्रेमा गिरी योगिता गुल्हाने,अनिता बर्डे, सुजाता लहाडके,  मीनाक्षी गव्हाळे इत्यादी मंडळी सातत्याने प्रयत्नरत आहेत.

या कार्यक्रमामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आणि सत्यशोधक विचारधारेच्या प्रक्रियेतून सर्व जनतेने यांची भूमिका स्वीकारली पाहिजे या करिता दुपारी ११ ते १२.३० कार्यक्रम सुरू होत आहे,  १० ते १२ महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाच्या उद्घाटन होईल , लोकार्पण सोहळा होईल. ही पाच मजली इमारत ज्यांनी उभी केली, ज्यांनी पाया रचला ज्यांनी रंगरंगोटी केली , ज्यांनी इलेक्ट्रिक फिटिंग केली, ज्यांनी दरवाजे बसवले , खिडक्या बसवल्या, प्लंबिंग चे काम केले  त्या तमाम कष्टकरी मजूर यांचा सत्कार या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण आहे ,  श्रमाची किंमत झाली पाहिजे आणि श्रम कार्याला सन्मान देणे हा सर्वात मोठा आकर्षणाचा कार्यक्रम. याकरिता कष्टकरी मजुरांचा सन्मान या ठिकाणी होत आहे अशा या ऐतिहासिक कार्यक्रमाचे दिनांक 3 जानेवारी 2022 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व साक्षीदार झाले पाहिजे आणि या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झाले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर कांशीरामजी यांची विचारधारा जनमानसामध्ये पोहोचण्याकरिता कार्यरत असलेल्या तमाम मानवतावादी लोकांचे विकासासाठी हे विद्यापीठ होत आहे आपणा सर्वांनी 3 जानेवारीला सकाळी दहा वाजता या विद्यापीठाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...