आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी ): देशभरात सध्या बेरोजगारांची संख्या जरी वाढत असेल मात्र त्याला जबाबदार कोण असा सवाल समोर उपस्थित होतो...? सध्या बेरोजगारांच्या संख्येसोबतच अशिक्षित नागिरकांची पण संख्या दिवसेन दिवस वाढतच आहे. शहराच्या कडेला असलेल्या अनेक वस्त्या आपण मात्र नक्कीच बघितल्या असाव्यात पण त्या वस्त्यांमध्ये किंवा तेथील झोपाळ्यांमध्ये कधी चुकून, झाकून सुद्धा कधी बघितले नसावे.
अश्या अनेक झोपळपट्ट्या, वडर वस्त्या आपल्या समाजाच्या अवती भवती असताना आपण कधीही जास्त त्याविषयी विचार देखील केला नसेल. वर्धा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अश्या वस्त्या आहेत जिथे गोर गरीब लोकं राहतात आणि त्यांच्या घरात चिमुकले लेकरं राहतात ज्यांना शाळेचा 'श' सुद्धा माहिती नाही आणि मग हीच मुलं मोठी होत अशिक्षित म्हणून समाजात ओळखल्या जातात आणि त्यांना पण तेच वाटते कि शिक्षण हे आपल्या कामाच नाही. अश्या ठिकाणी अनेक होतकरू कष्टकरी माय बाप असतात ज्यांना त्यांच्या मुलांना शिकवायचं असते पण त्यांना समाजात वावरताना प्रादाण्य दिल्या जात नाही.
वर्धा येथील रहिवासी मीनल नैताम यांनी असेच येतजात म्हसाळा येथील वडर वस्तीकडे जेव्हा नजर फिरवली त्यांना तेथील लहान मुलं ज्यांच शिकण्याचं वय असते ते लेकरं जुवा खेळत अनेकदा दिसल्याने त्यांचं मन हेलावून गेले, त्यांनी त्यालेकरांच भविष्य काय असा विचार केला...? शेवटी त्यांनी स्वतः एक निर्णय घेतला आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फुटपाथ शाळेचा प्रयोग करून बघुयात म्हणून सुरवात केली.
आधी त्यांनी तेथील काही पालकांशी संवाद साधला आणि त्यांनी फुटपाथ शाळा सुरु केली. आधी त्यांना अनेक त्रासाला पुढे जावे लागले पण हळू हळू पाच, दहा, पंधरा आणि आता तब्ब्ल चाळीस मुलं मुली त्यांच्या शाळेत शिकायला येतात. तब्ब्ल दोन ते अडीच महिने पूर्ण होत आले असून नक्कीच मीनल नैताम यांना किमान एवढा विश्वास आला आहे कि जर मी याना याच पद्धतीने शिकवत गेले तर नक्कीच एक दिवस हे मुलं निदान फुल न फुलाची पाकळी तरी असणार.
दोन महिन्या आधी जेव्हा हा प्रयोग सुरु केला तेव्हा मुलांना घरो घरी जाऊन बोलवावे लागायचे पण आता आज अशी परिस्थिती आहे कि मुलांना मीनल दिसली कि धावत पळत शिकण्यासाठी लेकरं येतात. खरंच आहे शिक्षणाच महत्व ज्याला कळले त्यांनी नक्कीच कधीही माघे वळून बघितले नाही
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...