Home / महाराष्ट्र / मराठा सेवा संघ द्वारा...

महाराष्ट्र

मराठा सेवा संघ द्वारा आयोजित छत्रपती महोत्सवात कोविड योद्धयांचा सत्कार..

मराठा सेवा संघ द्वारा आयोजित छत्रपती महोत्सवात कोविड योद्धयांचा सत्कार..

वणी(प्रतिनिधी ) :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून उत्सवप्रेमी लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला. दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थावर होणारा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द करून अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोनासंबधी सूचनांचे पालन करून हा सोहळा साधनकरवाडीस्थित कुणबी समाज सांस्कृतिक भवनामध्ये संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, रंगनाथ स्वामी नागरी सह.बँक वणीचे अध्यक्ष ऍड.देविदास काळे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, पोलीस स्टेशन वणीचे ठाणेदार वैभव जाधव,आयुष विभागाचे प्रमुख डॉ.विवेक गोफने उपस्थित होते.

 

या छत्रपती महोत्सवाच्या निमित्ताने कोरोनासारख्या कठीण काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता ज्यांनी अहोरात्र सेवा दिली अशा कोविड योद्धयांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठा सेवा संघाने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.याप्रसंगी डॉक्टर्स टीम, नर्सेस टीम, एमपीडब्ल्यू वर्कर्स,अंत्यविधी सारखे संस्कार पार पाडणारी टीम,पोलीस विभागातील कर्मचारी तसेच, वणी शहरातील बाधित क्षेत्रात निर्जंतूकीकरण मोहीम राबवणारी टीम यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि शिवधर्म दिनदर्शिका देऊन सन्मानित करण्यात आले.प्रमुख अतिथी पो. स्टे.वणीचे ठाणेदार वैभव जाधव, आयुष विभागाचे प्रमुख डॉ.विवेक गोफने,स्वागताध्यक्ष  ऍड.देविदास काळे या मान्यवरांनी मराठा सेवा संघाच्या या अभिनव संकल्पनेचे जाहीर कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना महामानवांनी सुरु केलेली समाजप्रबोधनाची परंपरा अबाधित आणि अखंडित राहावी, यासाठीच दरवर्षी मराठा सेवा संघ छत्रपती महोत्सवाचे आयोजन करीत असते, अशी भूमिका मंगेश खामनकर यांनी मांडली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म. से.  संघाचे उपाध्यक्ष प्रदीप बोरकुटे आणि आभार प्रदर्शन म. से. संघाचे सचिव नितीन मोवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बोबडे, मारोती जिवतोडे, विजय राजूरकर,दत्ता डोहे,अमोल टोंगे, लक्ष्मण काकडे,ऋषीकांत पेचे, वसंत थेटे,,सुरेंद्र घागे,संजय गोडे,विलास शेरकी, संदीप गोहोकर,मारोती मोडक, शंकर पुनवटकर,नरेंद्र गायकवाड शेखर वऱ्हाटे अर्णव बोरकुटे,स्वराजित डोहे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...