रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार
रामचंद्र सालेकर: बहुजनांच्या महापुरुषांचा इतिहास म्हणजे संघर्षाचा इतिहास.आमच्या महापुरुषांचा इतिहास हा शरिरातल्या रक्ताचा एक एक थेंब समाजाच्या उद्धारासाठी आटविल्याचा इतिहास आहे. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे विश्वातलं अस नाव आहे की ज्यांनी जगातली जी जी महाभयंकर परिस्थिती होती ती सर्व स्वतः अनुभवून त्या परिस्थितीवर मात करत तावून सलाखून निघालेलं जगातलं अतीउच्च नाव म्हणजे भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर.
डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी एखादा लेख लिहावा म्हणून लेखनी आणि कागद हाती घेतला तेव्हा सुरुवात कुठून करावी? व कशी करावी?त्यांची पारिवारीक पृष्ठभूमी,त्यांच बालपण,शिक्षणासाठी संघर्ष,त्यांच्या जीवनातील सामाजिक विषमतेचा कहर,त्यांच्या जीवनाला वळन देणाऱ्या घटना,त्यांना मदतीचा हात देणाऱ्या थोर व्यक्तींची भुमिका,रमाईचा त्याग,भीषण दारिद्रयासी केलेला संघर्ष,समस्यांवर मात करुन देश विदेशात घेतलेले सर्वोत्तम शिक्षण व मिळविलेल्या मोठमोठ्या पदव्यांची लांबचलांब यादी,देश विदेशात विविध पातळ्यावर त्यांना आलेले अनुभव व त्यातून त्यांनी निर्माण केलेले शाश्वत साहित्य ग्रंथ भंडार, त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक साहित्यावरील समिक्षक विचार,सामाजिक शोषणाविरोधात त्यांना करावा लागणारा संघर्ष,पदोपदी करावा लागणारा राजकीय संघर्ष, त्यांनी स्थापण केलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा राजकिय पक्ष व त्यांचे कार्य,देशाच्या विविध समस्यांवर मंथन व त्यातून निर्माण केलेले आदर्श संविधान,बहुजन समाजाच्या उद्धारासाठी संघर्ष, त्यांचे प्रत्येक क्षेत्रासबंधीचे विचार व प्रत्येक क्षेत्रात देशासाठी त्यांचे राहिलेले योगदान,त्यांचे मौलिक विचार, रक्ताचा एकही थेंब न सांडवता त्यांनी घडवून आणलेली विश्वातली महान अशी धम्म क्रांती.....किती! किती..!! हे सर्व माझ्या अल्प बुद्धीत घोंघावयाला लागले तेव्हा बाबासाहेबांच्या कार्यावर भाष्य करण किंवा लिहनं हे अथांग सागराच्या एका थेंबा इतकही आपल लेखन असणार नाही याची प्रचिती झाली.आपल्या आयुष्यातला संपूर्ण वेळ कागद आणि शाई अपूरी पडणार हे कळून चुकलं.परंतु त्यांना अभिवादन करण्यासाठी थोड का होईना लिहावचं लागेल अस मनाशी ठरवून त्यांचा संघर्षमय इतिहास लिहणं शक्य नसलं तरी विद्यार्थांना स्पर्धा परिक्षेत त्यांच्या कार्याच्या काही ठळक घटना जरी या लेखाद्वारा माहिती करुन देता आल्या तरी त्याचा फायदा विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत नक्की होईल. हा विचार करुन लेखाला सुरुवात केली.
१४ एप्रिल १८९१ ला मध्यप्रदेश महु येथे जन्म. १९०० मध्ये सातारा येथे सरकारी हायस्कुल मध्ये प्रवेश. १९०८ मध्ये मॕट्रीक परिक्षा उत्तीर्ण. मुंबई येथील एल्फिन्स्टन काॕलेजमध्ये नाव दाखल केले. १९१३ मध्ये एल्फिन्स्टन काॕलेजमधून पर्शियन व इंग्रजी घेवून बी.ए.झाले. याच वर्षी जुलैमध्ये बडोद्याचा सयाजीराव महाराज गायकवाड यांचे मदतीने अमेरीकेमधील न्युयार्क येथिल कोलंबिया विद्यापीठात प्रवेश. १९१५ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून एम.ए.परिक्षा उत्तीर्ण. या परिक्षेसाठी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय व समाजशास्त्र,इतिहास,तत्त्वज्ञान,मानववंश शास्त्र व राज्यशास्त्र हे विषय.याच वर्षी "प्राचीन भारतातील व्यापार" हा ग्रंथ लिहीला. १९१६ मध्ये पी.एच.डी.साठी The national dividend of India-A, Historical and Analytical study हा प्रबंध लिहीला. याचवर्षी जूनमध्ये पी.एच.डी.प्रबंधाचे काम पूर्ण झाल्यावर 'लंडन स्कूल आॕफ इकाॕनाॕमिक्स अॕन्ड पोलिटीकल' काॕलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंग्लंडला गेले.याच वर्षी "भारतीय जातिसंस्था,तिची यंत्रणा,उत्पत्ती व विकास", "भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा- एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन" हे ग्रंथ लिहीले. १९१७ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने वरील प्रबंधासाठी पी.एच्.डी. पदवी दिली. याच वर्षी सयाजीराव महाराजांच्या शिष्यवृत्ती ची मुदत संपल्यामुळे भारतात परत यावं लागलं,त्यापुर्वी एम्.एस्.सी परिक्षेसाठी एक वर्षभर अभ्यास केला.याच वर्षी जुलैमध्ये बडोदा येथे सयाजीराव महाराज यांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक परंतु थोड्याच दिवसांत या नोकरीचा राजीनामा दिला. १९१८ च्या नोव्हेंबर मध्ये मुंबई येथील सिडनेहॕम काॕलेज आॕफ काॕमर्स अॕड इकाॕनामिक्स येथे प्राध्यापक म्हणून रुजू,साऊथबरो कमेटीसमोर साक्ष,अस्पृशांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधीत्व असावे असा विचार सर्वप्रथम मांडला.१९२० च्या जानेवारीमध्ये 'मुकनायाक' साप्ताहिक सुरु केले.याच वर्षी मार्चमध्ये लंडन येथील अपुरा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी सिडनेहॕम काॕलेजमधील प्राध्यापक पदाचा राजीनामा देवून सप्टेंबरमध्ये लंडन विद्यापीठामध्ये नाव दाखल केले.कोल्हापूर संस्थानातील मानगांव येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृशांची मोठी परिषद भरविली यावेळी छत्रपती शाहु महाराज उपस्थित होते.अस्पृश्य समाजाला डाॕ.आंबेडकरांच्या रुपाने मोठा नेता मिळाला असे शाहु महाराजांनी याच परिषदेत प्रथम सांगितले. त्यानंतर नागपुर येथे छत्रपती शाहु महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृष्य परिषद भरविण्यात आली होती. १९२१ च्या जुनमध्ये लंडन विद्यापीठाची एम्.एस्.सी.पदवी Provincial Decentralisation of Imperial Finance in British India या विषयात पुर्ण केली. १९२२-२३ या काळात जर्मनीतील बाॕन विद्यापीठामध्ये कायद्याचा अभ्यास करुन परत लंडनला गेले याच वर्षी लंडन विद्यापीठाने त्यांनी सादर केलेला प्रबंध स्वीकारल्याने लंडन विद्यापीठाची डी.एस्.सी.पदवी मिळवणारे पहिले भारतीय बणले. विषय होता- The Problem of the Rupee - Its Origin and its Solutions. हाच प्रबंध १९४७ साली History of Indian currency and Banking म्हणून प्रसिद्ध झाला. १९२३ च्या एप्रिल मध्ये मायदेशाला परत आले आणि जुनमध्ये मुंबई येथे हायकोर्टामध्ये वकिलीस सुरुवात केली. १९२४ मध्ये 'बहिस्कृत हितकारीनी सभा' स्थापण केली. याच वर्षी "ब्रिटिश भारतातील प्रांतिक व अर्थशास्त्रीय उत्क्रांती (द इव्होल्यूशन आॕफ प्राॕव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया), तसेच "भारतातील जाती" (कास्ट इन इंडिया) हे ग्रंथ लिहून प्रकाशित केले. १९२६ मध्ये प्रांत लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे सदस्य झाले. १९२७ च्या मार्च मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. याच वर्षी एप्रिल मध्ये बहिस्कृत भारत हे पाक्षिक सुरु केले. १९२८ च्या मे मध्ये इंडियन स्टॕट्युटरी कमिशन (सायमन कमिशन) समोर साक्ष दिली. याच वर्षी जुनमध्ये मुंबई येथील सरकारी लाॕ काॕलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. याच वर्षी मुंबई प्रांत कमेटीचे सभासदसुद्धा झाले. १९३० च्या मार्चमध्ये नाशिक येथे मंदिर प्रवेशाचा काळाराम मंदिर सत्याग्रह केला. याच वर्षी डिसेंबर मध्ये जनता साप्ताहिक सुरु केले.१९३०-३२ मध्ये राऊंड टेबल काॕन्फरेन्सेसला मागासवर्गीयांचे प्रतिनीधीत्व करण्यासाठी इंग्लंडला गेले. १९३२ च्या सप्टेंबर मध्ये नाइलाजाने पुणे करारावर सही केली.अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाऐवजी सयुक्त मतदार संघ मिळाले. १९३२-३४ मध्ये भारताला सुधारणेचा पुढील हप्ता देण्यासाठी नेमलेल्या जाईंन्ट पार्लमेंटरी कमेटीचे सभासद झाले. १९३५ च्या जुन मध्ये सरकारी लाॕ काॕलेज मध्ये प्राचार्य तथा कायदेशास्त्राचे 'पेरी प्राध्यापक' म्हणून कार्य केले. याच वर्षी येवला येथे हिंदु धर्म सोडण्याचा निर्णय जाहीर केला. १९३६ च्या आगस्ट मध्ये इंडिपेंडन्ट लेबर पार्टीची स्थापना केली. १९३७ च्या जानेवारीमध्ये मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर सभासद म्हणून निवडून गेले. "अॕनिहिलेशन आॕफ कास्ट" हा ग्रंथ लिहीला. १९४० मध्ये "पाकिस्तान विषयी विचार" (थाॕट्स आॕन पाकिस्तान) हा ग्रंथ लिहीला. १९४२ च्या एप्रिल मध्ये आॕल इंडिया सेडूल्ड काॕस्ट फेडरेशनची स्थापना केली.याच वर्षी जुलैमध्ये गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर मजूरमंत्री म्हणून नेमणूक झाली. १९४३ मध्ये "रानडे, गांधी अॕन् जिना" हा ग्रंथ लिहीला. १९४५ च्या जुलै मध्ये 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी,मुंबई' ची स्थापना केली.याच वर्षी "काॕग्रेस व गांधी यांनी अस्पृश्य वर्गास कसे वागविले?"हा ग्रंथ लिहीला. १९४६ च्या एप्रिल मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ काॕलेजची स्थापना केली. जुलैमध्ये गव्हर्नर जनरल च्या कार्याकारणीतून बाहेर पडले. याच वर्षी सप्टेंबरमध्ये अस्पृश्यांच्या हिताच्या दृष्टीने घटना समिती व स्वातंत्र्य जाहिर होईपर्यंत हंगामी सरकारमध्ये योग्य तजवीज करावी म्हणून इंग्लंडला प्रयाण केले. याच वर्षी डिसेंबर मध्ये घटना समितीत पहिले भाषण दिले. "शुद्र पूर्वी कोण होते?" (हु वेअर द शुद्राज) हा ग्रंथसुद्धा लिहीला. १९४७ मध्ये कायदा मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात नेमणूक झाली. १९४८ च्या नोव्हेंबरमध्ये घटना समितीस घटनेचा मसुदा सादर केला. "द अन्टचेबल्स" हा ग्रंथ लिहीला. १९५० च्या जुनमध्ये औरंगाबाद येथे मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली. याच वर्षी डिसेंबरमध्ये जागतिक बौद्ध परिषद कोलंबो येथे उपस्थित झाले. १९५१ च्या जुलैमध्ये भारतीय बौद्धजन संघ स्थापण केला. १९५२ मध्ये राज्यसभासदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली. १९५३ च्या मे मध्ये सिद्धार्थ काॕलेज आॕफ काॕमर्स अॕड इकाॕनाॕमिक्स मुंबईत स्थापण केले. १९५४ च्या डिसेंबर मध्ये रंगून येथील जागतिक बौद्ध परिषदेत भारताचं प्रतिनीधीत्व केलं. १९५५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करुन याच वर्षी "थाॕट्स आॕन लिंग्विस्टिक स्टेटस" हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. १९५६ च्या मे मध्ये सिद्धार्थ काॕलेज आॕफ लाॕ,मुंबईची स्थापना केली. १४ आॕक्टोबर १९५६ ला नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार करुन लाखो जनतेला बौद्ध धम्माची दिक्षा दिली आणि याच वर्षी नोव्हेंबरमध्ये काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेस भारताचे प्रतिनीधी म्हणून उपस्थित होते.
६ डिसेंबर १९५६ ला दिल्ली येथे या महामानवाने आम्हा भारतीयांना आदर्श संविधानाच्या रुपाने सर्वांना श्वास देवून अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे "बुद्ध व त्याचा धम्म" (बुद्ध अॕन्ड हिज धम्म) व "रिडल्स इन हिंदुइझम" हे ग्रंथ १९५७ मध्ये प्रकाशित झाले.
असा हा संपुर्ण विश्वाला आपल्या ज्ञानाने दिपवून टाकणारा रत्न साऱ्या विश्वात चमकत झळकत होता परंतु खेदाची बाब या जातीयवादी विषाने भरलेल्या या भारतीय समाजव्यवस्थेला व शासनव्यवस्थेला ह्या रत्नाची पारख करुन भारतरत्न बहाल करायला १९९१ वे साल उजाळावे लागणे हे आपल्या देशाचे दुर्दैव असच खेदाने म्हणावे लागेल. अशा या विश्वरत्नास भारतरत्नास नवभारताच्या शिल्पकारास ज्ञानाच्या सागरास कोटी कोटी प्रणाम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...